भारतीय संस्कृतीत विवाहित स्त्रियांच्या सोळा शृंगारांपैकी जोडवी हे एक महत्त्वाचे आभूषण मानले जाते. काळानुसार फॅशन बदलली आणि आताच्या आधुनिक सुनांना केवळ पारंपरिकच नव्हे, तर ट्रेंडी आणि स्टायलिश जोडवी घालायला आवडतात. पायांच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी आणि स्वतःला एक वेगळी ओळख देण्यासाठी आजकाल बाजारामध्ये विविध प्रकारची डिझाईन्स उपलब्ध असून ती कोणत्याही पेहरावावर उठून दिसतात. तुम्हाला साधेपणा आवडत असेल, तर साध्या आणि नाजूक डिझाईनची जोडवी तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरतील. या प्रकारची जोडवी दिसायला अत्यंत सोबर असतात आणि तुम्ही ती ऑफिसमध्ये किंवा दैनंदिन वापरासाठी सहज परिधान करू शकता. ही जोडवी केवळ सोन्या-चांदीतच नव्हे, तर ऑक्सिडाइज्ड धातूमध्येही उपलब्ध आहेत. साध्या जोडव्यांमुळे पायांना एक प्रकारचा सुटसुटीतपणा मिळतो आणि ते पाश्चिमात्य कपड्यांवरही अतिशय सुंदर दिसतात.
आजच्या काळात नक्षीकाम किंवा फ्लोरल डिझाईन असलेल्या जोडव्यांची मोठी क्रेझ पाहायला मिळते. विशेषतः ज्यांना थोडा ’हेवी’ लूक हवा आहे, त्यांच्यासाठी ही डिझाईन्स उत्तम आहेत. फुलांच्या पाकळ्या किंवा पानांची नक्षी असलेली जोडवी पायांचे सौंदर्य द्विगुणित करतात. सण-समारंभ किंवा लग्नाकार्यासाठी अशा प्रकारच्या कलाकुसर केलेल्या जोडव्यांची निवड करणे हा एक चांगला निर्णय ठरू शकतो. यामुळे तुमच्या पायांना एक पारंपरिक तरीही आधुनिक स्पर्श मिळतो.
रंगीत खड्यांची जोडवी ही सध्याच्या फॅशनमधील सर्वात लोकप्रिय प्रकारांपैकी एक आहे. तुमच्या साडीच्या किंवा ड्रेसच्या रंगाशी जुळणारे खडे असलेली जोडवी घातल्यास तुमचा संपूर्ण लूक अधिक आकर्षक वाटतो. यामध्ये प्रामुख्याने माणिक, पाचू किंवा अमेरिकन डायमंड्सचा वापर केला जातो. हे खडे जोडव्यांना एक वेगळीच चमक देतात, ज्यामुळे साध्या पायांचे सौंदर्यही खुलून दिसते. आधुनिक सुनांना अशा प्रकारचे प्रयोग करायला खूप आवडते. काही स्त्रियांना एकाच बोटात जोडवी घालण्यापेक्षा दोन किंवा तीन बोटांत जोडवी घालायला आवडते. याला ’मल्टिपल लेयर’ स्टाईल म्हटले जाते. ही स्टाईल सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. पातळ पट्ट्यांची दोन-तीन जोडवी एकाच वेळी घातल्यास पायांना एक रॉयल लूक प्राप्त होतो. बाजारात अशा प्रकारची जोडवी तयार स्वरूपात किंवा सुटीही मिळतात, जी तुम्ही तुमच्या आवडीनुसार मॅच करू शकता.
Check Also
पायलट बना आणि उड्डाण करा !
लहानपणापासूनच आकाशात झेपावणारी विमाने पाहून अनेकांच्या मनात वैमानिक (पायलट) बनण्याचे स्वप्न अंकुरते. आजच्या काळात हे …
पांचजन्य वृत्तपत्र