‘धुरंधर’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर रणवीर सिंग याने ‘डॉन 3’ मधून अधिकृतपणे माघार घेतल्याचे वृत्त आहे. रणवीरने तांत्रिक मतभेदांचे कारण देत हा चित्रपट सोडला आहे. मात्र, यामुळे निर्मात्यांचे (एक्सेल एंटरटेन्मेंट) मोठे नुकसान झाले आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी रणवीरकडे 40 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. प्री-प्रॉडक्शनवर झालेला खर्च रणवीरने भरून द्यावा, असा निर्मात्यांचा दावा आहे. रणवीर बाहेर पडल्यानंतर पुन्हा एकदा शाहरुख खानचे नाव चर्चेत आले. शाहरुखने परतण्यासाठी दिग्दर्शक ॲटली (जवान फेम) यांची अट घातल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फरहान अख्तरने शाहरुखशी कोणताही संपर्क साधलेला नाही. ‘डॉन’ ही फरहानची स्वतःची फ्रँचायझी असल्याने तो दिग्दर्शन दुसऱ्या कोणाकडे सोपवण्याची शक्यता कमीच आहे. सर्वात खळबळजनक बाब म्हणजे, ‘डेक्कन क्रॉनिकल’च्या रिपोर्टनुसार, इतर कोणत्याही अभिनेत्याकडे जाण्यापेक्षा फरहान स्वतः या पात्राला पडद्यावर जिवंत करू शकतो. जर हे खरे ठरले, तर दिग्दर्शनासोबतच तो मुख्य भूमिकेतही दिसेल.- राधिका बिवलकर
Check Also
रामायण, राम, रणबीर आणि वाद
सध्या बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘रामायर्ण या चित्रपटाच्यानिमित्तान रणीबर कपूरने साकारलेल्या रामाच्या व्येितेखेवरुन वाद सुरू आहेत. वास्तविक …
पांचजन्य वृत्तपत्र