लेख-समिक्षण
  • 29 Mar 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4207

TimeLine Layout

February, 2026

  • 8 February

    लोखंडी कढईच्या स्वच्छतेसाठी

    अनेक वर्षांपासून लोखंडी कढई ही स्वयंपाक घराचा अविभाज्य भाग राहिली आहे. मध्यंतरीच्या काळात नॉनस्टिकची लाट आली होती. या लाटेने लोखंडी कढयांना बाहेर घालवण्याचा प्रयत्न झाला होता; पण आरोग्याच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व कालातीत असल्याचे लक्षात आल्यामुळे पुन्हा या कढयांना सन्मानाने किचनमध्ये स्थान दिले जात आहे. अलीकडील काळात भाजी बनवण्यापासून ते पुऱ्या तळण्यापर्यंत या कढयांचा वापर केला जातो. यामध्ये बनवलेल्या पदार्थांना वेगळी …

    Read More »
  • 8 February

    भाजीत भाजी मेथीची

    मेथी दाणे असोत किंवा मेथीची हिरवीगार भाजी, आरोग्यासाठी त्यांचा अनेक प्रकारे लाभ होत असतो. मेथीची पाने थोडी कडवट चवीची असल्याने काही लोकांना ही भाजी आवडत नाही. मात्र, शेंगदाण्याचा कूट किंवा डाळ घालून केलेली ही भाजी बहुतांश घरांमध्ये आवडीने खाल्ली जाते. अर्थात, केवळ चवीसाठी नव्हे, तर विविध प्रकारच्या आरोग्यलाभासाठी ही बारा महिने उपलब्ध होणारी भाजी गुणकारी असल्याचे तज्ज्ञ सांगतात. मेथीच्या भाजीच्या …

    Read More »
  • 8 February

    पाच रुपयांच्या सॉफ्टीतून 300 कोटींचे साम्राज्य

    आजच्या काळात स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. पण 90 च्या दशकात, जेव्हा स्त्रियांनी घराबाहेर पडणेही सोपे नव्हते, तेव्हा एका महिलेने बँकेतील सुरक्षित नोकरी सोडून उद्योजकतेच्या अनिश्चित वाटेवर पाऊल ठेवले. ही जिद्दीची कहाणी आहे दीपा पाई यांची, ज्यांनी 5 रुपयांच्या सॉफ्टीपासून सुरुवात करून आज 300 कोटी रुपयांचे ‌’हँग्यो‌’ आईस्क्रीमचे साम्राज्य उभे केले आहे. मंगळुरूमध्ये जन्मलेल्या दीपा पाच भावंडांमध्ये …

    Read More »
  • 8 February

    प्रश्नांचे मळभ कायम

    भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार शुल्कावरून (टॅरिफ) गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला तणाव निवळण्याची चिन्हे दिसत आहेत. दोन्ही देशांच्या धोरणांमध्ये झालेला हा मोठा बदल जागतिक व्यापारासाठी महत्त्वाचा सूचक मानला जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवर असा दावा केला आहे की, भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करारावर सहमती झाली आहे. या करारानुसार, अमेरिकेकडून आकारले जाणारे शुल्क 50 टक्क्‌‍यांवरून थेट …

    Read More »
  • 8 February

    चोख प्रत्युत्तराची गरज

    जागतिक क्रिकेटमध्ये सध्या निर्माण झालेला तणाव हा अत्यंत खेदजनक आणि निराशाजनक आहे. आगामी 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार होता, परंतु पाकिस्तान सरकारने भारताविरुद्ध खेळण्यास नकार देऊन आपल्या विनाकारण शत्रुत्वाचे दर्शन घडवले आहे. विशेष म्हणजे, या टी-20 विश्वचषकाचे आयोजन सुरुवातीला भारतातच होणार होते, मात्र पाकिस्तानने भारतात येण्यास आक्षेप घेतल्यामुळे श्र्ीलंकेला सह-आयोजक म्हणून समाविष्ट करण्यात आले. …

