साधारणपणे समाजात ’हो’ म्हणण्याला सकारात्मक आणि ‘नाही’ म्हणण्याला नकारात्मक मानले जाते. मात्र, जेव्हा विषय स्वतःच्या भविष्याचा आणि करिअरचा येतो, तेव्हा ‘नाही’ म्हणणे हे अधिक सकारात्मक आणि फलदायी ठरते. आयुष्यात आपल्याला काय करायचे आहे, यापेक्षा आपल्याला काय ‘करायचे नाही’ हे स्पष्ट असणे यशासाठी अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा आपण केवळ आव्हाने स्वीकारण्याच्या नावाखाली किंवा कोणाला दुखावायचे नाही म्हणून चुकीच्या पर्यायांना ‘हो’ म्हणतो …
Read More »घरकुल
लोखंडी कढईच्या स्वच्छतेसाठी
अनेक वर्षांपासून लोखंडी कढई ही स्वयंपाक घराचा अविभाज्य भाग राहिली आहे. मध्यंतरीच्या काळात नॉनस्टिकची लाट आली होती. या लाटेने लोखंडी कढयांना बाहेर घालवण्याचा प्रयत्न झाला होता; पण आरोग्याच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व कालातीत असल्याचे लक्षात आल्यामुळे पुन्हा या कढयांना सन्मानाने किचनमध्ये स्थान दिले जात आहे. अलीकडील काळात भाजी बनवण्यापासून ते पुऱ्या तळण्यापर्यंत या कढयांचा वापर केला जातो. यामध्ये बनवलेल्या पदार्थांना वेगळी …
Read More »नियमित अभ्यासच गरजेचा!
सध्या कॉलेज कॅम्पसमध्ये ‘एक्झाम फीव्हर’ची चर्चा रंगू लागली आहे. कारण परीक्षा आता जवळ येत आहेत. खरे पाहता परीक्षा ही भीती नसून केवळ स्वतःच्या अभ्यासाचे मूल्यमापन करण्याची पद्धत आहे. पण बहुतेक विद्यार्थी वर्षभर आजचा अभ्यास उद्यावर ढकलतात. परिणामी, परीक्षेच्या तोंडावर अभ्यासाचा डोंगर उभा राहतो. चांगली तयारी करण्यासाठी रोज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी वेळापत्रक बनवून सर्व विषयांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. ज्या …
Read More »कमी उंचीच्या तरुणींसाठी स्टाईलमंत्रा
आजही अनेक मुली कमी उंचीमुळे स्टाईलच्या बाबतीत काहीशा बावचळलेल्या दिसतात. त्यांच्यात आत्मविश्वास कमी असतो. वास्तविक, उंची कमी असली तरीही योग्य कपडे, रंगसंगती आणि फॅशन ट्रिक्समुळे तुम्ही अधिक उंच, स्मार्ट आणि आत्मविश्वासपूर्ण बनू शकता. कंबरेच्या वर असणारे बॉटम्स घाला ः हाय-वेस्ट जीन्स, पँट किंवा स्कर्ट अशा प्रकारचे कपडे कंबरेच्या थोड्या वरपासून सुरू होतात. त्यामुळे पाय लांब दिसतात आणि शरीराचा खालचा भाग …
Read More »मुलाखतीदरम्यान काय विचारावे?
