लेख-समिक्षण

अनुराग विरुद्ध विपुल

हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्भीड दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ‌‘द केरळ स्टोरी‌’ या चित्रपटावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. हा चित्रपट केवळ एक भंपक प्रचारकी थाटाचा कार्यक्रम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका विशिष्ट दृश्याचा संदर्भ देत कश्यप यांनी या चित्रिकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या दृश्यात एका महिलेला बळजबरीने गोमांस खाऊ घालताना दाखवण्यात आले आहे, ज्यावर कश्यप यांनी उपरोधिक टीका केली. अशा पद्धतीने साधी खिचडी देखील कोणी कोणाला भरवत नाही, असे म्हणत त्यांनी या दृश्यातील वास्तववादावर शंका व्यक्त केली आहे.
निर्माते विपुल शाह यांच्यावर निशाणा साधताना कश्यप यांनी त्यांना अत्यंत लोभी माणूस संबोधले आहे. केवळ पैसा कमवणे आणि ठराविक वर्गाला खुश करून समाजात फूट पाडणे हाच या चित्रपटामागचा मुख्य हेतू असल्याचे त्यांचे मत आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक प्रभावशाली व्यक्तींनी या चित्रपटातील विशिष्ट धर्माबद्दलच्या आकसाचा निषेध केला असला, तरी कश्यप हे उघडपणे नाव घेऊन टीका करणारे पहिले प्रमुख व्यक्तिमत्व ठरले आहेत. – राधिका बिवलकर

Check Also

रामायण, राम, रणबीर आणि वाद

सध्या बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‌‘रामायर्ण या चित्रपटाच्यानिमित्तान रणीबर कपूरने साकारलेल्या रामाच्या व्येितेखेवरुन वाद सुरू आहेत. वास्तविक …