लेख-समिक्षण

‌‘पॅनेल इंटरव्ह्यू‌’मध्ये बाजी मारायचीय?

पॅनेल इंटरव्ह्यू म्हणजेच एकाच वेळी अनेक मुलाखतकारांसमोर (पॅनेल) सामोरे जाणे, हा बहुतांश उमेदवारांसाठी अत्यंत तणावाचा आणि आव्हानात्मक प्रसंग असतो. जेव्हा एका बाजूला तुम्ही एकटे आणि दुसऱ्या बाजूला तीन ते पाच तज्ज्ञ अधिकारी बसलेले असतात, तेव्हा आत्मविश्वास डगमगणे स्वाभाविक आहे. मात्र, योग्य रणनीती, मानसिक पूर्वतयारी आणि संवाद कौशल्याच्या जोरावर या प्रकारच्या मुलाखतीत सहज यश मिळवणे शक्य आहे. अनेक मोठ्या कंपन्या आणि …

Read More »

वधूंसाठीच्या ब्लाऊजचे वैविध्य

लग्नाचा मोसम म्हणजे चमक, स्टाईल आणि रॉयल वाईब्स. जेव्हा वधूच्या (ब्राइडच्या) लूकचा विचार केला जातो, तेव्हा प्रत्येक बारीक तपशील महत्त्वाचा असतो आणि त्यातही ब्लाउजची डिझाईन सर्वात खास असते. मोत्यांची लटकन असलेला ओपन बॅक ब्लाउज असो, काचेची कढई असो किंवा गडद लाल आणि सोनेरी रंग… हे सर्व मिळून वधूला दिवसाची राणी बनवतात. असे ब्लाउज केवळ पारंपारिक भावनाच देत नाहीत, तर आधुनिक …

Read More »

सर्वात भयावह आणि महाकाय पक्षी

सुमारे 1 कोटी 20 लाख वर्षांपूर्वी या पृथ्वीतलावर एक महाकाय व भयावह पक्षी अस्तित्वात होता. हा आतापर्यंतचा ज्ञात असा सर्वाधिक मोठ्या आकाराचा, आक्रमक पक्षी आहे. त्याची उंची तब्बल नऊ फुटांची होती! आता अशा एका प्रागैतिहासिक काळातील पक्ष्याचे जीवाश्म सापडले आहेत. त्याच्या जीवाश्मभूत पायाच्या थ्रीडी ॲनालिसिस वरून असे दिसून येते की, अशा भयावह पक्ष्याची सध्याच्या मगरींसारख्या तत्कालीन प्राण्याने शिकार केली होती. …

Read More »

प्रयत्न सोडू नका

‘रील्स‌’ बनवणाऱ्या असहाब अहमद अन्सारी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षेत अपयश आल्यानंतरही जिद्द न हारता कर्मचारी निवड आयोगाच्या (एसएससी सीजीएल) परीक्षेत मोठे यश मिळवले आहे. उत्तर प्रदेशातील टांडा या छोट्या गावातील रहिवासी असलेल्या असहाब यांनी शालेय शिक्षणात उत्तम गुण मिळवले होते. त्यानंतर कोटा येथे जाऊन त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी केली आणि पुढे अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून अभियांत्रिकीची (बीटेक) पदवी पूर्ण …

Read More »

तमिळनाडूतील राजकीय रंग

तामिळनाडूच्या राजकारणामध्ये सध्या अत्यंत अभूतपूर्व आणि वेगाने घडणाऱ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. प्रसिद्ध अभिनेते सी जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील तमिळगा वेट्री कषगम (टीव्हीके) पक्षाचे सरकार सत्तेवर येऊन अवघे 2 आठवडे उलटले आहेत. मात्र, या अत्यंत कमी कालावधीतच विजय यांच्या विजयाने तामिळनाडूतील तब्बल 2 दशके जुनी द्रमुक (डीएमके) आघाडी पूर्णपणे मोडीत काढली आहे. त्याच वेळी, राज्यातील 54 वर्षे जुना ऐतिहासिक …

Read More »

विनेशला न्याय,पण

क्रीडा क्षेत्रात एखाद्या खेळाडूची पात्रता किंवा अपात्रता ठरवताना अनेकदा त्याच्या अंगभूत क्षमतेपेक्षा नियमांचा बागुलबुवा जास्त केला जातो. काही वेळा तर सक्षम खेळाडूला केवळ आकसापोटी किंवा पूर्वग्रहामुळे मैदानातून बाहेर ठेवण्यासाठी नियमांचे निमित्त पुढे केले जाते. दिल्ली उच्च न्यायालयाने भारतीय कुश्ती महासंघाच्या म्हणजेच डब्लूएफआयच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत दिलेली चपराक क्रीडा क्षेत्रातील राजकारणाचा बुरखा फाडणारी आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, आपल्या …

Read More »

‌‘एसआयआर‌’ घटनाबाह्य नाही ः सर्वोच्च न्यायालय

बिहार, पश्चिम बंगालमधील मतदार याद्यांच्या विशेष तपासणीवरून सुरू असलेल्या मोठ्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवारी आपला अंतिम आणि ऐतिहासिक निकाल सुनावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, एसआयआर प्रक्रियेत कोणतीही त्रुटी नव्हती. त्यामुळे त्याला घटनाबाह्य घोषित करता येणार नाही. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळताना स्पष्ट केले की, केवळ ही प्रक्रिया मतदार यादी सुधारण्याच्या सामान्य प्रक्रियेपेक्षा थोडी …

Read More »

कर्नाटकातील खांदेपालटाचा अन्वयार्थ

कर्नाटकामध्ये अखेर सत्तापालट झाला असून सिद्धरामैया यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. प्रदीर्घ ओढाताण आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर त्यांनी आपली खुर्ची डी. के. शिवकुमार यांच्याकडे सोपवली आहे. मे 2028 पर्यंत शिवकुमार हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर या सत्तांतराची रणनीती आखली जात होती. त्याला अखेर सिद्धरामैया यांनी संमती दिली. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असला, …

Read More »

मॅनिफेस्टेशनचा बोलबाला

हल्ली सोशल मीडियावर रंगणाऱ्या पॉडकास्टमध्ये आणि रिल्समध्ये मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ ॲट्रॅक्शन यांवर आधारीत व्हिडिओ, मुलाखती यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सकारात्मक विचारांमुळे माणसाच्या आयुष्याला योग्य दिशा मिळते, आनंदी आणि निरोगी जगण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन गरजेचा आहे, हे खरेच आहे; पण विचारांना कृतीची जोड न देता केवळ काल्पनिक क्रियांनी इच्छित गोष्टी साध्य होतात असे मानणे चुकीचे आहे. मानसशास्त्रज्ञ गॅब्रिएल ओटिंजेन यांनी मेंटल …

Read More »

अजय-अनुभवचे पॅचअप!

बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा तब्बल 18 वर्षांनंतर एका मोठ्या बजेटच्या ॲक्शन चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत. 2007 मधील ‌‘कॅश‌’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्यानंतर या दोघांमध्ये कोणताही संपर्क नव्हता, मात्र आता त्यांच्यातील दुरावा संपला आहे. अनुभव सिन्हा यांनी स्पष्ट केले होते की, त्यांच्यात वैयक्तिक असा कोणताही वाद नव्हता, तर तो मतभेद चित्रपटाचे निर्माते आणि …

Read More »