लेख-समिक्षण

दिवसभराची श्वासगणना शक्य आहे?

काही रोजच्या गोष्टी आपण गृहितच धरत असतो व त्याविषयी फारसा विचार करत नाही. या जगात पाऊल ठेवल्यापासून आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपला श्वासोच्छ्वास अखंडपणे चालूच असतो. आपण दिवसभरात किती वेळा श्वास घेतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? माणूस दिवसातून अर्थात 24 तासांमध्ये किती वेळा श्वास घेतो, याबाबतही अनेकांना कुतूहल वाटू शकते.
शरीरशास्त्र आणि जीवशास्त्राच्या अभ्यासातून या प्रश्नाची उकल होते. श्वासोच्छ्वासाच्या प्रक्रियेशिवाय मानवाला जिवंत राहणंच अशक्य असते. याच प्रक्रियेतून शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो आणि यातून शरीरात आवश्यक ऊर्जेची निर्मितीसुद्धा होते. एखाद्या व्यक्तीच्या श्वसनक्रियेचा वेग त्याचे वय, आरोग्य आणि शरीरयष्टीवर आधारित असतो. सहसा एखादी सुदृढ, प्रौढ व्यक्ती मिनिटाला 12 ते 20 वेळा श्वास घेते. याचाच अर्थ 24 तासांमध्ये ही व्यक्ती 17,000 ते 28,800 वेळा श्वास घेते. श्वासोच्छ्वासाची ही आकडेवारी मोजणं अतिशय कठीण असून, हा आकडासुद्धा सरासरीच्याच हिशेबाने घेण्यात आला आहे. कोणा एका व्यक्तीला कोणतीही शारीरिक समस्या असल्यास त्या व्यक्तीची श्वसनप्रक्रिया सुदृढ व्यक्तीपेक्षा वेगळी असू शकते. दैनंदिन जीवनात आरोग्याचा समतोल राखण्यासाठी व्यायाम आणि संतुलित आहारासमवेत श्वसनक्रियेमध्ये कोणताही अडथळा न येणे ही बाबही तितकीच महत्त्वाची.

Check Also

शून्यातून बनला कोट्याधीश…

शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस यशाची कोणतीही शिखरं सर करू …