आरोप निश्चिती ही न्यायाची पहिली पायरी आहे. दीर्घकाळ प्रलंबित राहणार्या खटल्यामुळे आरोपींना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. अनेक वर्षेकच्चे कैदी म्हणून तुरुंगात राहणार्यांची स्थिती तर या प्रलंबित प्रकरणांमुळे आणखीच बिकट होते. भारतीय न्याय अहवाल २०२५ नुसार देशातील तुरुंगात ७६ टक्के कैदी कच्चे आहेत. ‘जस कॉर्पस लॉ जर्नल’मध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, कच्च्या कैद्यांची संख्या वाढण्यामागचे कारण म्हणजे अपुरी कायदेशीर मदत …
Read More »TimeLine Layout
November, 2025
-
2 November
आलिया झळकणार ‘चामुंडा’मध्ये
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या एकामागून एक मोठ्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. यशराज फिल्म्सच्या स्पाय थ्रिलर ‘अल्फा’ आणि संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘लव्ह अँड वॉर’ या दोन भव्य चित्रपटांचे शूटिंग ती सध्या करत आहे. मात्र, या दोन्ही प्रोजेट्सच्या दरम्यान आलिया आता आणखी एका मोठ्या चित्रपटाशी जोडली जाऊ शकते, अशी चर्चा रंगू लागली आहे. असं सांगितलं जातंय की, स्पाय यूनिव्हर्सनंतर आलिया आता …
Read More » -
2 November
असरानी नावाचे हास्यपर्व
हिंदी चित्रपटसृष्टीतील चालतीबोलती दंतकथा ठरलेल्या शोले चित्रपटात लहानशी, परंतु अविस्मरणीय भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे नुकतेच निधन झाले. केवळ शोलेच नाही, तर त्यापूर्वी व त्यानंतर असंख्य चित्रपटांत लहान-मोठ्या व सर्व छटांच्या भूमिका साकारणारे असरानी काही दिवसांपासून प्रकृतीच्या समस्यांनी त्रस्त होते. ‘हम अंग्रेज़ों के ज़माने के जेलर हैं’ व हमारे जेलमें सुरंग?’ हे विशिष्ट लकबीत त्यांनी उच्चारलेले संवाद चित्रपटप्रेमींच्या कायम …
Read More » -
2 November
इंडक्शन कूकर वापरताय?
इंडक्शन कूकर हे उपकरण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन तंत्रावर कार्य करते. त्यात गरम होणारी हॉट प्लेट स्वतः तापत नाही, तर त्यावर ठेवलेल्या लोहयुक्त भांड्यांना गरम करतो. यामुळे ऊर्जा थेट अन्नात वापरली जाते आणि हीट लॉस कमी होतो. फायदे काय आहेत? पारंपरिक गॅसच्या तुलनेत हीटिंग प्रोसेस जलद होते. कारण यामध्ये उर्जा वाया जात नाही. उघडी ज्योत नसल्यामुळे जळण्याचा धोका कमी. …
Read More » -
2 November
मुलांचा किशोरवयीन टप्पा हाताळताना…
किशोरवय ही मुलांच्या आयुष्यातील एक अत्यंत संवेदनशील आणि निर्णायक अवस्था असते. वयाच्या १२ ते १८ वर्षांदरम्यान शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्तरावर झपाट्याने बदल घडत असतात. या बदलांचा प्रभाव त्यांच्या वागणुकीवर, विचारसरणीवर आणि नातेसंबंधांवरही दिसून येतो. या टप्प्यावर मुलं अधिक स्वतंत्रतेकडे झुकणारी, मतप्रदर्शन करणारी, आणि सामाजिकदृष्ट्या जाणीवपूर्वक वागणारी होतात. पण याच वेळी त्यांना योग्य मार्गदर्शन, समजून घेणे आणि सुसंवाद साधणे गरजेचे …
Read More » -
2 November
कृषीक्रांतीचा सुहानपी पॅटर्न
सुहानी चौहान या १७-१८ वर्षांच्या सर्जनशील तरुणीच्या प्रतिभेतून साकार झालेलं सो अॅप्ट अॅग्रोे हे सौरऊर्जेवर चालणारे शेतीवाहन शेतकर्यांसाठी एक वरदान ठरत आहे. हे वाहन शेतकर्यांचा उत्पादनखर्च कमी करुन पीक उत्पादनात वाढ करण्यास लाभदायक ठरत आहे. इयत्ता सातवीत असताना मानेसर येथील एका शैक्षणिक सहलीदरम्यान शेतकर्यांचे कष्ट पाहून सुहानी ढवळून निघाली. याबाबत ती सांगते की, शेतकरी दिवसभर राबताना पाहिलं आणि त्यांच्या आत्महत्या …
Read More » -
2 November
सफाई कामगार ते असिस्टंट मॅनेजर
जीवनात परिस्थिती जेव्हा माणसाला झुकवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा धैर्यच इतिहास लिहितं. महाराष्ट्रातील प्रतीक्षा तोंडवलकर यांची कहाणी हेच सिद्ध करते. ज्या बँकेत त्यांनी कधी काळी झाडू हातात घेतला होता, त्याच भारतीय स्टेट बँकेत त्या आज असिस्टंट रीजनल मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. प्रतीक्षा यांचा जन्म पुण्याजवळील एका अतिशय गरिब कुटुंबात झाला. वडील मजुरी करत होते. त्यांच्या उत्पन्नावर कसंबसं घर चालायचं. त्यामुळे शिक्षण …
Read More » -
2 November
गुन्हेगारीला उधाण
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील एका डॉटर महिलेवर अत्याचार करून तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा विषय सध्या गाजत आहे. या विषयामध्ये एका पोलीस अधिकार्याचा समावेश असल्यामुळे त्याला गांभीर्य निश्चितच प्राप्त झाले आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या इतर विविध घटनांवर नजर टाकली तर गुन्हे आणि गुन्हेगार यांची हिंसक आणि विकृत मानसिकता प्रकर्षाने समोर येताना दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका बापाने आपल्या १४ …
Read More » -
2 November
अवलिया पियुषजी
भारतीय जाहिरात विश्वाचे प्रतिभावंत शिल्पकार अशी ओळख असणार्या अॅड गुरु पियुष पांडे यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. आपल्या कारकीर्दीमध्ये त्यांनी पाश्चिमात्य केंद्रीत जाहीरातींपासून जाहीरात विश्वाला दूर नेत, भारतीय दृष्टी आणि भावनिक आशय देण्याचा प्रयत्न केला. ‘मिले सुर मेरा तुम्हारा’सारख्या अजरामर ओळी लिहिणारे पियूष म्हणजे भावनांची शिकवण देणारे महान गुरु होते. माणूस म्हणून ते अतिशय भावूक स्वभावाचे होते. त्यांच्या बोलण्यातली वायं …
Read More » -
2 November
शेतकरी रस्त्यावर, नागपूर जाम
नागपूरने असे आंदोलन पहिल्यांदाच अनुभवले. शेतकर्यांच्या तीन दिवसांच्या शक्तिप्रदर्शनामुळे वर्धा रोडवर जाम लागला. त्यामुळे नागपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या. अनेकांना शासकीय कामांसाठी कार्यालयांमध्ये पोहोचणे कठीण झाले. प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश दिले. त्यांनी आपली भूमिका मांडली. आम्हाला न्यायालयाचा अपमान करायचा नाही. आमची इथून हटायला तयारी आहे. पण आमची …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