    Read More »
  • 8 February

    संसदेत महिला खासदारांचा रुद्रावतार

    संसदेत महिला खासदार असण्याकडे दुर्लक्ष करून भाजपचे वादग्रस्त खासदार निशिकांत दुबे यांनी नेहरू-गांधी कुटुंबावर संतापजनक व घाणेरडी वक्तव्ये केली. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी अभूतपूर्व गदारोळ झाला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 5 वाजता बोलणार होते. मात्र, विरोधी पक्षाच्या महिला खासदार पंतप्रधान मोदी यांच्या आसनाजवळ पोहोचल्या. या प्रचंड गदारोळामुळे कामकाज तहकूब झाले आणि यावेळी पंतप्रधानांचे संबोधन टळले. …

    Read More »
  • 8 February

    पारदर्शकता वाढवणारा निर्णय

    विविध विकासकामांसाठी केल्या जाणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि मोबदल्यासाठी शेतकऱ्यांची होणारी पायपीट थांबवण्यासाठी महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने आता जमिनीच्या संपादनाचा अंतिम निवाडा, भरपाईची रक्कम आणि संपूर्ण कार्यवाहीचा सारांश जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक केले आहे. तसेच भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना कायदा 2013 मधील तरतुदींची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. कायद्यात तरतूद असूनही हे निवाडे अनेक …

    Read More »
  • 8 February

    हरित महाराष्ट्राच्या स्वप्नपूर्तीसाठी…

    जागतिक तापमानवाढीचे चटके आणि निसर्गाच्या बदलत्या चक्रामुळे निर्माण झालेली संकटे पाहता, 2026 हे वर्ष महाराष्ट्रासाठी एका नव्या हरित क्रांतीची पहाट ठरणार आहे. विकासाच्या धावपळीत मानवाकडून निसर्गाचे जे नुकसान झाले, त्याची भरपाई करण्यासाठी राज्य सरकारने आता कंबर कसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026 ते 2031 या 5 वर्षांच्या काळात तब्बल 300 कोटी वृक्षलागवडीचे महाभयंकर पण तितकेच महत्त्वाचे उद्दिष्ट राज्यासमोर ठेवले …

    Read More »
  • 1 February

    रिमी सेनचा अभिनयाला रामराम

    दोन दशकांपूर्वी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री रिमी सेन सध्या एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. एकेकाळी बॉलिवूडमधील मोठ्या चित्रपटांचा भाग असलेली रिमी आता चंदेरी दुनियेपासून दूर असून तिने दुबईमध्ये रिअल इस्टेट एजंट म्हणून आपल्या नवीन करिअरची सुरुवात केली आहे. रिमीच्या प्रवासाची सुरुवात सुपरस्टार आमिर खान याच्यासोबतच्या एका गाजलेल्या जाहिरातीतून झाली होती. या जाहिरातीने तिला रातोरात घराघरांत …

    Read More »
  • 1 February

    छोटी गावे, मोठे चित्रपट

    बॉलीवूडमधील निर्माते आणि दिग्दर्शकांनी सिनेरसिकांना देश-विदेशातील नितांतसुंदर प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घडवले. स्वित्झर्लंड, मॉरीशस, लंडन, ऑस्ट्रेलिया यांसह जगभराची सफर रुपेरी पडद्यामधील दृश्यांमधून प्रेक्षकांना घडवून आणली आणि ती पाहून प्रेक्षकही मंत्रमुग्ध झाले. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये देशातील काही छोट्या गावांमध्येही काही चित्रपटांचे चित्रीकरण झाले. ‌‘स्वदेस‌’, ‌‘पीके,‌’, ‌‘बजरंगी भाईजान‌’, ‌‘गंगाजल‌’, ‌‘जब वी मेट‌’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणारा आपला गाव पाहून या गावच्या मातीशी नाळ …

    Read More »