लेख-समिक्षण

संपादकीय

मतपेटीतून तसा संदेश

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी तरी सकाळपर्यंत महायुती आणि महाआघाडी यांच्यातील जागावाटपाचा घोळ संपेल असे वाटत होते. पण अक्षरशः उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्यासाठी केवळ काही मिनिटे शिल्लक असेपर्यंत हा घोळ संपलेला नव्हता. उमेदवारी अर्ज भरण्याला एक तास शिल्लक असताना जी माहिती उपलब्ध झाली त्यानुसार महायुतीतील चार जागांचा आणि महाविकास आघाडीतील बारा जागांचा निर्णय होऊ शकलेला नव्हता. नेहमीच्या …

Read More »

माणसातला ‘वाघ’

निवडणुका जवळ आलेल्या असल्यामुळं ठिकठिकाणच्या प्रचारफलकांवर ‘मानवी वाघ’ बघायला मिळताहेत. बर्‍याच ठिकाणी नेत्याच्या फोटोला वाघाच्या किंवा सिंहाच्या चित्राची पार्श्वभूमी ग्राफिक्सच्या माध्यमातून केली जाते. नेत्यांची तुलना वाघाशी किंवा सिंहाशी करण्याची मोठी परंपरा आपल्याकडे आहे. वाघ हा सर्वोच्च शिकारी म्हणजे ‘अपेक्स अ‍ॅनिमल’ म्हणून ओळखला जातो. म्हणजे जैवसाखळीचं सर्वोच्च टोक. आणि सिंह तर जंगलचा राजाच. या दोघांना संपूर्ण जंगल घाबरतं. जंगलचे राजे सुस्तावून …

Read More »

‘नकुशी’चं दुखणं

मुलींच्या बाबतीत समाजाची मानसिकता अजूनही मागासलेलीच दिसून येते. त्याला समाजाचा कोणताही स्तर अपवाद नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून हीच परिस्थिती दिसून येत आहे. मानसिकतेची तीव्रता कमी-जास्त असू शकेल, एवढाच काय तो फरक. मुलगी झाली म्हणून तिचा जीव घेण्याच्या किंवा तिच्या आईचा मानसिक छळ करण्याच्या घटना समाजात अधून-मधून घडतात. उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात अशीच एक घटना नुकतीच घडली. चौथी मुलगी झाली म्हणून …

Read More »

बहुगुणी लस

देवी, गोवर, ट्रिपल, पोलिओ अशा अनेक लसी आपल्याला पालकांनी लहानपणीच दिल्या. स्वतः जाऊन लस घेऊन येण्याचा अनुभवच आपल्याला नव्हता. ती वेळ कोविडने आपल्यावर आणली आणि बरेचजण घाबरले. ही लस खरंच ‘फुलप्रूफ’ आहे का? याचे काही दुष्परिणाम तर होणार नाहीत ना, अशा चिंतेनं अनेकांना ग्रासलं होतं. सोशल मीडियानं नेहमीप्रमाणे आगीत तेल ओतून लसीच्या संभाव्य दुष्परिणामांची यादी थेट मृत्यूला नेऊन भिडवली होती. …

Read More »

बंडखोरीला खतपाणी

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांचा निकाल अलीकडे जाहीर झाला. जम्मू आणि काश्मीरमध्ये तब्बल दहा वर्षांनी तर 2019 मध्ये कलम 370 हटविल्यानंतर प्रथमच विधानसभा निवडणूक झाली. तत्कालीन मोदी सरकारच्या या निर्णयामुळे विकासाच्या मार्गावर जम्मू आणि काश्मीर सुसाट वेगाने पळेल, असेच चित्र निर्माण झाले. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला भरभरून मते मिळतील, असा अनेकांचा होरा होता. प्रत्यक्षात मात्र भाजपला बहुमताच्या आसपास जातील एवढ्याही …

Read More »

दाढीपुराण

दाढी ही निसर्गाने पुरुषाला दिलेली अशी भेट आहे, जी काहीजणांना हवीशी वाटते तर काहींना नकोशी. गंमत म्हणजे, दाढी आणि मिशी फक्त पुरुषांना लाभलेली असली, तरी मराठीत हे दोन्ही शब्द स्त्रीलिंगी आहेत. दाढीचा संबंध कधी धर्माशी जोडला जातो, कधी परंपरेशी तर कधी चेहर्‍याच्या उठावदारपणाशी. प्राचीन ऋषीमुनींच्या दाढीपासून आजच्या कॉर्पोरेट दाढीपर्यंत एक मोठी परंपरा पाहायला मिळते. अलीकडे दाढी वाढवण्याचा आणि तिला वेगवेगळे …

Read More »

महासंग्राम निवडणुकीचा

गे ल्या काही दिवसांपासून उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर घोषणा केली. त्यानुसार राज्यात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान झाल्यानंतर 23 नोव्हेंबरला मतमोजणी करुन निकाल घोषित करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याच्या क्षणापासून राज्यात निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. 22 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जाहीर होणार असून त्याच …

Read More »

अगम्य लीला

दसर्‍यानिमित्त रावणदहन झोकात झालं. उत्तर भारतात हा कार्यक्रम फार मोठा असतो. आपल्या राज्यात यंदा निवडणुकीच्या आधीचा दसरा असल्यामुळं रावणदहनापेक्षा जास्त लक्ष मेळाव्यांवर केंद्रित झालं होतं. त्यामुळं विरोधकांवर फेकलेले शाब्दिक बाण यंदा अधिक टोकदार झाले होते. असो, तर रावणदहन हा सोहळा वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक मानला जातो. उत्तरेत सामान्यतः शारदीय नवरात्राला प्रारंभ झाल्यापासून रामलीलेचं मंचन सुरू होतं आणि विजयादशमीला रावणदहनाने त्याची …

Read More »

सत्ताधार्‍यांना आरसा

सरकारच्या धोरणांवर आणि निर्णयांवर टीका करणे हा पत्रकारांचा अधिकार आहे, असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने सत्तेत असलेल्यांना आरसा दाखवला आहे. राज्यांतील विविध राजकीय पक्षांच्या सरकारांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे दडपशाहीला बळी पडलेल्या पत्रकारांसाठी सर्वोच्च न्यायालयाची ही टिप्पणी निश्चितच दिलासा देणारी आहे. अनेक राज्यांत पत्रकारांना अटक, मारहाण आणि गंभीर कलमांखाली तुरुंगात टाकण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर घडले आहेत. अनेक पत्रकार संशयास्पद परिस्थितीला …

Read More »

विचित्र ‘केस’

दहा ऑक्टोबर हा जागतिक स्तरावर साजरा केला जाणारा एक विशेष दिवस आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे, तो ज्यांच्यासाठी साजरा केला जातो त्यातील बहुसंख्यांना त्याची कल्पनाच नसते आणि तो साजरा करणं आपल्यासाठीही आवश्यक आहे, याची कल्पना इतररांना नसते. 1992 पासून साजरा केला जाणारा हा दिवस म्हणजे जागतिक मानसिक आरोग्य दिन. शरीराप्रमाणं मन हा डोळ्यांना न दिसणारा अवयव आजारी पडू शकतो, याची आपल्याला …

Read More »