अभिनेता आणि दिग्दर्शक अंशुमन झा याने त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ’लकडबग्घा 2: द मंकी बिझनेस’ या बहुप्रतिक्षित ॲक्शन थ्रिलर चित्रपटाचे टीझर पोस्टर प्रदर्शित केले आहे. हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली आहे. ‘फर्स्ट रे फिल्म्स’ या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आणली असून, हा भाग इंडोनेशियमधील दुर्मिळ होत चाललेल्या ‘सेलेबेस क्रेस्टेड मॅकाक’ या वानरांच्या प्रजातीवर आधारित आहे. कोलकाता येथील प्राणीप्रेमी अर्जुन बक्षी याची कथा या भागात पुढे नेली जाणार असून, यावेळी तो प्राण्यांची तस्करी रोखण्यासाठी इंडोनेशियातील पश्चिम जावा येथील जंगलात लढा देताना दिसेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अंशुमन झा याने केले असून यामध्ये सारा जेन डायस, आदिल हुसेन आणि विक्रम कोच्चर यांच्यासह आंतरराष्ट्रीय मार्शल आर्ट्स स्टार सनी पांग आणि डॅन चुपाँग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. जून ते नोव्हेंबर या कालावधीत हा चित्रपट विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवला जाणार आहे. – जगदीश काळे
Check Also
गुप्तहेरपटांची कालातीत मोहिनी
बदलत्या राजकीय वास्तवासह, युद्धांच्या स्वरूपासह आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीसह गुप्तहेरपटांचे रूप बदलत गेले; मात्र …
पांचजन्य वृत्तपत्र