जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर स्वप्नांना गवसणी कशी घालता येते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आश्रिता. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आश्र्तािने आपल्या कष्टाने अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली आहे. ज्योतिषमती इंजिनिअरिंग कॉलेजमधून बी.टेक. पूर्ण केल्यानंतर तिने आपल्या आवडीच्या हार्डवेअर इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला, जो तिच्या अनेक सोबत्यांनी निवडलेल्या वाटेपेक्षा वेगळा होता. आश्रिताचा हा प्रवास सोपा नव्हता. पहिल्या ‘गेट’ …
Read More »मलमपट्टीने काय साधेल?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना राज्यातील बळीराजाला दिलासा देणारी एक घोषणा केली आहे. दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाला माफी देण्याची ही घोषणा कर्जबाजारीपणामुळे त्रासलेल्या काही शेतकऱ्यांसाठी दिलासाजनक असली, तरी सरसकट बळीराजा खूश होईल अशी परिस्थिती नाही. देवेंद्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयावर अपेक्षेप्रमाणे विरोधी पक्षांनी टीका केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्या काळात आम्ही सरसकट …
Read More »घरखरेदीदारांना दिलासा
घरखरेदीदारांच्या हक्कांचे संरक्षण करणारा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. सदनिका किंवा घराच्या देयकावरून (पेमेंट) निर्माण झालेल्या वादाचे भांडवल करून विकासक (बिल्डर) आता खरेदीदाराला संक्षिप्त कायदेशीर प्रक्रियेचा आधार घेऊन घरातून बेदखल करू शकणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अशा प्रकरणांमध्ये विकासकांना नियमित दिवाणी प्रक्रियेचाच अवलंब करावा लागेल, असे बजावत न्यायालयाने घरखरेदीदारांची बाजू भक्कम …
Read More »भारताकडे येणाऱ्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
इराण आणि अमेरिकेतील युद्ध भडकलेले असतानाच, बुधवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे येणाऱ्या थायलंडच्या एका मालवाहू जहाजासह तीन जहाजांवर पुन्हा हल्ले झाले. या हल्ल्यामुळे एका जहाजाला भीषण आग लागली असून, जहाजावरील खलाशांना वाचवण्यासाठी तातडीने बचाव मोहीम राबवण्यात आली आहे, असे वृत्त ‘एएफपी’ने दिले. या व्यापारी जहाजावरील दोन भारतीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून एक भारतीय बेपत्ता आहे. हा हल्ला इराणने केला असल्याचे मानले …
Read More »धास्ती ‘सुपर अल निनो’ ची
जागतिक तापमानवाढीच्या भीषण काळात आता निसर्गाचे एक असे रूप समोर येत आहे, ज्याने जगभरातील हवामान शास्त्रज्ञांची आणि धोरणकर्त्यांची झोप उडवली आहे. युरोपीय हवामान केंद्राच्या (ईसीएमडब्ल्यूएफ) ताज्या आकडेवारीनुसार, या वर्षाच्या अखेरपर्यंत ‘सुपर अल नीनो’चा प्रभाव निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. ही घटना इतकी दुर्मिळ आणि शक्तिशाली आहे की, ती साधारणपणे दर 10 ते 15 वर्षांनी एकदाच येते आणि संपूर्ण जगाच्या हवामान …
Read More »भारतासाठी धोक्याची घंटा
जागतिक राजकारणाच्या पटावर सध्या मध्यपूर्वेतील घडामोडींनी एक अत्यंत स्फोटक वळण घेतले आहे. विशेषतः 28 फेब्रुवारी 2026 च्या रात्री इराण आणि अमेरिका यांच्यात जो अभूतपूर्व क्षेपणास्त्र संघर्ष झाला, तो आधुनिक युद्धतंत्राच्या भविष्यातील दिशेचा एक संकेत होता. इराणने अमेरिकेच्या सागरी सामर्थ्याचे केंद्र असलेल्या अब्राहम लिंकन या महाकाय विमानवाहू जहाजाला लक्ष्य करण्याचा जो धाडसी प्रयत्न केला, त्याने संपूर्ण जगाचे सामरिक लक्ष वेधून घेतले. …
Read More »सूर्याचा नवा चित्रपट ‘विश्वनाथ अँड सन्स’
तमिळ चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार सूर्या याच्या आगामी चित्रपटाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून असलेली उत्सुकता आता संपली आहे. ‘सूर्या 46’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या चित्रपटाचे अधिकृत नाव आणि पहिले पोस्टर निर्मात्यांनी प्रसिद्ध केले आहे. ‘विश्वनाथ अँड सन्स’ असे या चित्रपटाचे शीर्षक असून, हा एक कौटुंबिक मनोरंजक चित्रपट असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये सूर्या एका लहान मुलाला कडेवर घेऊन दिसतोय. त्याच्या …
Read More »पुन्हा उजळली चंदेरी दुनिया
कोरोना महामारीच्या काळात वेगाने लोकप्रिय झालेल्या ओटीटी कल्चरमुळे बॉलीवूड संकटात सापडल्याची चर्चा सातत्याने होत होती. विशेषतः चित्रपटगृहांमध्ये जाऊन प्रेक्षकांनी सिनेमे पाहण्याचे प्रमाण कमी झाल्याचा दावा सर्रास केला जात होता. पण 2025 मध्ये भारतीय चित्रपटांच्या एकूण बॉक्स ऑफिस संकलनाने 13,395 कोटी रुपयांचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. ही आकडेवारी कोरोना महामारीपूर्व काळातील सरासरीच्या तुलनेत 32 टक्क्यांनी अधिक असून ती प्रेक्षकांच्या बदललेल्या मानसिकतेचे …
Read More »केशप्रत्यारोपण करताय?
केसांच्या समस्येमुळे आजकाल अनेक जण हतबल झालेले दिसतात. गळणारे केस आणि टक्कल पडण्याची भीती यांमुळे लाखो रुपये खर्च करून केशप्रत्यारोपण करण्याकडे कल वाढला आहे. मात्र, इतका खर्च करूनही सर्वांनाच अपेक्षित निकाल मिळतोच असे नाही. काही प्रकरणांमध्ये केस पुन्हा विरळ होतात किंवा शस्त्रक्रिया अपयशी ठरते. असे का घडते? एफयूई आणि एफयूटीमधील फरक केशप्रत्यारोपणाच्या प्रामुख्याने दोन पद्धती प्रचलित आहेत. या दोन्ही पद्धतींमधील …
Read More »इन्स्टाग्रामचे भन्नाट फीचर
इंस्टाग्राम या फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग ॲपने अलीकडेच आपल्या युजर्ससाठी एक नवे आकर्षक आणि उपयुक्त फिचर आणले आहे. या फिचरचे नाव रिस्टाईल विथ मेटा एआय असे असून याच्या मदतीने वापरकर्ते त्यांच्या जुन्या किंवा नवीन फोटोमध्ये लक्षणीय बदल करू शकतात आणि त्या फोटोला एक वेगळे व आकर्षक स्वरूप देऊ शकतात. हे फिचर केवळ फोटोपुरते मर्यादित नसून व्हिडिओ, रील्स आणि पोस्ट यांमध्येही …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र