दिग्दर्शक हनी त्रेहान यांच्या बहुप्रतिक्षित ’सतलज’ या चित्रपटाला डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊन अवघे 48 तास झाले असतानाच ’झी 5’ या ओटीटी प्लॅटफॉर्मने भारतीय प्रेक्षकांसाठी हा चित्रपट आपल्या लायब्ररीमधून अचानक हटवला आहे. शुक्रवार, 3 जुलै 2026 रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता भारतात स्ट्रीम करण्यासाठी उपलब्ध नाही, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तो अजूनही पाहता येत आहे. या अनपेक्षित निर्णयामुळे भारतातील प्रेक्षक आणि …
Read More »सिनेचर्चा
लग्नानंतर गोविंदाची अनेक अफेअर्स ः सुनीता
अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता आहुजा हिने नुकत्याच सुरू झालेल्या ’लॉक अप: सच या सझा’ (सीझन 2) या रिॲलिटी शोच्या प्रीमियरमध्ये आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल अनेक धक्कादायक आणि खळबळजनक खुलासे केले आहेत. शोचे सूत्रसंचालन करणाऱ्या फराह खान आणि रितेश देशमुख यांच्यासमोर सुनिताने खुलेपणाने कबुली दिली की, लग्नानंतर गोविंद्याचे अनेक महिलांसोबत प्रेमसंबंध (अफेअर्स) होते. प्रीमियर दरम्यान फराह खानने सुनिता आहुजाशी संबंधित जुन्या हेडलाईन्स …
Read More »करीना आणि पृथ्वीराजचा ‘दायरा’
करीना कपूर खान आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘दायरा’ या आगामी चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हा बहुप्रतीक्षित चित्रपट येत्या 18 सप्टेंबर 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोन दिग्गज कलाकार पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केले आहे. ‘मुल्क’, …
Read More »ट्रेलरने वाढवली उत्सुकता
‘धमाल 4’या बहुप्रतिक्षित विनोदी चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांना पुन्हा एकदा हास्याचा मनोरंजक प्रवास अनुभवायला मिळणार आहे. दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट येत्या 10 जुलै 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या वेळची कथा एका अथांग सोन्याच्या खजिन्याभोवती आणि रहस्यमय साहसाभोवती फिरते. यामध्ये नेहमीप्रमाणेच संभ्रम, स्पर्धा आणि अटीतटीची लढत पाहायला मिळेल. ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे …
Read More »‘बंटवारा’साठी आमीरचा पुढाकार
आमिर खान, सनी देओल आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या बहुप्रतीक्षित ‘लाहोर 1947’ या चित्रपटाच्या शीर्षकात (टायटल) मोठा बदल करण्यात आला असून, आता हा चित्रपट ‘बंटवारा’ या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शीर्षकाचे हक्क मिळवण्यासाठी स्वतः निर्माता आमिर खानने घेतलेल्या पुढाकारामुळे हा महत्त्वपूर्ण बदल शक्य झाला आहे. या चित्रपटाचे नाव आधी ‘लाहोर 1947’ असे निश्चित करण्यात आले होते. मात्र, एका …
Read More »रणवीर-फरहान वादात सलमानची मध्यस्थी
‘डॉन 3’ चित्रपटावरून अभिनेता रणवीर सिंग आणि चित्रपट निर्माते-दिग्दर्शक फरहान अख्तर यांच्यात निर्माण झालेला वाद मिटवण्यासाठी सुपरस्टार सलमान खान आता मध्यस्थ म्हणून पुढे आला आहे. चित्रपटसृष्टीतील या मोठ्या वादाला माध्यमांमध्ये मोठे स्वरूप येऊ नये आणि दोन्ही बाजूंच्या हितसंबंधांचे रक्षण व्हावे, यासाठी सलमान खानने वैयक्तिक स्तरावर पुढाकार घेतला आहे. रणवीर सिंगने ‘डॉन 3’ चित्रपटातून अचानक माघार घेतल्यामुळे हा वाद निर्माण झाला …
Read More »चर्चा वेदांग-नाओमिकाच्या जवळीकीची
अभिनेता वेदांग रैना आणि बॉलिवूडचे दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांची नात नाओमिका सरन यांना मुंबईत एकत्र पाहण्यात आले आहे. हे दोघे जण चित्रपटगृहाबाहेर एकत्र स्पॉट झाल्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे. मुंबईतील जुहू येथील एका मल्टिप्लेक्सबाहेर अचानक समोर आलेल्या कॅमेऱ्यांमुळे नाओमिका सरन काहीशी लाजली आणि तिने हसत स्वतःचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. लिफ्टकडे जात असताना घडलेल्या …
Read More »अजय-अनुभवचे पॅचअप!
बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा तब्बल 18 वर्षांनंतर एका मोठ्या बजेटच्या ॲक्शन चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत. 2007 मधील ‘कॅश’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्यानंतर या दोघांमध्ये कोणताही संपर्क नव्हता, मात्र आता त्यांच्यातील दुरावा संपला आहे. अनुभव सिन्हा यांनी स्पष्ट केले होते की, त्यांच्यात वैयक्तिक असा कोणताही वाद नव्हता, तर तो मतभेद चित्रपटाचे निर्माते आणि …
Read More »आमिषाबाईंचे टीकास्र
बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलने सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्याच्या पिढीतील अभिनेत्रींवर आणि त्यांच्या प्रसिद्धी मिळवण्याच्या पद्धतींवर सडकून टीका केली आहे. अमिषाच्या मते, वर्षाला केवळ दोन साधारण चित्रपट केल्याने कोणीही सुपरस्टार होत नाही. तिने नमूद केले की, अनेक अभिनेत्री स्वतःकडे एकही एकल ब्लॉकबस्टर चित्रपट नसताना केवळ प्रसिद्धी माध्यमांचा (पीआर) वापर करून स्वतःला मोठे स्टार म्हणून मिरवत आहेत. अमिषाने ‘एक्स’वर पोस्ट करत स्पष्ट …
Read More »तापसी बनली ब्रँड ॲम्बसेडर
प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूची आता ‘इनॅमर’ या नामांकित ब्रँडच्या नवीन मोहिमेसाठी ब्रँड अँबेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. महिलांच्या फॅशन आणि अंतर्वस्त्र निर्मिती क्षेत्रात अग्रेसर असलेल्या या कंपनीने तापसीसोबतच्या या नव्या सहकार्याची घोषणा केली आहे. या मोहिमेद्वारे महिलांच्या व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास आणि आधुनिकतेचा मिलाफ साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तापसी पन्नू तिच्या धाडसी आणि हटके भूमिकांसाठी ओळखली जाते. ‘इनॅमर’च्या मते, तापसीचे …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र