लेख-समिक्षण

वांगचुकांच्या सुटकेचा अर्थ

लडाखमधील पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (एनएसए) अटक करण्यात आली होती. मात्र, आता त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेत केंद्र सरकारने घुमजाव केले आहे. गृहमंत्रालयाने वांगचुक यांच्यावर लादलेला एनएसए रद्द केला आहे. त्यामुळे सुमारे सहा महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्यांचा सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला. सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या अधिकारांचा वापर करून सोनम यांची नजरकैद …

Read More »

वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था

देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या सुखोई विमान दुर्घटनेत हवाई दलाच्या दोन वैमानिकांना वीरमरण आले. त्याआधी रांचीजवळ झालेल्या एअर ॲम्ब्युलन्सच्या अपघातात रुग्णासह सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या काही आठवड्यांपूर्वी बारामतीमध्ये (महाराष्ट्र) चार्टर विमान कोसळून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचे निधन झाले. तसेच, गेल्या वर्षी जून महिन्यात अहमदाबादमध्ये एअर …

Read More »

पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू या चार राज्यांची आणि पदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकीचीदेखील घोषणा करण्यात आली. तसेच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांचादेखील कार्यक्रम जाहीर करण्यात आला. आसाम, केरळ, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होतील, तर पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होतील. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी …

Read More »

ऊर्जा राजनयाचे यश

होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये जगाची तेलजहाजे अडकून पडलेली असताना भारताने आपली जहाजे सोडवून आणण्यात यश मिळवले आहे. हा भारताचा राजनैतिक आणि कूटनीतीक विजय आहे. भारताची ही मुत्सद्देगिरी केवळ तेलापुरती मर्यादित नाही, तर ती प्रादेशिक स्थिरतेसाठीही आहे. पश्चिम आशियात लाखो भारतीय कामगार वास्तव्यास आहेत, ज्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही भारत सरकारवर आहे. कोणत्याही प्रकारचा लष्करी संघर्ष या भारतीयांच्या आयुष्याला धोक्यात टाकू शकतो. त्यामुळेच भारताने लष्करी …

Read More »

कसोटी सामूहिक संयमाची

आपण सर्वजण कधी ना कधी वैयक्तिक आणि कौटुंबिक संकटांतून जातो, त्यांचा सामना करतो, त्यातून शिकतो आणि पुढे जातो. समाजाकडूनही हीच अपेक्षा असते. परंतु काय ही अपेक्षा बहुतेकदा पूर्ण होत नाही. याचे कारण सामूहिक परिणाम करणारी एखादी गोष्ट घडते किंवा संकट येते तेव्हा अविश्वासाचे, भीतीचे आणि लोभाचे चित्र सर्वदूर दिसते. त्यामुळेच एखादी अफवा पसरते आणि आपण विचार न करता तिच्या मागे …

Read More »

‌‘लाहोर 1947‌’चे नाव बदलणार?

बॉलीवूड अभिनेता आमिर खानच्या निर्मिती संस्थेद्वारे साकारण्यात येत असलेल्या आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत असलेल्या ‌‘लाहोर 1947‌’ या चित्रपटाच्या शीर्षकात बदल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असतानाच समोर आलेल्या या माहितीनुसार, आता हा चित्रपट ‌‘बटवारा 1947‌’ या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. फाळणीच्या काळातील भीषण वास्तव आणि त्यातील भावनिक खोली अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी …

Read More »

‌‘बूंग‌’च्या सन्मानाचा अन्वयार्थ

यंदाच्या बाफ्टा (ब्रिटीश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स) पुरस्कार सोहळ्यात मणिपुरी भाषेतील ‌’बूँग‌’ या चित्रपटाने ‌’सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट‌’ गटात बाजी मारून भारतीय सिनेसृष्टीची मान उंचावली आहे. लक्ष्मीप्रिया देवी यांचा दिग्दर्शिका म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. मुख्य भूमिकेत असणारा गुगुन किपगेन हा बालकलाकार स्वतः कुकी-झो समुदायाचा असून त्याने यात मैतेई मुलाची भूमिका साकारली आहे. आपल्या हरवलेल्या वडिलांना परत …

Read More »

नकारात्मकतेवर विजय मिळवण्याचा राजमार्ग

मानवी जीवनात चढ-उतार हे येतच असतात आणि अशा वेळी मनाची शांतता भंग पावून नकारात्मक विचारांचे जाळे विणले जाणे स्वाभाविक आहे. अनेकांना असे वाटते की आपण प्रयत्नांनी हे वाईट विचार काढून टाकावेत आणि केवळ सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करावे. मात्र, जगप्रसिद्ध आध्यात्मिक मार्गदर्शक सद्गुरु या विषयावर एक अतिशय वेगळा आणि वास्तववादी दृष्टिकोन मांडतात. त्यांच्या मते, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा जबरदस्तीने त्याग …

Read More »

कोल्ड फेशियल म्हणजे काय ?

आपल्या काही वर्षांमध्ये कोल्ड फेशियलचा ट्रेंड लोकप्रिय झाला आहे. अनेक महिला आणि सेलिब्रिटी बर्फाच्या थंड पाण्यात चेहरा काही सेकंदांसाठी बुडवतात. © पूर्वी फेशियल प्रक्रियेमध्ये चेहऱ्यावर थंड टॉवेल ठेवण्याची पद्धत प्रचलित होती. याचा उद्देश सूज कमी करणे, डोळ्यांखालील काळी वर्तुळे घटवणे आणि त्वचेला ताजेतवाने बनवणे असा असायचा. आता या प्रक्रियेला अधिक थेट आणि प्रभावी स्वरूप दिले गेले असून बर्फाच्या पाण्यात चेहरा …

Read More »

दिवसभराची श्वासगणना शक्य आहे?

काही रोजच्या गोष्टी आपण गृहितच धरत असतो व त्याविषयी फारसा विचार करत नाही. या जगात पाऊल ठेवल्यापासून आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपला श्वासोच्छ्वास अखंडपणे चालूच असतो. आपण दिवसभरात किती वेळा श्वास घेतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? माणूस दिवसातून अर्थात 24 तासांमध्ये किती वेळा श्वास घेतो, याबाबतही अनेकांना कुतूहल वाटू शकते. शरीरशास्त्र आणि जीवशास्त्राच्या अभ्यासातून या प्रश्नाची उकल होते. …

Read More »