होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये जगाची तेलजहाजे अडकून पडलेली असताना भारताने आपली जहाजे सोडवून आणण्यात यश मिळवले आहे. हा भारताचा राजनैतिक आणि कूटनीतीक विजय आहे. भारताची ही मुत्सद्देगिरी केवळ तेलापुरती मर्यादित नाही, तर ती प्रादेशिक स्थिरतेसाठीही आहे. पश्चिम आशियात लाखो भारतीय कामगार वास्तव्यास आहेत, ज्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही भारत सरकारवर आहे. कोणत्याही प्रकारचा लष्करी संघर्ष या भारतीयांच्या आयुष्याला धोक्यात टाकू शकतो. त्यामुळेच भारताने लष्करी …
Read More »TimeLine Layout
March, 2026
-
22 March
कसोटी सामूहिक संयमाची
आपण सर्वजण कधी ना कधी वैयक्तिक आणि कौटुंबिक संकटांतून जातो, त्यांचा सामना करतो, त्यातून शिकतो आणि पुढे जातो. समाजाकडूनही हीच अपेक्षा असते. परंतु काय ही अपेक्षा बहुतेकदा पूर्ण होत नाही. याचे कारण सामूहिक परिणाम करणारी एखादी गोष्ट घडते किंवा संकट येते तेव्हा अविश्वासाचे, भीतीचे आणि लोभाचे चित्र सर्वदूर दिसते. त्यामुळेच एखादी अफवा पसरते आणि आपण विचार न करता तिच्या मागे …
Read More » -
16 March
‘लाहोर 1947’चे नाव बदलणार?
बॉलीवूड अभिनेता आमिर खानच्या निर्मिती संस्थेद्वारे साकारण्यात येत असलेल्या आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत असलेल्या ‘लाहोर 1947’ या चित्रपटाच्या शीर्षकात बदल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असतानाच समोर आलेल्या या माहितीनुसार, आता हा चित्रपट ‘बटवारा 1947’ या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. फाळणीच्या काळातील भीषण वास्तव आणि त्यातील भावनिक खोली अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी …
Read More » -
16 March
‘बूंग’च्या सन्मानाचा अन्वयार्थ
यंदाच्या बाफ्टा (ब्रिटीश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स) पुरस्कार सोहळ्यात मणिपुरी भाषेतील ’बूँग’ या चित्रपटाने ’सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट’ गटात बाजी मारून भारतीय सिनेसृष्टीची मान उंचावली आहे. लक्ष्मीप्रिया देवी यांचा दिग्दर्शिका म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. मुख्य भूमिकेत असणारा गुगुन किपगेन हा बालकलाकार स्वतः कुकी-झो समुदायाचा असून त्याने यात मैतेई मुलाची भूमिका साकारली आहे. आपल्या हरवलेल्या वडिलांना परत …
Read More » -
16 March
नकारात्मकतेवर विजय मिळवण्याचा राजमार्ग
मानवी जीवनात चढ-उतार हे येतच असतात आणि अशा वेळी मनाची शांतता भंग पावून नकारात्मक विचारांचे जाळे विणले जाणे स्वाभाविक आहे. अनेकांना असे वाटते की आपण प्रयत्नांनी हे वाईट विचार काढून टाकावेत आणि केवळ सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करावे. मात्र, जगप्रसिद्ध आध्यात्मिक मार्गदर्शक सद्गुरु या विषयावर एक अतिशय वेगळा आणि वास्तववादी दृष्टिकोन मांडतात. त्यांच्या मते, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा जबरदस्तीने त्याग …
Read More » -
16 March
कोल्ड फेशियल म्हणजे काय ?
आपल्या काही वर्षांमध्ये कोल्ड फेशियलचा ट्रेंड लोकप्रिय झाला आहे. अनेक महिला आणि सेलिब्रिटी बर्फाच्या थंड पाण्यात चेहरा काही सेकंदांसाठी बुडवतात. © पूर्वी फेशियल प्रक्रियेमध्ये चेहऱ्यावर थंड टॉवेल ठेवण्याची पद्धत प्रचलित होती. याचा उद्देश सूज कमी करणे, डोळ्यांखालील काळी वर्तुळे घटवणे आणि त्वचेला ताजेतवाने बनवणे असा असायचा. आता या प्रक्रियेला अधिक थेट आणि प्रभावी स्वरूप दिले गेले असून बर्फाच्या पाण्यात चेहरा …
Read More » -
16 March
दिवसभराची श्वासगणना शक्य आहे?
काही रोजच्या गोष्टी आपण गृहितच धरत असतो व त्याविषयी फारसा विचार करत नाही. या जगात पाऊल ठेवल्यापासून आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपला श्वासोच्छ्वास अखंडपणे चालूच असतो. आपण दिवसभरात किती वेळा श्वास घेतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? माणूस दिवसातून अर्थात 24 तासांमध्ये किती वेळा श्वास घेतो, याबाबतही अनेकांना कुतूहल वाटू शकते. शरीरशास्त्र आणि जीवशास्त्राच्या अभ्यासातून या प्रश्नाची उकल होते. …
Read More » -
16 March
शेतकऱ्याच्या लेकीची भरारी
जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर स्वप्नांना गवसणी कशी घालता येते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आश्रिता. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आश्र्तािने आपल्या कष्टाने अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली आहे. ज्योतिषमती इंजिनिअरिंग कॉलेजमधून बी.टेक. पूर्ण केल्यानंतर तिने आपल्या आवडीच्या हार्डवेअर इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला, जो तिच्या अनेक सोबत्यांनी निवडलेल्या वाटेपेक्षा वेगळा होता. आश्रिताचा हा प्रवास सोपा नव्हता. पहिल्या ‘गेट’ …
Read More » -
15 March
मलमपट्टीने काय साधेल?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना राज्यातील बळीराजाला दिलासा देणारी एक घोषणा केली आहे. दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाला माफी देण्याची ही घोषणा कर्जबाजारीपणामुळे त्रासलेल्या काही शेतकऱ्यांसाठी दिलासाजनक असली, तरी सरसकट बळीराजा खूश होईल अशी परिस्थिती नाही. देवेंद्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयावर अपेक्षेप्रमाणे विरोधी पक्षांनी टीका केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्या काळात आम्ही सरसकट …
Read More » -
15 March
घरखरेदीदारांना दिलासा
घरखरेदीदारांच्या हक्कांचे संरक्षण करणारा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. सदनिका किंवा घराच्या देयकावरून (पेमेंट) निर्माण झालेल्या वादाचे भांडवल करून विकासक (बिल्डर) आता खरेदीदाराला संक्षिप्त कायदेशीर प्रक्रियेचा आधार घेऊन घरातून बेदखल करू शकणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अशा प्रकरणांमध्ये विकासकांना नियमित दिवाणी प्रक्रियेचाच अवलंब करावा लागेल, असे बजावत न्यायालयाने घरखरेदीदारांची बाजू भक्कम …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







