मायकेल फेराडे यांचा जन्म 22 सप्टेंबर 1791 रोजी इंग्लंडमधील न्यूग्टिंन बट्स येथे एका गरिब कुटुंबात झाला. त्यांचे वडील लोहारकाम करत असत. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी मायकेल यांना लहान वयातच काम करावे लागले. त्यांना औपचारिक शिक्षण घेण्याची संधी फारशी मिळाली नाही. दारिद्य्रामुळे त्यांना केवळ प्राथमिक शिक्षण घेता आले. मात्र, ज्ञानाची भूक असणार्या फेराडे यांनी पुस्तके वाचून …
Read More »व्यक्ति विकास
वार्धक्य रोखायचंय?
वार्धक्य रोखण्याबाबत सतत नवनवे संशोधन होत असते. आहारातील बदलही यासाठी उपयुक्त ठरत असतात. कमी कर्बोदके व कमी उष्मांक असलेला आहार हा वार्धक्याच्या प्रक्रियेचा वेग कमी करतो. कारण त्यात विशिष्ट प्रकारचे संयुग असते, असे वैज्ञानिकांचे मत आहे. ग्लॅडस्टोन प्रयोगशाळेतील संशोधक एरिक वेर्दिन यांनी सांगितले की, मानवी शरीरातील एक संयुग हे वार्धक्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. वयाशी निगडित असलेले हृदयरोग, …
Read More »जिज्ञासेतून उभारली कंपनी आणि…
चेन्नईतील बायोटेक्नॉलॉजी पदवीधर अनिस अहमद यांना लहानपणापासून निसर्ग आणि गार्डनिंगची विशेष आवड होती. नारळसमृद्ध भागात वाढलेले असल्यामुळे त्यांना वडिलांच्या मार्गदर्शनाने कोको पीट या संकल्पनेची ओळख झाली. बायोटेक्नॉलॉजीची पदवी पूर्ण केल्यानंतर अनिस यांनी एडिनबर्ग युनिव्हर्सिटी आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॅकिशवॉटर अॅक्वाकल्चर येथे संशोधक म्हणून काम केले. याच काळात त्यांची कोको पीटविषयीची जिज्ञासा वाढली आणि त्यांनी या पदार्थाच्या गुणधर्मांबद्दल सखोल संशोधन सुरू …
Read More »सर्वात पातळ काच!
जगातील सर्वात पातळ काच कुठे शोधण्यात आली हे तुम्हाला माहिती आहे का? अपघातानेच हा शोध लागला होता व या काचेची जाडी दोन अणूंइतकी आहे. कॉर्नेल व जर्मनीच्या उल्म विद्यापीठाच्या संशोधकांनी शोधलेली काच ही सर्वात पातळ काच म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये नोंदली गेली आहे. या काचेचे तावदान इतके पातळ आहे, की त्याचे सिलिकॉन व ऑक्सिजन रेणू हे इलेक्ट्रॉन …
Read More »दुर्लक्षित वैज्ञानिकाची प्रेरक कहाणी
भारताच्या प्राचीन विज्ञानाची जगभरात ओळख करून देणार्या वैज्ञानिकांमध्ये डॉ. शिवकर बापूजी तळपदेे यांचे नाव अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी 1895 साली मुंबईच्या चोपट्टी समुद्रकिनारी ‘मरुतसखा’ नावाचे पहिले स्वदेशी विमान यशस्वीरीत्या उडवले. परंतु त्यांचे नाव इतिहासाच्या पानांत मात्र झाकोळले गेले. प्रारंभिक जीवन आणि प्रेरणा शिवकर तळपदेे यांचा जन्म 1864 मध्ये मुंबई येथे झाला. त्यांना लहानपणापासूनच वेद आणि संस्कृत ग्रंथ वाचण्याची आवड होती. …
Read More »चंद्रावरील खडकांत पुरावे
प्राचीन काळात पृथ्वीचे वातावरण कसे होते, याचे सर्वात जुने पुरावे हे पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह असलेल्या चंद्रावरील खडकांमध्ये दडलेले आहेत. एका नव्या संशोधनातून ही माहिती समोर आली. नासाच्या अपोलो मोहिमेत चांद्रभूमीवरून आणलेल्या खडकांच्या अभ्यासातून ही बाब स्पष्ट झाली. 50 वर्षांपूर्वी हे खडकांचे नमुने अपोलो मोहिमेतील अंतराळवीरांनी पृथ्वीवर आणले होते. या खडकांमध्ये चुंबकीय गुणधर्मही अडकलेले आहेत. एके काळी पृथ्वीप्रमाणेच चंद्रालाही स्वतःचे …
Read More »पॅडादादांचा सक्सेमंत्र
पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी दादा सर्वांचे लाडके अभिनेते आहेत. उत्तम विनोदवीरांच्या यादीत पॅडी दादांचं नाव अग्रस्थानी आहे. अनेक मालिका आणि नाटकांमध्ये पॅडी दादांनी भूमिका साकारल्या आहेत. त्याचबरोबर ’महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांनी अनेक प्रहसनं केली आहेत. एका मुलाखतीत त्यांनी आपल्या आयुष्याच्या खडतर प्रवासाविषयी मनोगत मांडलं. ते म्हणतात, लग्नाच्या अगोदर नाट्यक्षेत्रातील माझी परिस्थिती फारशी समरूप नव्हती. घरातल्यांचा नकार होता. कारण, …
Read More »हिरे निर्मितीसाठी जगावेगळा मार्ग
गायीची ढेकर किंवा पोटातून निघणार्या वायूपासून हिरे बनवले जाऊ शकतात याची तुम्हाला कल्पना होती का? आता हे काम केले जात आहे! ‘आयपॉड’चा शोध ज्यांनी लावला, त्या टोनी फॅडेल यांनी अशा मागनि हिरे बनवण्यास सुरुवात केली आहे. हा माणूस ’थ्री इडियटस्’च्या रँचोसारखाच वेगवेगळे प्रयोग करणारा आहे. आता त्याने गायीची ढेकर व गॅस यांच्यामधून निघणार्या मिथेन वायूचे रूपांतर हिर्यांमध्ये करण्याचा मार्ग शोधला …
Read More »आकांक्षा पुढती जिथे…
मेहनत करण्याची तयारी, जिद्द, चिकाटीला प्रामाणिकपणाची जोड असेल तर आर्थिक परिस्थिती, शारिरिक व्यंग किंवा कोणतीही अडचण तुमच्या यशाच्या आड येत नाही. भव्य धर्मेश पालेजाच्या कहाणीतून आपल्याला हीच शिकवण मिळते. भव्य स्वत:च्या पायांवर उभा राहू शकत नाही. तरी देखील तो आपल्या कर्तृत्वाने लाखो तरुणांना प्रेरणा देतोय.दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या भव्य धर्मेश पालेजाने पहिल्याच टप्प्यात सनदी लेखापाल (सीए) ही परीक्षा उत्तीर्ण केली …
Read More »खोबरे कोणते खावे?
नारळ पाण्याबरोबरच त्याचे खोबरेही आरोग्यासाठी लाभदायक ठरत असते. मात्र ओले खोबरे अधिक गुणकारी की सुके असा प्रश्नही अनेकांना पडत असतो. आता तज्ज्ञांनी याचे उत्तर दिले आहे. ओल्या नारळाचा स्वाद हलका गोड आणि नटी टेस्टचा असतो. सुके खोबरेही गोड असते पण ते अधिक चावावे लागते. नारळ आतून कोरडा पडला की त्याचे खोबरे करवंटीपासून वेगळे होते. असे खोबरे वाळवून ते साठवून ठेवले …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र