अँटी-स्लिप मॅटिंग किंवा पॅड वापरा : डोअरमॅट घसरू नयेत यासाठी हा सर्वात परिणामकारक आणि सुरक्षित उपाय आहे. बाजारात सहज मिळणाऱ्या अँटी-स्लिप मॅटिंग किंवा रग पॅड खास डोअरमॅटखाली घालण्यासाठी डिझाइन केलेले असतात. हे पॅड तुम्ही डोअरमॅटच्या आकारानुसार कापून वापरू शकता. ते डोअरमॅटला जमिनीशी घट्ट पकड देतात, त्यामुळे तो सरकत नाही. हे पॅड वॉशेबल असल्यामुळे पुन्हा पुन्हा वापरता येतात.
डबल-साइडेड टेप वापरा ः हा एक तात्पुरत पर्याय आहे. बाजारात मिळणारा चांगल्या गुणवत्तेचा डबल-साइडेड टेप घ्या. डोअरमॅटच्या चारही कोपऱ्यांना आणि मध्यभागी टेपचे छोटे तुकडे चिकटवा. त्यानंतर डोअरमॅट जमिनीवर घट्ट दाबून चिकटवा. यामुळे डोअरमॅट हालचाल करत नाही. पण बरेचदा या टेप काढताना डोअरमॅट फाटण्याची किंवा त्यातील धागे निघण्याची शक्यता असते.
जड आणि मजबूत डोअरमॅट निवडा : डोअरमॅटचे वजन आणि बनावट यावर त्याचे घसरणे अवलंबून असते. त्यामुळे शक्यतो थोडा जड डोअरमॅट निवडा. डोअरमॅटचा खालचा भाग रबरचा किंवा घसरणार नाही असा असावा. नारळाच्या शेंड्यांनी किंवा ज्याला काथ्या म्हणतात त्यापासून बनवलेले जाडसर डोअरमॅट टिकाऊ असून चांगली पकड देतात.
जुना रबर मॅट किंवा योगा मॅट वापरा : घरात असलेल्या जुन्या वस्तूंचा पुनर्वापर करूनही हा प्रश्न सोडवता येतो. एखादा जुना रबर मॅट, योगा मॅट किंवा जाडसर रबर शीट घ्या. ती डोअरमॅटच्या आकारात कापून त्याच्या खाली अंथरा. यामुळे डोअरमॅट सरकणार नाही आणि घसरणे टाळले जाईल. हा एक स्वस्त, पर्यावरणस्नेही आणि सहज करता येणारा उपाय आहे.
सिलिकॉन कॉल्क किंवा हॉट ग्लू वापरा : हा उपाय दीर्घकाळासाठी उपयुक्त आहे. डोअरमॅटच्या खालच्या भागावर सिलिकॉन कॉल्क किंवा हॉट ग्लूचे थर लावा. ते सुकल्यावर डोअरमॅट जमिनीशी चांगला चिकटतो. यामुळे तो सरकत नाही आणि दीर्घकाळ तसाच राहतो. मात्र, नंतर तो काढायचा झाल्यास थोडी मेहनत लागते.
Check Also
जन्मानंतर बाळाचा रंग सावळा का होतो ?
बाळ जन्माला आले की, त्याचे गुलाबी-पांढरे रूप पाहून सर्वच जण सुखावतात. मात्र, काही आठवड्यांनंतर हळूहळू …
पांचजन्य वृत्तपत्र