अलीकडेच धाराशिव इथे पार पडलेल्या उद्योजकता विकास कार्यक्रमास सहभागी झालो होतो. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या महिला प्रशिक्षणार्थींशी लाडकी बहीण योजनेबद्दल संवाद साधला. त्यांना मिळणाऱ्या या योजनेतल्या रकमेतूनत्या नेमके काय करतात आणि त्यांच्या आयुष्यात त्या दरमहा पंधराशे रुपयांनी किती दिलासा मिळतो याबाबत त्यांचे मनोगत जाणून घेतले. त्यातल्या बऱ्याच महिला या लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशाचा वापर आपल्या मुलांच्या आणि मुलींच्या शिक्षणासाठी …
Read More »TimeLine Layout
January, 2026
-
11 January
‘कॉकटेल 2’चा मुहूर्त ठरला
‘कॉकटेल’ या 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने तरुणाईला वेड लावले होते. सैफ अली खान, दीपिका पदुकोण आणि डायना पेंटी यांच्या त्रिकोणी प्रेमकथेनंतर आता तब्बल 14 वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘कॉकटेल 2’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता समोर आली असून, सप्टेंबर 2026 मध्ये हा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या नव्या भागात शाहिद कपूर …
Read More » -
11 January
हिंसक चित्रपटांचा घातक प्रवाह
सध्याचे हिंसाचाराने माखलेले चित्रपट नव्या पिढीला धोकादायक वळणावर नेऊन ठेवत आहेत. बासु चॅटर्जी, गुुरू दत्त, राज कपूर, हृषिकेश मुखर्जी, यश चोप्रा यांसारख्या अभिजात दिग्दर्शकांची पिढी भूतलावर अवतरली तर बॉलिवुडपटांचा झालेला विचका पाहून ‘नको तो चित्रपट’ असे म्हणतील अशी आजची स्थिती आहे. टिव्ही आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंसाचारांची दृश्य अल्पवयीन मुलांवर नकारात्मक परिणाम करत आहेत. या लोकप्रिय होत चाललेल्या धोकादायक ट्रेंडला …
Read More » -
11 January
मागे वळून पाहताना…
कोणतीही नवी सुरुवात करताना मागे वळून पाहणे आवश्यक असते. विशेषतः नव्या वर्षाचे संकल्प आखून पुढे मार्गक्रमण करत असतान मागील काळात आपल्याला एखाद्या गोष्टीत अपयश आले असेल, ठरवलेले एखादे उद्दिष्ट साध्य झालेे नसेल तर त्यामागच्या कारणांचा विचार करणे आवश्यक असते. त्याचबरोबर मागील काळात आपण कोणत्या नव्या गोष्टी शिकलो, कोणत्या गोष्टी शिकायच्या राहिल्या याचाही धांडोळा घेतला पाहिजे. त्याचबरोबर यापूर्वी केलेल्या संकल्पांची पूर्तता …
Read More » -
11 January
स्वयंपाकघरात उभं राहून पाय दुखताहेत ?
नोकरदार असो की गृहिणी, स्रियांना स्वयंपाकघरात उभं राहून काम करणं चुकलेलं नाही. पण घर, नोकरी, मुलं, जबाबदाऱ्या सगळं उत्तम प्रकारे सांभाळताना, या उभं राहून काम करण्यामुळे उद्भवणारी पायदुखी, थकवा, गुडघेदुखी हे नेहमीचेच झालेले त्रास स्रियांना चुकलेले नाहीत. वय वाढल्यावर हा त्रास आणखी वाढतो. पण यावर काही सोप्या पण प्रभावी उपायांनी महिलांना आराम मिळू शकतो. हे उपाय कोणताही विशेष खर्च किंवा …
Read More » -
11 January
लघुग्रहांची धडक रोखता येणार?
6 कोटी 60 लाख वर्षांपूर्वी पृथ्वीला एका मोठ्या आकाराच्या लघुग्रहाची धडक झाली. या धडकेमुळे निर्माण झालेले विवर आजही मेक्सिकोमध्ये ‘चिक्सुलुब क्रेटर’ या नावाने पाहायला मिळते. या लघुग्रहाच्या धडकेमुळेच पृथ्वीवरून डायनासोरचे साम्राज्य नष्ट झाले होते. काळाच्या ओघात पृथ्वीला अशा अनेक लघुग्रहांच्या, मोठ्या उल्कांच्या धडकेचा सामना करावा लागलेला आहे. त्यामुळे पृथ्वीच्या मार्गात येणाऱ्या अशा लघुग्रहांची धडक कशी टाळावी याबाबतही आधुनिक काळात विचार …
Read More » -
11 January
स्वाभिमानाने जगण्याचे असेही उदाहरण!
नवी दिल्लीतील गजबजलेल्या कनॉट प्लेस परिसरातील एक अत्यंत साधा पण मनाला भिडणारा हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत असून, त्याने स्वाभिमानाने जगण्याचा एक मोठा धडा समाजासमोर ठेवला आहे. ’इन्स्टाग्राम’वर जय प्रसाद नावाच्या वापरकर्त्याने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती रस्त्याच्या कडेला उभी राहून माचिसचे बॉक्स विकताना दिसत आहे. विशेष म्हणजे, अत्यंत गरिबीत असूनही ही व्यक्ती कोणासमोरही हात न …
Read More » -
11 January
महासत्तेची धोकादायक दंडेलशाही
व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्याविरोधात अमेरिकेने केलेली लष्करी कारवाई आणि त्यानंतर त्यांना अटक करून थेट अमेरिकेत नेण्याची घटना ही आधुनिक जागतिक राजकारणातील एका अत्यंत धोकादायक अध्यायाची नांदी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेने ज्या पद्धतीने एका सार्वभौम राष्ट्राच्या सीमा ओलांडून तिथल्या राष्ट्राध्यक्षाला ताब्यात घेतले, ते पाहता आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियम आता केवळ कागदावरच उरले आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित …
Read More » -
11 January
चिंतनशील व्यक्तिमत्वाचा वियोग
नव्या वर्षाची सुरुवात एका दु:खदायक बातमीने झाली. ज्येष्ठ हिंदुत्ववादी विचारवंत व लेखक डॉ. अशोकराव मोडक यांचे नुकतेच निधन झाले. गेली काही वर्षेते आजारी होते हे खरे असले तरी ही बातमी दु:खद आहे. कारण ज्या व्यक्ती आपल्याबरोबर दीर्घकाळ असल्या पाहिजेत असे वाटत असते अशा अत्यंत कमी व्यक्तींपैकी अशोकराव होते. एक ज्ञानसंपन्न व सक्रीय आयुष्य जगून अशोकरावांनी ह्या जगाचा निरोप घेतला आहे. …
Read More » -
11 January
आकोटात भाजपा-एमआयएम युती?
अकोला जिल्ह्यातील आकोट नगरपरिषदेत आक्रित घडले होते. साप आणि मुंगूस याप्रमाणे एकमेकांना पाण्यात पाहणारे जानी दुष्मन एकत्र आले. हिंदुत्ववादी भाजपाने इस्लामवादी एमआयएमसोबत युती केली होती. धर्माधर्मात भांडण लावून सामान्य लोकांना एकमेकांचे हत्याकांड करण्यास उद्युक्त करणारे हे दोन पक्ष सत्तेसाठी काहीही करण्यास तयार झाले. त्यावरून राज्यभरात विरोधकांनी भाजपावर टीका केली. हे प्रकरण अंगाशी येताच मुख्यमंत्र्ाी देवेंद्र फडणवीस यांनी यावर नाराजी व्यक्त …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







