दिग्दर्शक हनी त्रेहान यांच्या बहुप्रतिक्षित ’सतलज’ या चित्रपटाला डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊन अवघे 48 तास झाले असतानाच ’झी 5’ या ओटीटी प्लॅटफॉर्मने भारतीय प्रेक्षकांसाठी हा चित्रपट आपल्या लायब्ररीमधून अचानक हटवला आहे. शुक्रवार, 3 जुलै 2026 रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता भारतात स्ट्रीम करण्यासाठी उपलब्ध नाही, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तो अजूनही पाहता येत आहे. या अनपेक्षित निर्णयामुळे भारतातील प्रेक्षक आणि चित्रपटाचे चाहते कमालीचे आश्चर्यचकित झाले आहेत. ‘झी 5’ ने सोशल मीडियावर एक अधिकृत पत्रक जारी केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, प्रदर्शनानंतर ’सतलज’ चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद खरोखरच अभूतपूर्व आहे. ज्या प्रेक्षकांनी सबस्क्रिप्शन घेऊन हा चित्रपट पाहिला आणि त्याला पाठिंबा दिला, त्या प्रत्येकाचे आम्ही आभारी आहोत. सध्याच्या घडामोडी लक्षात घेता, पुढील सूचनेपर्यंत हा चित्रपट भारतात उपलब्ध असणार नाही. योग्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा चित्रपट पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. – अपर्णा देवकर
Check Also
करीना आणि पृथ्वीराजचा ‘दायरा’
करीना कपूर खान आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘दायरा’ …
पांचजन्य वृत्तपत्र