‘ऑपरेशन सिंदुर’ची माहिती देशाला देताना भारतीय लष्करातील दोन रणरागिणींचे दर्शन घडले. यापैकी लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी पाकिस्तानी दहशतवादी छावण्यांवर भारतीय हवाई हल्ल्याच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी होत्या. सोफिया कुरेशी या गुजरात येथे राहणार्या आहेत. त्यांचा जन्म १९८१ मध्ये गुजरातमधील वडोदरा येथे झाला. त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पोस्ट ग्रेज्युएशन केलं आहे. सोफिया यांचे आजोबा देखील भारतीय सैन्यात होते. तर त्यांच्या वडिलांनी काही वर्ष भारतीय …
Read More »व्यक्ति विकास
सर्वांत आव्हानात्मक विमानतळ
जगभरात अनेक अनोखी विमानतळं आहेत. सेंट मार्टिनच्या माहो बीचवर तर अक्षरशः लोकांच्या डोक्याजवळून उडत जाऊन विमाने विमानतळावर उतरतात. काही विमानतळांवर लँडिंग करणे, हे अतिशय जिकिरीचे काम असते. असाच एक विमानतळ हिमालयाच्या कुशीतील भूतान देशात आहे. या विमानतळावर विमान उतरवण्याचे धाडस केवळ निवडक 50 वैमानिकच करू शकतात! चारही बाजूंनी हिमालयाच्या पर्वतशिखरांच्या कोंदणात असणारं हे विमानतळ जगातील सर्वाधिक आव्हानात्मक विमानतळ मानलं जातं. …
Read More »यशोरहाणी संघर्षशील लेखकाची
ही 19 व्या शतकातील कथा आहे. रशियातील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलाची करुण संघर्षकहाणी आहे. या मुलाला वाचन आणि लेखनाची खूप आवड होती. जर त्याला कळले की एखाद्याकडे चांगले पुस्तक आहे, तर तो कठोर परिश्रम करून ते मागवत असे. लोकांच्या तिरस्काराची आणि थट्टेची पर्वा न करता, तो रात्री वॉचमन म्हणून काम करायचा आणि जेव्हा – जेव्हा त्याला वेळ मिळायचा तेव्हा …
Read More »आठ कोटी वर्षापूर्वीचा जलचर
अमेरिकेत टेक्सासमध्ये तब्बल 8 कोटी वर्षांपूर्वीच्या एका जलचर प्राण्याचे जीवाश्म सापडले आहे. या प्राण्याचा जबडा मशरुमसारख्या दिसणार्या मजबूत दातांनी भरलेला होता. हा दुर्मीळ मोसासॉर प्राणी वीस फूट लांबीपर्यंतही वाढू शकत असावा, असे संशोधकांनी म्हटले आहे. संशोधकांना अशा प्राण्यांचे दोन जबडे सापडले आहेत. या प्राण्यांना ‘ग्लोबिडेन्स अलाबामेन्सिस’ असे वैज्ञानिक नाव आहे. त्यांच्या जबड्यात गोलाकार दातांची रांग आहे. हे प्राणी आपल्या भक्ष्याला …
Read More »यशाची नवी ‘दृष्टी’
जगात असे अनेक लोक आहेत, ज्यांनी आपल्या अपंगत्वावर मात करुन आयुष्यात खूप मोठ्या गोष्टी मिळवल्या आहेत. श्रीकांत बोला हे अशा व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत. त्यांचा जन्म 7 जुलै 1992 रोजी आंध्र प्रदेशच्या सीतारामपुरम येथे झाला. श्रीकांत जन्मापासून अंध आहेत. मुलगा झाल्यावर प्रत्येकाच्या घरात मोठा आनंदोत्सव साजरा केला जातो. पण, अतिशय गरीब कुटुंबात अंध श्रीकांत यांचा जन्म झाल्याने घरात निराशा पसरली होती. …
Read More »सर्वप्रथम चक्रीवादळे कुणी ओळखली?
