अखेर केंद्रीय लोकसेवा आयोगाने वादग्रस्त व नखरेल प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पूजा खेडकर या नागरी सेवा परीक्षा नियम 2022 नुसार दोषी ठरल्याचे आयोगाने म्हटले आहे. त्याचबरोबर पूजा खेडकर यांना भविष्यात सर्व परीक्षा देण्यास मनाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र कॅडरच्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. चुकीची माहिती …
Read More »बस झाले आता
महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये अलीकडील काळात एक चिंतेची बाब समोर येत आहे. राज्यामध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणींवर हल्ले करण्याचा एक घातक प्रवाह पुन्हा डोके वर काढताना दिसत आहे. गेल्या वर्षी घडलेले दर्शना पवारचे प्रकरण असो, पुण्यामध्ये तरुणीवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न असो, वसईतील तरुणीची निर्घृण हत्या असो यांसारख्या घटनांमधून मुलींना नकार देण्याचा अधिकार नाही, हा पुरुषसत्ताक अहंकार नव्याने बळावत चालल्याचे दिसू लागले आहे. …
Read More »मनात उमटतो श्रावण
श्रावण आला की मनात निराळ्या लहरी उमटू लागतात. त्याच्या उन पावसाच्या खेळाबरोबर मनही आशा – निराशेच्या लपंडावात रमतं. निसर्गानेही श्रावण महिना तयार केला असेल तो मानवी मनाचं प्रतिबिंब म्हणूनच. त्याच्या आगमनाने पुढच्या सणांची चाहूल लागते,जशी मनाला एखाद्या पुढच्या चांगल्या घटनेचे वेध लागून त्यात उत्साह भरावा. पावसाचं मळभ दूर करून त्याची रिमझिम जशी निसर्गात बदल घडवून आणते तसंच श्रावणाच्या आगमनाने येणार्या …
Read More »पैशांपेक्षाही व्यक्तिरेखा महत्त्वाची
करीना कपूर खान ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट केले. दोन दशकांहून अधिक काळ ती चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. या काळात करिनाने इंडस्ट्रीतील सर्व मोठ्या कलाकारांसोबत काम केले. नुकतेच, एका मुलाखतीदरम्यान, तिने चित्रपटात काम करण्यासाठी फी किती घेतली जाते याबद्दल मनोरंजक उत्तर दिले आहे. प्रत्येक चित्रपटासाठी 10-15 कोटी रुपये फी घेणार्या अभिनेत्रींपैकी ती एक आहे …
Read More »कहाणी अष्टपैलू नायिकेची
फर्ज, रॉकी, बॉबी आणि लव्ह स्टोरीसारख्या गाजलेल्या अनेक चित्रपटात काम करणार्या अरुणा इराणी या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जातात. अरुणा यांनी इंडस्ट्रीमध्ये सहा दशकांपेक्षा अधिक काळ काम केले. हिंदी, कन्नड, मराठी आणि गुजराती भाषेत पाचशेपेक्षा अधिक चित्रपटात काम करणार्या अरुणा इराणी यांच्या अभिनयाची ताकद लक्षात येते. फिल्मफेअर अवॉर्डसमध्ये सर्वोत्तम सहायक अभिनेत्रीच्या श्रेणीत त्यांना विक्रमी दहावेळेस नामांकन मिळाले होते. 1985 मध्ये ‘पेट …
Read More »अशा पध्दतीने मिळवा डेटा
डेटा मिळवण्यासाठी आपल्याला अगोदेर गूगल प्ले स्टोअरवर जावे लागेल आणि पँडोरा रिकव्हरी सॉफ्टवेअर डाऊनलोड करावा लागेल. पँडोरा डाऊनलोड झाल्यानंतर हे सॉफ्टवेअर आपल्याला ओपन करावे लागेल. जी विंडो आपल्यासमोर दिसत आहे, त्यात आपण खाली दिलेल्या नेक्स्ट ऑप्शनवर टॅब करावे लागेल. क्लिक करताच आपल्यासमोर आलेल्या अटी आणि शर्तींची विंडो ओपन होईल. त्यानंतर पुन्हा एकदा नेक्स्टचा पर्याय निवडा. आता पँडोरा अॅपला कोणत्या फोल्डरमध्ये …
Read More »समस्या एकट्या मुलांची
बदलत्या काळात पती-पत्नी दोघांनाही नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर राहावे लागत असल्यामुळे मुलांच्या संगोपनाचे प्रश्न गंभीर बनत चालले आहेत. विशेषतः बर्याच मुलांना- किशोरवयीनांना यामुळे घरामध्ये एकटे राहावे लागते. पण या एकटेपणामुळे मुलांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावर नकारात्मक परिणाम होताहेत. ते जाणून घेण्याची गरज आहे… पालकांची जागा इतर कुणी घेऊ शकत नाही. कोणत्याही पालकांसाठी त्यांची मुलेच त्यांचे जग असते. मुलांची केवळ उपस्थितीच त्यांचे जीवन अर्थपूर्ण …
Read More »हरभर्याची भाजी आरोग्यदायी
थंडीत उत्तरेकडील लोक जेवणात सरसो का साग, पालक का साग या भाज्या आवर्जून खातात. थंडीत तापमानात घट होत असताना त्याचा शरीरावरही परिणाम होत असतो. अशावेळी हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी हिरव्या भाज्यांचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यास हरभर्याच्या हिरव्या पाल्याची व चण्याच्या हिरव्या पाल्याच्या भाजीत अनेक पौष्टिक गुणधर्म आढळतात. मधुमेहापासून ते त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी हरभर्याच्या …
Read More »झुंजार रणरागिणी
आझाद हिंद सेनेच्या महिला आघाडीच्या पहिल्या कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांचा जन्म डॉ. एस. स्वामीनाथन व अम्मू या दाम्पत्यापोटी 24 ऑक्टोबर 1914 रोजी चेन्नई येथे झाला. त्यांचे वडील मद्रास उच्च न्यायालयात वकील होते. आई काँग्रेसच्या एक आघाडीच्या कार्यकर्त्या होत्या. 1928 मध्ये लक्ष्मी आईबरोबर कोलकाता येथे काँग्रेसच्या अधिवेशनास गेल्या होत्या. अधिवेशनावेळी सुभाषचंद्र बोस यांनी दोनशे स्वयंसेविकांकडून लष्करी गणवेशात संचलन सादर केले होते. …
Read More »शिक्षण क्षेत्राला काय मिळाले?
राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये शेती, उद्योग यानंतर शिक्षण हा एक महत्त्वाचा गाभा घटक असतो. कुठल्याही राष्ट्राचे भवितव्य हे त्या देशात शिक्षणावर होणार्या गुंतवणुकीवर अवलंबून असते. अलीकडच्या काळात 1995 नंतर जागतिक स्तरावर अर्थशास्रज्ञ शिक्षणाला शाश्वत विकासाचे एक साधन मानत आहेत आणि जगभरात शिक्षणाकडे याच दृष्टीने पाहिले जात आहे. कारण शिक्षण आणि कौशल्य विकासावर राष्ट्राची प्रगती अवलंबून असते. संशोधन आणि विकास हाच खरा अर्थव्यवस्थेचा …
Read More »