बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मीका सिंह आपल्या गाण्यांसोबतच सढळ हाताने केलेल्या मदतीसाठीही ओळखला जातो. सध्या उत्तर भारतात असलेल्या कडाक्याच्या थंडीत भटक्या कुत्र्यांचे हाल होत असल्याचे पाहून मीका सिंहने त्यांच्या कल्याणासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. मीकाने आपल्या मालकीची 10 एकर जमीन भटक्या कुत्र्यांच्या निवाऱ्यासाठी आणि त्यांच्या देखभालीसाठी दान करण्याचा संकल्प केला आहे. देशभरात भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर आणि सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या …
Read More »TimeLine Layout
January, 2026
-
18 January
खलनायकीचा नवा सुवर्णकाळ
सध्याच्या चित्रपटसृष्टीत खलनायक केवळ काळ्या-पांढऱ्या रंगातील नैतिक विभागणीपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो आता अँटी-हिरो, ग्रे-झोन आणि गुन्हेगारी केंद्रित कथानकाचा प्रतीक बनला आहे. ‘के.जी.एफ.’, ‘पुष्पा’, ‘मिर्झापूर’, ‘छावा’ आणि ‘ॲनिमल’ यांसारख्या कलाकृतींनी हा ट्रेंड अधिक मजबूत केला. बॉक्स ऑफिसची आकडेवारी सांगते की, प्रेक्षक आता या गडद आणि हिंसक पात्रांमध्ये थरार शोधत आहेत. या पार्श्वभूमीवर अक्षय खन्ना आणि बॉबी देओल यांनी ‘स्टार व्हिलन’चे …
Read More » -
18 January
मातीतले खेळ
मैदानी खेळ म्हणजे कोणते, असा प्रश्न हल्ली एखाद्या शाळकरी मुलाला विचारला, तर कदाचित मैदानी म्हणजे काय असा प्रतिप्रश्न येण्याची भीती वाटते. मोकळी मैदानेच कमी झाल्याने अनेक शाळांनाही मोठी ग्राऊंड्स नसतात. जी काही मैदाने असतात, त्यावर संध्याकाळी पैसे भरून कॅम्प चालवले जातात. त्यामुळे रस्त्यावर क्रिकेट, फुटबॉल खेळणे किंवा इतर दंगामस्ती करण्याची आपल्या पिढीने घेतलेली मजा कदाचित यापुढे मुलांना घेता येईल, की …
Read More » -
18 January
नातेसंबंध बिघडवणाऱ्या सवयी सोडा !
जोडीदार असो, मित्र असो किंवा अन्य कौटुंबिक नाते असो, किंबहुना प्रोफेशनल रिलेशन्स असले तरी हे नाते निभावणे आणि टिकवणे ही कला आहे. ज्यांना ही कला जमली त्यांचं आयुष्य आनंदमय आणि आनंददायी झालं. पण ही कला काही नियमांसह येते. यामध्ये सर्वांत महत्त्वाची आणि लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे अगदी छोट्या-छोट्या सवयीही या नात्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतात. सबब तुम्हाला तुमचे नाते …
Read More » -
18 January
समुद्रातील सूक्ष्मजीवांबाबत नवं संशोधन
का लघुग्रहाच्या धडकेने पृथ्वीवर 6.5 कोटी वर्षांपूर्वी डायनासोरसारख्या प्राण्यांसह अनेक प्रजाती नष्ट झाल्या. डायनासोरप्रमाणेच समुद्रातील सरीसृप, अपृष्ठवंशीय व अनेक सूक्ष्मजीवही नष्ट झाले होते, त्याला कारण या लघुग्रहाचा आघात हे मानले जाते. त्यावेळी जगातील समुद्रात मोठे बदल झाले, तरी अगदी खोलवर असलेले काही सूक्ष्मजीव मात्र त्यातून वाचले होते. ते कसे वाचले असावेत याचे कोडेच आहे. या आघातावेळी समुद्रातील सजीवांचे मुख्य अन्न …
Read More » -
18 January
प्रामाणिकपणाचा असाही आदर्श
चेन्नईमध्ये स्वच्छता कामगार म्हणून कार्यरत असलेल्या पद्मा यांनी आपल्या प्रामाणिकपणाने संपूर्ण देशासमोर मानवतेचा एक नवा आदर्श उभा केला आहे. कचरा साफ करत असताना पद्मा यांना सुमारे 45 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने सापडले. एवढी मोठी मालमत्ता हाती लागूनही, त्याचा एक छोटासा भागही स्वतःकडे न ठेवता त्यांनी ते दागिने पूर्णपणे परत केले. त्यांच्या या कृत्याने कोट्यवधी भारतीयांची मने जिंकली आहेत. मला …
Read More » -
18 January
अमरावतीत त्रिशंकु, नागपूर, अकोल्यात भाजप
अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून 87 जागांच्या महापालिकेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. निकालानुसार भाजपने सर्वाधिक 25 जागा जिंकत पहिल्या क्रमांकावर मजल मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी 11 जागांवर यश मिळवले आहे. अकोल्यात भाजप तर चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत संपूर्ण राज्यात भाजपने वर्चस्व सिद्ध केले आहे. मुंबईत …
Read More » -
18 January
दुटप्पीपणाचे गौडबंगाल
चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे एक शिष्टमंडळ भारत भेटीवर आले असून त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयात त्यांच्या नेत्यांशी बंद दाराआड चर्चा केली. एवढेच नव्हे तर या शिष्टमंडळाने संघाच्या मुख्यालयात जाऊन संघाचे एक ज्येष्ठ पदाधिकारी दत्तात्रय होसबाळे यांचीही भेट घेतल्याची बातमी आहे. आत्तापर्यंत भारतीय जनता पक्षाने चीनविषयी या देशातील जनतेच्या मनात टोकाची द्वेषभावना निर्माण केली. चिनीमालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले, चीनच्या ॲपवर बंदी …
Read More » -
18 January
ग्रामीण लोकशाहीची कसोटी
गेल्या दोन-तीन वर्षांपासून या निवडणुका विविध कायदेशीर पेचांमुळे प्रलंबित होत्या. निवडणुका लांबणीवर पडल्याचा थेट परिणाम ग्रामीण विकासावर झाला आहे. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासकांच्या हाती होता. प्रशासकीय राजवटीत लोकांशी असलेला संवाद तुटल्याने अनेक स्थानिक प्रश्न प्रलंबित राहिले. निधीचे वाटप आणि योजनांची अंमलबजावणी यामध्ये लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप नसल्याने विकासकामांची गती मंदावली होती. आता निवडणुका जाहीर झाल्याने पुन्हा एकदा लोकशाही प्रक्रियेला गती …
Read More » -
18 January
निकालांचा अन्वयार्थ
महाराष्ट्राच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या नेहमीच भविष्यातील सत्तासंघर्षाची नांदी मानल्या जातात. नुकत्याच पार पडलेल्या 29 महानगरपालिकांच्या निकालांनी राज्याच्या राजकारणातील अनेक प्रस्थापित समीकरणे उधळून लावली असली तरी नगरपालिका आणि नगर पंचायतींमधील महायुतीला अनुकूल असणारा जनमताचा कौल या निकालांमधूनही दिसून आला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या अभूतपूर्व यशानंतर, या निकालांनी ‘प्रो-इन्कम्बसी’ म्हणजेच सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असलेल्या लाटेवर शिक्कामोर्तब केले आहे. महापालिकांचे …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