नोकरी मिळवण्याच्या प्रक्रियेत इंटरव्ह्यू अथवा मुलाखत हा अत्यंत महत्वाचा भाग असतो. तुम्हाला कंपनीचे व्यवस्थापक वेगवेगळे प्रश्न विचारून विविध विषयात तुमचे ज्ञान किती आहे हे आजमावून पाहतो. उमेदवारही मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला प्रश्न विचारू शकतो. या प्रश्नांमधून त्या कंपनीमध्ये आपण काम करू शकू की नाही हे कळू शकते. तसेच व्यवस्थापनालाही हा उमेदवार किती पात्रतेचा आहे हे कळू शकते. मुलाखतीच्या वेळी जर उमेदवाराने …
Read More »कपाट ठेवा निटनेटकं
अनेकदा असं होतं की आपल्या कपाटात कपडे भरलेले असतात, पण ऐनवेळी काय घालावं हेच समजत नाही. तुमचंही असंच होत असेल, तर कपाट आवरण्याची वेळ आली आहे असे समजावे. नव्या कपड्यांची खरेदी करण्याऐवजी, आधी जे आहेत ते व्यवस्थित लावल्यास मनालाही शांती लाभेल. वॉर्डरोब मॅनेजमेंट हा आजच्या तरुणींचा आवडता छंद ठरला आहे. पण यासाठीचा मुहुर्त उजाडण्यासच मुळी वेळ लागतो. असो, पण जेव्हा …
Read More »मातीतले खेळ
मैदानी खेळ म्हणजे कोणते, असा प्रश्न हल्ली एखाद्या शाळकरी मुलाला विचारला, तर कदाचित मैदानी म्हणजे काय असा प्रतिप्रश्न येण्याची भीती वाटते. मोकळी मैदानेच कमी झाल्याने अनेक शाळांनाही मोठी ग्राऊंड्स नसतात. जी काही मैदाने असतात, त्यावर संध्याकाळी पैसे भरून कॅम्प चालवले जातात. त्यामुळे रस्त्यावर क्रिकेट, फुटबॉल खेळणे किंवा इतर दंगामस्ती करण्याची आपल्या पिढीने घेतलेली मजा कदाचित यापुढे मुलांना घेता येईल, की …
Read More »नातेसंबंध बिघडवणाऱ्या सवयी सोडा !
जोडीदार असो, मित्र असो किंवा अन्य कौटुंबिक नाते असो, किंबहुना प्रोफेशनल रिलेशन्स असले तरी हे नाते निभावणे आणि टिकवणे ही कला आहे. ज्यांना ही कला जमली त्यांचं आयुष्य आनंदमय आणि आनंददायी झालं. पण ही कला काही नियमांसह येते. यामध्ये सर्वांत महत्त्वाची आणि लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे अगदी छोट्या-छोट्या सवयीही या नात्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतात. सबब तुम्हाला तुमचे नाते …
Read More »मागे वळून पाहताना…
कोणतीही नवी सुरुवात करताना मागे वळून पाहणे आवश्यक असते. विशेषतः नव्या वर्षाचे संकल्प आखून पुढे मार्गक्रमण करत असतान मागील काळात आपल्याला एखाद्या गोष्टीत अपयश आले असेल, ठरवलेले एखादे उद्दिष्ट साध्य झालेे नसेल तर त्यामागच्या कारणांचा विचार करणे आवश्यक असते. त्याचबरोबर मागील काळात आपण कोणत्या नव्या गोष्टी शिकलो, कोणत्या गोष्टी शिकायच्या राहिल्या याचाही धांडोळा घेतला पाहिजे. त्याचबरोबर यापूर्वी केलेल्या संकल्पांची पूर्तता …
Read More »स्वयंपाकघरात उभं राहून पाय दुखताहेत ?
नोकरदार असो की गृहिणी, स्रियांना स्वयंपाकघरात उभं राहून काम करणं चुकलेलं नाही. पण घर, नोकरी, मुलं, जबाबदाऱ्या सगळं उत्तम प्रकारे सांभाळताना, या उभं राहून काम करण्यामुळे उद्भवणारी पायदुखी, थकवा, गुडघेदुखी हे नेहमीचेच झालेले त्रास स्रियांना चुकलेले नाहीत. वय वाढल्यावर हा त्रास आणखी वाढतो. पण यावर काही सोप्या पण प्रभावी उपायांनी महिलांना आराम मिळू शकतो. हे उपाय कोणताही विशेष खर्च किंवा …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र