लेख-समिक्षण

इन्स्टाग्रामचे भन्नाट फीचर

इंस्टाग्राम या फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग ॲपने अलीकडेच आपल्या युजर्ससाठी एक नवे आकर्षक आणि उपयुक्त फिचर आणले आहे.
या फिचरचे नाव रिस्टाईल विथ मेटा एआय असे असून याच्या मदतीने वापरकर्ते त्यांच्या जुन्या किंवा नवीन फोटोमध्ये लक्षणीय बदल करू शकतात आणि त्या फोटोला एक वेगळे व आकर्षक स्वरूप देऊ शकतात. हे फिचर केवळ फोटोपुरते मर्यादित नसून व्हिडिओ, रील्स आणि पोस्ट यांमध्येही वापरता येते. विशेषतः याच्या मदतीने तुम्ही फोटोमधील कपड्यांचा रंग बदलू शकता. याशिवाय यामध्ये मॅजिक रिमुव्हर नावाचा आणखी एक उपयुक्त फिचर देण्यात आला आहे, ज्याच्या साहाय्याने फोटोमधून अनावश्यक किंवा अज्ञात गोष्टी सहजपणे काढून टाकता येतात.
हे फिचर वापरण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोनमध्ये इंस्टाग्राम ॲप उघडा. त्यानंतर होमस्क्रीनवर वरच्या बाजूस दिसणाऱ्या प्लस चिन्हावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला स्टोरी किंवा पोस्ट या पर्यायांपैकी जे हवे ते निवडावे लागेल. जर तुम्हाला स्टोरी मध्ये एखादा फोटो टाकायचा असेल आणि त्या फोटोमध्ये काही बदल करायचे असतील, तर सर्वप्रथम तो फोटो स्टोरीमध्ये निवडा. हेच कार्य पोस्ट मध्येही करता येते.
स्टोरीसाठी फोटो निवडल्यानंतर वरच्या बाजूस तीन बिंदू असलेले चिन्ह दिसेल. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिस्टाईल हा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर एक टेक्स्ट बार दिसेल. त्या ठिकाणी तुम्हाला हव्या असलेल्या बदलाचा तपशील दिला जाईल. उदाहरणार्थ, जर तुम्हाला फोटोमध्ये असलेल्या कपड्यांचा रंग बदलायचा असेल, तर तुम्ही असे लिहू शकता – हा काळ्या रंगाचा ड्रेस गुलाबी रंगामध्ये बदला. अशा प्रकारे दिलेल्या सूचना वाचून मेटा एआय तुमच्या फोटोमध्ये अपेक्षित बदल करतो.
तुम्ही इंस्टाग्रामवर नेहमी सक्रिय असाल आणि दररोज नवनवीन पोस्ट किंवा स्टोरी शेअर करता, तर हे फिचर अत्यंत उपयुक्त ठरू शकते.

Check Also

जन्मानंतर बाळाचा रंग सावळा का होतो ?

बाळ जन्माला आले की, त्याचे गुलाबी-पांढरे रूप पाहून सर्वच जण सुखावतात. मात्र, काही आठवड्यांनंतर हळूहळू …