लेख-समिक्षण

अशा पध्दतीने मिळवा डेटा

डेटा मिळवण्यासाठी आपल्याला अगोदेर गूगल प्ले स्टोअरवर जावे लागेल आणि पँडोरा रिकव्हरी सॉफ्टवेअर डाऊनलोड करावा लागेल. पँडोरा डाऊनलोड झाल्यानंतर हे सॉफ्टवेअर आपल्याला ओपन करावे लागेल. जी विंडो आपल्यासमोर दिसत आहे, त्यात आपण खाली दिलेल्या नेक्स्ट ऑप्शनवर टॅब करावे लागेल. क्लिक करताच आपल्यासमोर आलेल्या अटी आणि शर्तींची विंडो ओपन होईल. त्यानंतर पुन्हा एकदा नेक्स्टचा पर्याय निवडा. आता पँडोरा अ‍ॅपला कोणत्या फोल्डरमध्ये इंस्टॉल करावयाचे याची विचारणा होईल. त्यानुसार फोल्डर निवडून हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा. आपला पेनड्राईव्ह संगणक किंवा लॅपटॉपला कनेक्ट करा. आपल्या सिस्टिम्समध्ये दिसणार्‍या पँडोरा रिकव्हरी सॉफ्टवेअर आयकॉनवर क्लिक करा. आता आपल्याला पेनड्राइव्हचा ऑप्शन दिसू लागेल. त्याला टॅब केल्यानंतर आपण पुन्हा रिकव्हरीचा ऑप्शन निवडा. क्लिक करताच आपल्याला पेनड्राईव्हमधून डिलीट झालेल्या फाइल्स दिसू लागतील. या फाइलला राईट क्लिक करा आणि रिकव्हरी करा. आपल्याला ज्या फोल्डरमध्य या फाईलला सेव्ह करायचे आहे तेथे या फाईल्स सेव्ह करता येतील. काही मिनिटातच आपल्या पेनड्राईव्हमधील सगळा डेटा सेव्ह होईल

Check Also

जन्मानंतर बाळाचा रंग सावळा का होतो ?

बाळ जन्माला आले की, त्याचे गुलाबी-पांढरे रूप पाहून सर्वच जण सुखावतात. मात्र, काही आठवड्यांनंतर हळूहळू …