लेख-समिक्षण
  • 9 august 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4212

TimeLine Layout

February, 2026

  • 1 February

    लिव्ह इन ची कोंडी

    अलीकडेच मद्रास उच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशिपच्या वाढत्या प्रस्थवरून चिंता व्यक्त केली. अशा संबंधामध्ये असलेल्या महिलांना जोडीदाराने पत्नीचा दर्जा देऊन सुरक्षा प्रदान करायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तरुण मुले-मुली स्वत:ला आधुनिक विचारसरणीचे पाईक मानतात आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतात. मात्र कालांतरांने या संबंधातून विवाहासंस्थेसारखी सुरक्षा मिळत नसल्याचे लक्षात येते. पश्चिमेकडील संस्कृतीचा अंगीकार करणे म्हणजे पुढारलेपण असा …

    Read More »

January, 2026

  • 25 January

    स्वतःची ओळख असणे महत्त्वाचे ः सुनीता आहुजा

    बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता गोविंदा याची पत्नी सुनीता आहुजा ही आपल्या बेधडक आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनीतांनी आपल्या वैयक्तिक ओळखीबद्दल भाष्य करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वयाच्या 55 व्या वर्षी आपण केवळ गोविंदाची पत्नी म्हणून नव्हे, तर सुनीता आहुजा म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करत असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. यावेळी त्यांनी राज्यसभेतील जया बच्चन यांच्या गाजलेल्या …

    Read More »
  • 25 January

    भावनाप्रधान गीतांचा काळ सरला

    हिंदी सिनेसृष्टीतील असंख्य अवीट गीतांनी तीन पिढ्यांहून अधिक काळ भारतीय जनमानसाच्या मनाला मोहिनी घातली. आजही या गीतांची जादू रसिकांच्या मनावर कायम आहे. नव्या रुपामध्ये ही गाणी सादर केली जातात तेव्हा त्यांनाही तितकीच लोकप्रियता लाभते आहे. दुर्दैवाने, आज अशा गाण्यांची कमतरता भासत आहे. यामागचे कारण प्रतिभा संपली आहे असे नसून, हृदयापर्यंत पोहोचणारा रस्ता बदलला आहे आणि तो खूप छोटा करण्यात आला …

    Read More »
  • 25 January

    मुलाखतीदरम्यान काय विचारावे?

    नोकरी मिळवण्याच्या प्रक्रियेत इंटरव्ह्यू अथवा मुलाखत हा अत्यंत महत्वाचा भाग असतो. तुम्हाला कंपनीचे व्यवस्थापक वेगवेगळे प्रश्न विचारून विविध विषयात तुमचे ज्ञान किती आहे हे आजमावून पाहतो. उमेदवारही मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला प्रश्न विचारू शकतो. या प्रश्नांमधून त्या कंपनीमध्ये आपण काम करू शकू की नाही हे कळू शकते. तसेच व्यवस्थापनालाही हा उमेदवार किती पात्रतेचा आहे हे कळू शकते. मुलाखतीच्या वेळी जर उमेदवाराने …

    Read More »
  • 25 January

    कपाट ठेवा निटनेटकं

    अनेकदा असं होतं की आपल्या कपाटात कपडे भरलेले असतात, पण ऐनवेळी काय घालावं हेच समजत नाही. तुमचंही असंच होत असेल, तर कपाट आवरण्याची वेळ आली आहे असे समजावे. नव्या कपड्यांची खरेदी करण्याऐवजी, आधी जे आहेत ते व्यवस्थित लावल्यास मनालाही शांती लाभेल. वॉर्डरोब मॅनेजमेंट हा आजच्या तरुणींचा आवडता छंद ठरला आहे. पण यासाठीचा मुहुर्त उजाडण्यासच मुळी वेळ लागतो. असो, पण जेव्हा …

    Read More »
  • 25 January

    इथे इंटरनेट वापरणे गुन्हा!

    आजच्या युगात इंटरनेट हा जणू आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. एक काळ असा होता, जेव्हा लोक टूजी इंटरनेट वापरून देखील खूश होते, पण आता फोरजी इंटरनेट स्पीड देखील लोकांना कमी पडू लागली आहे. कारण, आता रोजच्या जीवनातील सर्वच गोष्टी इंटरनेटशी संबंधित आहेत. मनोरंजक कामासाठी जसे व्हिडीओ, सिनेमे पाण्यासाठी देखील इंटरनेट महत्त्वाची भूमिका बजावतो, पण तरीही असे काही देश …

    Read More »
  • 25 January

    छोट्या प्रयोगातून 300 कोटींचे साम्राज्य!

    मनीष चौधरी हे नाव स्किन सायन्स या नामांकित ब्रँडचे सह-संस्थापक आहेत. भारतातील सर्वात विश्वासार्ह डी 2 सी (डायरेक्ट टू कंज्यूमर) पर्सनल केअर ब्रँड्समध्ये आज या कंपनीची गणना होते. त्यांचा हा प्रवास एका रात्रीत मिळालेल्या यशाचा नाही. हा प्रवास आहे शिकण्याचा, प्रयोग करण्याचा, अपयशाचा आणि स्वतःला बदलून हळूहळू एक असा ब्रँड उभा करण्याचा, जो आज जगभरातील लाखो ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. …

    Read More »
  • 25 January

    दूरगामी परिणाम करणारा निकाल

    सर्वोच्च न्यायालयाने शिक्षण हक्क कायद्यांतर्गत गरीब आणि वंचित मुलांसाठी 25 टक्के जागा मोफत राखीव ठेवण्याची प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यादरम्यान, न्यायालयाने मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या एका जुन्या विधानाचा उल्लेख केला. वंचित समूहातील मुले खाजगी शाळांच्या वातावरणात कशा प्रकारे जुळवून घेतील, अशी चिंता त्यावेळी व्यक्त करण्यात आली होती. त्यावर भाष्य करताना न्यायालयाने म्हटले की, ही चिंता तेव्हाच दूर होऊ …

    Read More »
  • 25 January

    ‌‘हेट स्पीच‌’ला चपराक

    देशातील राजकारणात स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी काही नेते आणि संघटना अनेकदा द्वेषपूर्ण विधानाचा म्हणजेच हेट स्पीचचा आधार घेताना दिसतात. याच साखळीत तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधि स्टालिन यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सनातन धर्माबाबत त्यांनी केलेल्या प्रतिकूल टिप्पणीला मद्रास उच्च न्यायालयाने आता अधिकृतपणे हेट स्पीच मानले आहे. 2023 मधील या प्रकरणाची दखल वास्तविक खूप आधीच घेतली जायला हवी होती. विशेष म्हणजे …

    Read More »
  • 25 January

    दावोसमध्ये 14.50 लाख कोटींचे करार

    वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे वार्षिक बैठकीत पहिल्याच दिवशी तब्बल 14 लाख 50 हजार कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले. या गुंतवणुकीसोबतच राज्यात 15 लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाच्या माध्यमातून यंदा विविध विभागांनी आणि विविध क्षेत्रातील उद्योगांच्या प्रतिनिधी समवेत मुख्यमंत्री फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. …

    Read More »