चेहऱ्यावर नैसर्गिक चमक असावी अशी प्रत्येकीचीच इच्छा असते. बाजारात मिळणाऱ्या विविध क्रीम्स आणि ब्युटी प्रॉडक्टस अनेक मोठमोठे दावे करतात, पण अनेकदा असे दिसून येते की, घरात सहज उपलब्ध असलेल्या नैसर्गिक गोष्टींचा परिणाम जास्त चांगला आणि सुरक्षित असतो. यामध्ये सर्वांत पहिल्या स्थानावर आहे ती हळद. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल (जंतुनाशक), अँटी-ऑक्सिडंट (ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करणारे) आणि अँटी-इंफ्लेमेटरी (दाह कमी करणारे) गुणधर्म असतात. यामुळे …
Read More »TimeLine Layout
December, 2025
-
14 December
मन जाणून घेणारी आज्ञावली
खाद्याने आपल्या मनातली गोष्ट ओळखली तर आपण त्याला मनकवडा म्हणतो खरे, पण तो केवळ योगायोग असतो. एखाद्या व्यक्तीच्या मेंदूतून आलेले संदेश गोळा करून त्यांचे विश्लेषण करून लोकांचे विचार जाणून घेण्याचा प्रयोग वैज्ञानिकांनी यशस्वी केलेला असून, त्यात एका भारतीय वैज्ञानिकाचा समावेश आहे. या प्रयोगात माणसाच्या मनातील विचार ओळखण्यात 96 टक्के यश आले आहे. माणसाचे मन म्हणजे त्याचे विचार सांगणारी आज्ञावली तयार …
Read More » -
14 December
कृषी रागिणीची यशोगाथा
हरियाणातील महमूदपूर गावातील सरला देवी यांनी आपल्या पतीच्या उपचारांसाठी औषधी उत्पादनांचा शोध घेतला आणि त्यातूनच त्यांनी स्थानिक महिलांना व शेतकऱ्यांना शेवग्याच्या उत्पादनांच्या माध्यमातून रोजगाराचे नवे दालन मिळवून दिले. शेवग्याच्या उच्च गुणवत्तेमुळे मिळणाऱ्या फायद्यांची जाणीव झाल्यानंतर त्यांनी शेतीत अनेक प्रयोग केले आणि या प्रयत्नांमुळे त्यांना दिवसेंदिवस नवी ओळख मिळत गेली. औषधी उत्पादनांच्या वाढत्या मागणीचा अभ्यास करून त्यांनी शेवग्याच्या पानांपासून ते शेंगांपर्यंत …
Read More » -
14 December
आता हापूसवरही दावा
महाराष्ट्रातील उद्योगधंदे आणि इतर उपक्रम इतर राज्यांमध्ये विशेषतः गुजरातमध्ये वळवण्याबाबत नेहमीच आरोप केले जात असतानाच, आता महाराष्ट्राची शान असलेल्या हापूस आंब्याबाबतही अशीच काही कारस्थाने होताना दिसत आहेत. गुजरात सरकारने हापूस आंब्यावर दावा करत वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. हापूस हा शब्द फक्त महाराष्ट्रातील कोकणात तयार होणाऱ्या आंब्यासाठीच वापरला जातो, असे असताना गुजरात येथील कृषी विद्यापीठांनी …
Read More » -
14 December
सौर विकिरणांचा परिणाम
ज्या काळात इथियोपियाच्या दिशेने उसळलेल्या ज्वालामुखीच्या प्रचंड धुरामुळे विमानसेवेसमोर अडथळे उभे राहिले होते, त्याच वेळी सूर्यकिरणांमधून निर्माण होणाऱ्या तीव्र विकिरणामुळे जगभरात परिचित असलेल्या सुमारे साडेसहा हजार एअरबस ए320 विमानांच्या सॉफ्टवेअरमध्ये अनाकलनीय बिघाड दिसू लागला आणि अनेक उड्डाणे स्थगित करावी लागली. 30 ऑक्टोबर रोजी न्यूयॉर्ककडे उड्डाण करणाऱ्या जेटब्लूच्या विमानाला आलेल्या विकिरणाच्या धक्क्यामुळे विमानात अचानक झटके बसले, त्याची उंची झपाट्याने कमी झाली …
Read More » -
14 December
आता भीक मागण्यास बंदी
