आजच्या युगात इंटरनेट हा जणू आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. एक काळ असा होता, जेव्हा लोक टूजी इंटरनेट वापरून देखील खूश होते, पण आता फोरजी इंटरनेट स्पीड देखील लोकांना कमी पडू लागली आहे. कारण, आता रोजच्या जीवनातील सर्वच गोष्टी इंटरनेटशी संबंधित आहेत. मनोरंजक कामासाठी जसे व्हिडीओ, सिनेमे पाण्यासाठी देखील इंटरनेट महत्त्वाची भूमिका बजावतो, पण तरीही असे काही देश …
Read More »छोट्या प्रयोगातून 300 कोटींचे साम्राज्य!
मनीष चौधरी हे नाव स्किन सायन्स या नामांकित ब्रँडचे सह-संस्थापक आहेत. भारतातील सर्वात विश्वासार्ह डी 2 सी (डायरेक्ट टू कंज्यूमर) पर्सनल केअर ब्रँड्समध्ये आज या कंपनीची गणना होते. त्यांचा हा प्रवास एका रात्रीत मिळालेल्या यशाचा नाही. हा प्रवास आहे शिकण्याचा, प्रयोग करण्याचा, अपयशाचा आणि स्वतःला बदलून हळूहळू एक असा ब्रँड उभा करण्याचा, जो आज जगभरातील लाखो ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. …
Read More »दूरगामी परिणाम करणारा निकाल
सर्वोच्च न्यायालयाने शिक्षण हक्क कायद्यांतर्गत गरीब आणि वंचित मुलांसाठी 25 टक्के जागा मोफत राखीव ठेवण्याची प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यादरम्यान, न्यायालयाने मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या एका जुन्या विधानाचा उल्लेख केला. वंचित समूहातील मुले खाजगी शाळांच्या वातावरणात कशा प्रकारे जुळवून घेतील, अशी चिंता त्यावेळी व्यक्त करण्यात आली होती. त्यावर भाष्य करताना न्यायालयाने म्हटले की, ही चिंता तेव्हाच दूर होऊ …
Read More »‘हेट स्पीच’ला चपराक
देशातील राजकारणात स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी काही नेते आणि संघटना अनेकदा द्वेषपूर्ण विधानाचा म्हणजेच हेट स्पीचचा आधार घेताना दिसतात. याच साखळीत तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधि स्टालिन यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सनातन धर्माबाबत त्यांनी केलेल्या प्रतिकूल टिप्पणीला मद्रास उच्च न्यायालयाने आता अधिकृतपणे हेट स्पीच मानले आहे. 2023 मधील या प्रकरणाची दखल वास्तविक खूप आधीच घेतली जायला हवी होती. विशेष म्हणजे …
Read More »दावोसमध्ये 14.50 लाख कोटींचे करार
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे वार्षिक बैठकीत पहिल्याच दिवशी तब्बल 14 लाख 50 हजार कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले. या गुंतवणुकीसोबतच राज्यात 15 लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाच्या माध्यमातून यंदा विविध विभागांनी आणि विविध क्षेत्रातील उद्योगांच्या प्रतिनिधी समवेत मुख्यमंत्री फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. …
Read More »अर्थसंकल्प दिलासादायक ठरेल?
येत्या 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून सादर होणारे 2026-27 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प अनेकार्थांनी महत्त्वाचा असणार आहे. हा अर्थसंकल्प देशाच्या आर्थिक परिस्थितीला ऐतिहासिक वळण देणारा असेल. अर्थमंत्र्यांना मध्यमवर्गाची क्रयशक्ती वाढवण्याच्या अनेक वर्षांच्या जुन्या अपेक्षा, गुंतवणूकदारांच्या आकांक्षा आणि सरकारच्या दिलासा व वेगवान विकासाच्या रणनीतीनुसार संतुलित, दूरदर्शी आणि संवेदनशील बजेटसाठी अतिशय विचारपूर्वक ताळमेळ राखावा लागेल. सामान्य माणसासाठी दिलासा, बाजारासाठी गती आणि …
Read More »रथसप्तमीचा भावार्थ
माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी ‘रथसप्तमी’ हा उत्सव देशभरात विविध पद्धतींनी साजरा केला जातो, पण त्यामागील भावना समान आहे. उत्तर भारतात छठपूजेसारखी सूर्योपासना, दक्षिणेत भव्य मंदिर विधी, पश्चिम भारतात तिळगुळाचे पदार्थ,तर पूर्व भारतात कृषीपर परंपरा, असे त्याचे विविध रंग दिसतात. तरीही सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, निसर्गाशी सुसंवाद साधणे आणि जीवनातील अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संकल्प करणे, हाच रथसप्तमीचा केंद्रबिंदू आहे. मकर …
Read More »मुक्या प्राण्यांप्रती मिका सिंहचे दातृत्व
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मीका सिंह आपल्या गाण्यांसोबतच सढळ हाताने केलेल्या मदतीसाठीही ओळखला जातो. सध्या उत्तर भारतात असलेल्या कडाक्याच्या थंडीत भटक्या कुत्र्यांचे हाल होत असल्याचे पाहून मीका सिंहने त्यांच्या कल्याणासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. मीकाने आपल्या मालकीची 10 एकर जमीन भटक्या कुत्र्यांच्या निवाऱ्यासाठी आणि त्यांच्या देखभालीसाठी दान करण्याचा संकल्प केला आहे. देशभरात भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर आणि सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या …
Read More »खलनायकीचा नवा सुवर्णकाळ
सध्याच्या चित्रपटसृष्टीत खलनायक केवळ काळ्या-पांढऱ्या रंगातील नैतिक विभागणीपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो आता अँटी-हिरो, ग्रे-झोन आणि गुन्हेगारी केंद्रित कथानकाचा प्रतीक बनला आहे. ‘के.जी.एफ.’, ‘पुष्पा’, ‘मिर्झापूर’, ‘छावा’ आणि ‘ॲनिमल’ यांसारख्या कलाकृतींनी हा ट्रेंड अधिक मजबूत केला. बॉक्स ऑफिसची आकडेवारी सांगते की, प्रेक्षक आता या गडद आणि हिंसक पात्रांमध्ये थरार शोधत आहेत. या पार्श्वभूमीवर अक्षय खन्ना आणि बॉबी देओल यांनी ‘स्टार व्हिलन’चे …
Read More »मातीतले खेळ
मैदानी खेळ म्हणजे कोणते, असा प्रश्न हल्ली एखाद्या शाळकरी मुलाला विचारला, तर कदाचित मैदानी म्हणजे काय असा प्रतिप्रश्न येण्याची भीती वाटते. मोकळी मैदानेच कमी झाल्याने अनेक शाळांनाही मोठी ग्राऊंड्स नसतात. जी काही मैदाने असतात, त्यावर संध्याकाळी पैसे भरून कॅम्प चालवले जातात. त्यामुळे रस्त्यावर क्रिकेट, फुटबॉल खेळणे किंवा इतर दंगामस्ती करण्याची आपल्या पिढीने घेतलेली मजा कदाचित यापुढे मुलांना घेता येईल, की …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र