‘मोनालिसा’सारखी अजरामर कलाकृती बनवणारा इटालियन चित्रकार, शिल्पकार लिओनार्दो दा विंची याच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते. हा माणूस एक कलाकार असण्याबरोबरच संशोधकही होता. त्याच्या अनेक चित्रांचा, स्केचेसचा, डायरीतील नोंदींचा आजही अभ्यास होत असतो. लिओनार्दो दा विंची यानेच सर्वप्रथम चक्रीवादळे ओळखली, असे वैज्ञानिकांनी म्हटलेले आहे, हे विशेष! अॅन पिझोरूसो या भूगर्भशास्त्रज्ञ व कला विद्वान महिलेने म्हटले होते की, लिओनार्दो दा विंची यांच्या …
Read More »कहाणी एका ‘डोसा सम्राटा’ची
प्रेम गणपती यांचा जन्म 1973 साली तामिळनाडूतील तूतीकोरिन या खेडेगावात एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या कुटुंबात आई-वडील आणि सहा भावंडे अशी भरपूर मंडळी होती. त्यांनी 10वीपर्यंत शिक्षण पूर्ण केले; मात्र आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण शक्य झाले नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांनी चेन्नईत 250 रुपयांची नोकरी पत्करली आणि मिळालेली रक्कम घरी पाठवत राहिले.एक दिवस एका परिचिताने प्रेम यांना मुंबईत येऊन …
Read More »रोबोटिक नी रिप्लेसमेंट का फायद्याची?
बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, सतत लिफ्टचा वापर, दीर्घकाळ नियमित गाडीवर फिरणे, पोषणतत्वरहीत आहाराचे दीर्घकाळ सेवन, लठ्ठपणा यांसारख्या अनेक कारणांमुळे अलीकडील काळात सांधेदुखीची समस्या भेडसावणार्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषतः आपल्याकडे महिलांना स्वयंपाकादी कामांसाठी आयुष्यातील अनेक वर्षे दररोज ओट्यापुढे बरेच तास उभे राहावे लागते. तसेच घरातील कष्टाची कामे करावी लागतात. तरुणपणात या सर्वांचे परिणाम जाणवत नाहीत; मात्र शरीर वृद्धत्वाकडे झुकू लागले …
Read More »चिनू कालाः संघर्षातून यशाकडे झेप
उद्योजकतेची खरी ओळख म्हणजे संघर्षातून स्वतःला घडवत, अपयशांवर मात करत यशाची नवी उंची गाठणं. अशीच एक प्रेरणादायक कहाणी आहे चिनू काला यांची जी एकेकाळी घराघरात वेगवेगळ्या वस्तू विकणारी एक साधी मुलगी होती आणि आज रुबन्स अॅक्सेसरीज या प्रसिद्ध ब्रँडची संस्थापक आहे. चिनू काला यांचं बालपण फारसं सुखकर नव्हतं. केवळ 15 व्या वर्षी, कौटुंबिक मतभेदांमुळे त्यांनी घर सोडलं. हातात पैसा नव्हता, …
Read More »देशातील पहिली इलेक्ट्रिक सुपरबाईक
सध्या जगभरात इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला आहे. ‘क्लिन एनर्जी’वर चालणार्या या वाहनांमुळे प्रदूषण होत नाही. तसेच जीवाश्म इंधनदरवाढीच्या काळात ही वाहने लोकांना किफायतशीरही वाटतात. चारचाकी, दुचाकी वाहनांपासून चक्क विमानांपर्यंतही अशी वाहने बनवली जात आहेत. आता आपल्या देशात पहिली इलेक्ट्रिक सुपरबाईकही समोर आली आहे. देशातील पहिल्या सुपरबाईकचा मान ‘अल्ट्राव्हायोलेट एफ’ ला मिळाला आहे. या बाईकचा कमाल वेग ताशी 265 कि.मी. असा आहे. …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र