महाराष्ट्रात भीक मागण्यावर पूर्णपणे प्रतिबंध घालणारे विधेयक विधान परिषदेत अनेक सदस्यांच्या कडाक्याच्या विरोधात आणि सभागृहात गोंधळाच्या वातावरणात मंजूर करण्यात आले. या प्रक्रियेवर तालिका सभापती नीलम गोऱ्हे, आमदार मनिषा कायंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांच्यासह अनेक सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विधेयक मंजूर झाल्यानंतर शनिवारी सभापतींच्या दालनात विशेष बैठक बोलावण्यात आली असून, या प्रकरणाची पुढील दखल घेण्यात येणार आहे. महिला …
Read More » -
14 December
इंडिगो प्रकरणाचा धडा
भारतातील हवाईवाहतूक क्षेत्राला अनेक वर्षे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विमानकंपन्यांचे ओझे सोसावे लागले. दर काही वर्षांनी एखादी मोठी कंपनी दिवाळखोरीत जात असे आणि विमानप्रवासाची व या उद्योगाची विश्वासार्हता डळमळीत होत असे. अशा पार्श्वभूमीवर इंडिगोचा उदय हा जणू काही सर्व समस्यांवरचा उतारा मानला गेला. आर्थिकदृष्ट्या सक्षम, सुरक्षित, वेळेवर आणि परवडणाऱ्या भाड्याच्या उड्डाणांमुळे या कंपनीने लाखो प्रवाशांचा विश्वास जिंकला. लहान शहरांमध्येही हवाईसेवेचा लाभ पोहोचवण्यात …
Read More » -
14 December
ग्रामीण अर्थकारणाचा आलेख उंचावण्यासाठी…
जागतिक बँकेच्या ताज्या अहवालानुसार ग्रामीण सुधारणा, कृषि उत्पादनातील वृद्धी, ग्रामीण उपभोगातील वाढ आणि कर सुधारणाया महत्त्वपूर्ण घटकांच्या आधारावर भारत पुढेही जगातील सर्वांत वेगाने प्रगती करणारी मोठी अर्थव्यवस्था राहील. हा आधार बळकट करण्यासाठी ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या अंतिम टोकापर्यंत सक्षम आणि विश्वासार्ह बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांची भूमिका अधिक प्रभावी करण्याची हीच वेळ आहे. गावांमध्ये प्रधानमंत्री स्वामित्व योजनेचा वेगाने विस्तार करणे आवश्यक आहे, जेणेकरून लहान …
Read More » -
7 December
उत्सुकता ‘ग्रँड फिनाले’ची
कलर्स टीव्हीवरील बहुचर्चित शो म्हणून लोकप्रिय असणाऱ्या ‘बिग बॉस 19’चा प्रवास आता सांगतेकडे सुरू झाला आहे. या शोच्या ग्रँड फिनालेबद्दलची उत्सुकता वाढत चालली असून हा सोहळा कधी आणि कुठे पाहता येईल, घरातील स्पर्धकांपैकी कोणाच्या डोक्यावर विजेतेपदाचा मुकूट चढणार, विजेत्याला किती बक्षिस मिळणार, याबद्दल अनेक तर्कवितर्क सुरू आहेत. याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस 19’चा ग्रँड फिनाले येत्या रविवारी 7 डिसेंबर …
Read More » -
7 December
कहाणी रुपेरी पुष्पप्रेमाची
फुल हे सौंदर्य, सुवासिक आणि मोहकतेचे प्रतीक आहे. केवळ महिलाच नव्हे तर लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंतच्या वयोगटातील प्रत्येकाला फुलांविषयी आकर्षण राहिले आहे. भगवंताच्या पूजेतही फुलांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हिंदी चित्रपटांतही विविध रंगाच्या आणि रुपाच्या फुलांनी नायिकेच्या सौंदर्यात भर घातलेली दिसून येते. कृष्णधवल काळापासून ते इस्टमनकलरपर्यंतच्या चित्रपटांवर फुलांचा बहर पाहवयास मिळाला आहे. त्याचवेळी चित्रपट गीतांत प्रेम आणि विरहात फुलांनी मोलाची भूमिका बजावली …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र






