लेख-समिक्षण

चिनी रोबोडॉग वादामुळे भारताची नाचक्की

दिल्लीत केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे ‌‘एआय इम्पॅक्ट समिट 2026‌’ आयोजित करण्यात आली. या समिटमध्ये आधी भारतीय उद्योजकाच्या गॅझेट्सची चोरी आणि दुसऱ्या दिवशी चिनी कंपनीने तयार केलेला रोबोटिक डॉग स्वत: विकसित केल्याचा दावा एका भारतीय विद्यापीठाने केल्याने भारताची जगभरात नाचक्की झाली आहे. चीनने या ग्रेटर नोएडातील गलगोटिया विद्यापीठाच्या तंत्रज्ञान चोरीवर बातम्या जगभरात पोहोचवल्या आहेत. मोठा गाजावाजा करीत केंद्र सरकारच्या …

Read More »

‌‘एआय समिट‌’ ची सांगता,पण…

नवी दिल्लीतील ‌’इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026‌’ च्या निमित्ताने सध्या देशात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) सामर्थ्याची आणि त्यातील गुंतवणुकीची मोठी चर्चा सुरू आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील हा बदल जागतिक अर्थव्यवस्थेच्या नव्या समीकरणांची नांदी मानला जात असला, तरी त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एकीकडे अब्जावधी डॉलरच्या गुंतवणुकीचे संकेत मिळत असताना, दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने या तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगाबद्दल व्यक्त केलेली चिंता अत्यंत कळीची आहे. …

Read More »

महामार्गावरील धावपट्टीचा संदेश

आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहिले तर सिंगापूर, तैवान आणि स्वीडन सारख्या देशांनी आपल्या महामार्गांचा वापर लष्करी धावपट्टया म्हणून करण्याचे कसब आधीच आत्मसात केले आहे. भारतानेही त्याच धर्तीवर आपली सुरक्षा व्यवस्था अधिक लवचिक बनवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील मोरान येथे ‌‘सी-130 जे‌’ सुपर हर्क्युलिस विमानातून ज्या प्रकारे आपत्कालीन लँडिंग सुविधेवर (ईएलएफ) पदार्पण केले, ती प्रतीकात्मक कृती चीनच्या सीमेवर भारताच्या वाढत्या हवाई …

Read More »

विशाल झळकणार नव्या रुपात

मॅडॉक फिल्म्सच्या थरारक आणि विनोदी विश्वात आता एका नव्या अध्यायाची नांदी झाली असून, ‌‘मर्दानी 2‌’ मध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारा अभिनेता विशाल जेठवा एका नव्या रूपात समोर येण्यास सज्ज झाला आहे. विशालने ‌‘शक्ती शालिनी‌’ हा बिग बजेट चित्रपट स्वीकारला असून, यात तो अभिनेत्री अनीत पड्डासोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. दिनेश विजन यांच्या या हॉरर-कॉमेडी युनिव्हर्सने आजवर ‌‘स्त्री‌’ आणि …

Read More »

मौनातून गजर करणारा ‌‘गांधी टॉक्स‌’

आजच्या डिजिटल युगात, जिथे रिल्स आणि शॉर्ट व्हिडिओंची सरबत्ती सतत सुरू असते, तिथे दोन तासांहून अधिक काळ मूक चित्रपट पाहणे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यासारखे आहे. किशोर पांडुरंग बेळेकर दिग्दर्शित ‌‘गांधी टॉक्स‌’ हा असाच एक धाडसी प्रयोग आहे, जो मौनालाच आपली भाषा बनवतो आणि संवादहीनतेला शक्तिशाली कथनाचे साधन म्हणून वापरतो. हा चित्रपट केवळ निव्वळ मनोरंजन नाही, तर तो एक असा अनुभव …

Read More »

कहाणी एका निसर्गवेड्याची

बेंगळुरू सारख्या शहरात आयटीसी इन्फोटेकसारख्या मोठ्या कंपनीत तब्बल एक दशक काम केल्यानंतर शिहाब कुन्हाहम्मद यांनी 2021 मध्ये आपल्या कॉर्पोरेट जीवनाला पूर्णविराम दिला. त्यांच्या या निर्णयामागे केवळ निसर्गाची ओढ नव्हती तर पर्यावरणाप्रती असलेली एक खोल बांधिलकी होती. केरळमधील आपल्या आजीसोबत बालपणी झाडे लावताना मिळालेले संस्कार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर शिहाब यांनी तामिळनाडूतील शूलगिरी येथील आपल्या शेतावर मुक्काम …

Read More »

कांदा साठवायचा कसा ?

स्वयंपाकघरात वापरला जाणारा कांदा योग्य प्रकारे साठवून ठेवणे खूप गरजेचे असते. पावसाळ्याच्या दिवसांत ओलाव्यामुळे आणि हवेतील आर्द्रतेमुळे कांदा सडण्याची आणि कुजण्याची शक्यता सर्वाधिक असतो. कांदा साठवणुकीची सर्वांत मोठी अडचण म्हणजे तो फ्रिजमध्ये ठेवता येत नाही. चुकीच्या पद्धतीने ठेवल्यास तो लवकर अंकुरित होतो. अनेकदा त्याला बुरशी येते. असा कांदा वापरणे हानिकारक ठरू शकते. याउलट योग्य साठवणुकीमुळे कांद्याची चव, त्यातील गुणधर्म टिकून …

Read More »

सर्वांत लहान तापमापक

सर्वात लहान किंवा मोठ्या आकाराच्या वस्तू नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेत असतात. सध्याच्या नॅनो टेक्नॉलॉजीच्या काळात अत्यंत सूक्ष्म अशा वस्तूही बनवल्या जात आहेत. वैज्ञानिकांनी जगातील सर्वात लहान तापमापक तयार केलेला असून, तो मानवी केसापेक्षा वीस हजार पटींनी लहान आहे. डीएनएच्या रचनांचा वापर करून तो तयार केला आहे. विशिष्ट तापमानाला घडी घातल्या जाणाऱ्या तर विशिष्ट तापमानाला उलगडत जाणाऱ्या जनुकांचा वापर त्यात …

Read More »

मुंबईच्या तरुणाची मिलानपर्यंत भरारी

मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या 24 वर्षीय शुभम वाडकर या तरुणाने जागतिक फॅशन विश्वात केलेली कामगिरी केवळ कौतुकास्पद नाही, तर प्रेरणादायी आहे. सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर अवघ्या 30 हजार रुपये पगाराची नोकरी सोडून त्याने ‌’रॅम्प‌’वर पाऊल ठेवले आणि आज तो जागतिक ब्रँड्सचा चेहरा बनला आहे. शुभमने सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एका बांधकाम कंपनीत नोकरी स्वीकारली होती, जिथे त्याला वार्षिक …

Read More »

रीलवेडात हरवलेला विवेक

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग झाला असला, तरी त्याचे भीषण परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. समाजमाध्यमांवर स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात माणूस कशा प्रकारे आपल्या विवेकाचा बळी देत आहे, याचे ज्वलंत उदाहरण उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात घडलेल्या घटनेतून दिसते. एका महिलेने केवळ रील बनवण्यासाठी गळफास घेण्याचे नाटक केले, परंतु दुर्दैवाने तिचा जीव खरोखरच गेला. ही घटना …

Read More »