लेख-समिक्षण

स्टायलिश बेल्टच्या दुनियेत…

आपले व्यक्तिमत्व उठून दिसण्यासाठी बाजारात आज अनेक प्रकारचे स्टायलिश बाबी उपलब्ध असताना बेल्टचाही त्यात समावेश असतो. कॉटनचा बेल्ट, जिन्सचा बेल्ट, लेदर बेल्ट, आयर्न बेल्ट आदींचा येथे प्रामुख्याने उल्लेख करता येईल. यासंदर्भात काही फॅशनेबल बेल्टची माहिती घेऊ या.
* ड्रेसबरोबर बेल्ट घालणे: कोणत्याही फॉर्मल किंवा स्टायलिश शर्ट पँटवर बेल्ट घालणे ही बाब आदर्श मानली जाते. 1950 च्या दशकातील शर्ट-पॅटबरोबर असणारे बेल्ट हे दर्जेदार, टिकावू आणि स्टायलिश लूकचे होते. ते कोणत्याही पँटवर शोभून दिसत. काहींना कमी जाडीचे तर काहींना अधिक जाडीचे बेल्ट आवडतात. बेल्टच्या रुंदीतही कमीजास्तपणा असतो. जिन्स असेल तर अधिक रुंदीचे बेल्ट वापरले जातात.
* इन शर्टवर बेल्ट घालणे: साधारणत: इन शर्टवर घातलेल्या पँटवर बेल्ट घालणे हा प्रकार लोकप्रिय आहे. शर्ट आणि पँट कोणत्या रंगाची आहे, त्याला साजेसा असणारा बेल्ट वापरण्यात येतो. आपल्याला आवडणारा ट्रेंडी बेल्ट घालण्यास प्राधान्य द्यायला हवे.
* लाँग शर्टवर बेल्ट: आजकाल लाँग शर्टची फॅशन आहे. विशेषत: मुली जिन्सवर लाँग शर्ट घालतात. ज्यांचे पोट सुटलेले आहे, अशी मंडळी लाँगशर्टला पसंती देतात. लाँगशर्ट असला तरी तो इन करून बेल्टच्या योग्य फिटिंगमुळे तो शर्ट आपल्याला साजेसा ठरू शकतो. बेल्टचा आकार आणि रुंदी ही पँटची फिटिंग व्यवस्थित करत असते.
* वेणीचे बेल्ट: आपल्याला बेल्टमध्ये आणखी स्टायलिश लूक हवा असेल तर वेणीप्रमाणे असलेले बेल्ट फॅशनेबल बनविते. मुलींमध्ये हा ट्रेंड लोकप्रिय मानला जातो. परंतु मुलेही फिरायला जाताना, ट्रेकिंग करताना थोडासा बदल म्हणून वेणी असलेली बेल्ट वापरतात.
* रिबन : रिबनचा वापर बेल्ट म्हणूनही केला जातो. रिबनकडे ही पातळ किंवा जाड आकारात रिबन उपलब्ध आहे. विविध रंगछटात असणार्‍या रिबन आपल्याला स्टायलिश लूक देतात.

Check Also

लहान मुलांना लिहिण्यास शिकवण्याची योग्य पध्दत

लहान मुलांना लिहिण्यास शिकवणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असते. अनेकदा पालक थेट अक्षरे गिरवण्यापासून सुरुवात …