लेख-समिक्षण

‌‘हा‌’ आहे पृथ्वीवरील शेवटचा रस्ता

जग कुठे संपतेय, जगाचे शेवटचं टोक कुठे आहे, असे प्रश्न फक्त लहान मुलांनाच नाही, तर सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी तरी येत असतात. जगाचे शेवटचे टोक कुठे आहे, हे माहिती नसले तरीही जगाचा शेवटचा रस्ता कोणता, हे निश्चित झाले आहे. या रस्त्याला जगातील अखेरचा रस्ता मानले जाते. या रस्त्यानंतर जग संपत असल्याचे देखील मानले जाते. पृथ्वीवरील या शेवटच्या रस्त्याचे नाव ‌‘ई-69‌’ असे आहे.
‌‘ई-69‌’ हा पृथ्वीवरील शेवटचा आणि सर्वात खतरनाक रस्ता मानण्यात येतो. ई-69 एक महामार्ग आहे. हा महामार्ग 14 किलोमीटर लांबीचा आहे. या महामार्गावर अशी अनेक ठिकाणे आहेत, जेथे एकट्य़ाने पायी चालण्यास किंवा वाहनाने प्रवास करण्यास मनाई आहे. पृथ्वीवरील हा शेवटचा आणि सर्वात डेंजर रस्ता नॉर्वेदेशात आहेत. आर्क्टिक म्हणजेच उत्तर ध्रुवाच्या वर्तुळाजवळ असलेला नॉर्वेहा देश जगातील त्या अर्थाने शेवटचा देश असून, या देशातील ई-69 हा पृथ्वीवरचा शेवटचा रस्ता मानला जातो. ई-69 रस्ता हा पृथ्वीचे उत्तर टोक आणि नॉर्वेला जोडणार आहे. या रस्त्याच्या पुढे कुठलाच रस्ता जात नाही. हा रस्ता संपल्यानंतर पुढे फक्त बर्फ आणि बर्फाळ समुद्र दिसून येतो. जगातील अखेरचा रस्ता असल्याने अनेक पर्यटकांना हा रस्ता पाहण्याची इच्छा असते. पण, या रस्त्यावरून प्रवास करणे इतके सहज शक्य नाही. या रस्त्यावर एकट्य़ाने जाणे किंवा ड्रायव्हिंग करण्यावर बंदी आहे. जर जगातील अखेरच्या रस्त्याची सैर करायची असेल, तर चार-पाच जणांच्या ग्रुपसोबतच जावे लागेल. त्याशिवाय या रस्त्यावर प्रवास करण्याची परवानगी दिली .

Check Also

शून्यातून बनला कोट्याधीश…

शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस यशाची कोणतीही शिखरं सर करू …