लेख-समिक्षण

Tag Archives: चालू घडामोडी

जनुकात अचूक बदल शक्य

जगभरात जीन्स म्हणजेच जनुकांबाबतही वेगवेगळे संशोधन होत असते. जनुक संपादनातील प्रकाशाचा वापर करण्याची एक वेगळी पद्धतही वैज्ञानिकांनी शोधून काढली आहे. त्यामध्ये जनुकांचे संपादन अधिक अचूक पद्धतीने करता येते. पेशीतील जनुके नियंत्रित करण्याचा हा प्रभावी उपाय सापडला असल्याचे अमेरिकेतील पीटसबर्ग विद्यापीठातील संशोधक अ‍ॅलेक्झांडर डेटर्स यांनी म्हटलेले आहे. या नवीन पद्धतीमुळे जनुकाचे पेशीतील स्थान व वेळ ठरवता येते. त्यामुळे एखादा जनुक अचूकतेने …

Read More »

फाईनमन यांची जीवनसूत्रे

रिचर्ड फाईनमन हे नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचे संपूर्ण आयुष्य हे तीव्र बुद्धिमत्ता, अनिश्चिततेची स्वीकारार्हता आणि बालसुलभ कुतूहल यांचं विलक्षण मिश्रण होतं. बालपणी ते उशिरा बोलायला शिकले. तरीही त्यांना ‘अतिशय बोलके वैज्ञानिक’ म्हणून ओळखले जाते. त्यांच्या मोकळ्या वेळेत ते चित्रकला करत असत. त्यांनी पोर्तुगीज भाषाही फक्त ब्राझीलमधील सहकार्‍यांना प्रभावित करण्यासाठी शिकली होती! प्रत्येकाला जिंकायचं असतं, पण कोणी खेळ …

Read More »

‘दहशतवादी’ बुरशी

मुदहशतवाद हा जगाचा सर्वांत मोठा शत्रू आहे असं भारतासह अनेक देश मानतात, कारण दहशतवादाची विविध रूपं या देशांनी पाहिली आहेत; भोगली आहेत. एखाद्या शहरात सर्व व्यवहार सुरळीत सुरू असताना अचानक गोळीबार सुरू होतो आणि अनेकांना रस्त्यातच अखेरचा श्वास घ्यावा लागतो. गर्दीच्या ठिकाणी एखादा भरधाव ट्रक घुसतो आणि लोकांना चिरडून निघून जातो. ‘सायबर टेररिझम’ हा नवाच प्रकार सध्या जग अनुभवत आहे. …

Read More »

एटीएमला आता फेस डिटेक्शन

बँक खात्यातील पैसे काढण्यासाठी एटीएम मशिनचा वापर आता सर्वसामान्य बनलेला आहे. जगात पाण्यापासून सोन्यापर्यंत अनेक वस्तू मिळवण्याचेही असे मशिन्स आहेत. मात्र, बँकेच्या व्यवहारासाठी मनुष्याची ओळख पटवणे हे गरजेचे असते. चीनच्या संशोधकांनी प्रथमच चेहरा पाहून माणसाची ओळख पटवणारे एटीएम यंत्र तयार केले आहे. त्यामुळे एटीएम यंत्रांवर दरोडे पडण्याची जोखीम कमी होईल. तिंगशुआ विद्यापीठ व हांगझाऊची झेकवान टेक्नॉलॉजी कंपनी यांनी हे यंत्र …

Read More »

अद्वितीय अभियांत्रिकीतील कौशल्य‘लता’

जम्मू आणि काश्मीरच्या उंच कड्यांमध्ये उभारलेला चिनाब रेल्वे ब्रिज म्हणजे केवळ एक अभियांत्रिकी आश्चर्य नव्हे, तर भारतीय विज्ञान, चिकाटी आणि नवे तंत्रज्ञान यांच्या अद्वितीय संगमाचे प्रतीक आहे. ६ जून २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन झाले. या प्रकल्पाच्या यशामागे भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू येथील प्रा. जी. माधवी लता यांचे योगदान विशेष महत्त्वाचे ठरले आहे. त्या सिव्हिल …

Read More »

उंचीचे रहस्य

मुलीसाठी वरसंशोधन करताना आपल्याकडे उत्पन्न आणि कुंडलीबरोबरच अनेक बाबी तपासल्या जातात. सगळ्यात पहिली बाब असते मुलाची उंची. मुलापेक्षा मुलगीच उंच असेल तर इतर बाबी जुळूनसुद्धा चर्चा पुढे सरकत नाही. सरासरीपेक्षा अधिक उंची असलेल्या मुलीच्या आईवडिलांना ‘हिचं कसं होणार?’ अशी चिंता लागून राहिलेली असते. जगभरात वेगवेगळ्या वंशांचे लोक राहतात आणि त्यांची सरासरी उंची कमी-अधिक असते. परंतु एका बाबतीत संपूर्ण मानवजात एकसारखी …

Read More »

शास्त्रीय संगीत मेंदूस्नेही

संगीत ही केवळ एक कला नाही. त्यामध्ये त्यापेक्षाही अधिक काही तरी निश्चितच आहे. आपल्याकडे नादब्रह्म ही संकल्पना आहे. सृष्टीचा प्रारंभच ओंकार नामक नाद शब्दाने झाला, असे आपल्याकडे मानले जाते. भारतीय अभिजात संगीताचा उगमच सामवेदातून झालेला आहे. अलीकडच्या काळात संगीतकलेकडे एक थेरपी म्हणूनही पाहिले जाते. भारतातील असो किंवा परदेशातील, मनाला सुखावणारे अभिजात किंवा शास्त्रीय संगीत आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. दररोज वीस मिनिटे …

Read More »

एका चहावाल्याची प्रेरणादायी कहाणी

बेरोजगार किंवा चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही गोष्ट थक्क करणारी आहे. बेंगळुरूतील एका चहावाल्याची मासिक कमाई तब्बल तीन लाख रुपये आहे! पण खरं आश्चर्य त्याचं कमावणं नसून, त्याचं प्रत्येक दिवस आनंदाने जगणं आहे. मुनिस्वामी डॅनियल, एक चौथीतून शाळा सोडलेला तरुण, पूर्वी ड्रायव्हर म्हणून काम करत असे. आज तो भारतातील सगळ्यांत लोकप्रिय पेय असलेला चहा विकून ’लखपती’ झाला आहे. त्याने …

Read More »

बाटलीतलं भूत

भस्मासुराला वर देणं आत्मघातकी ठरतं, हे आपल्याला पुराणकथेमधून समजलेलं आहे. परंतु तरीही आधुनिक काळात आपण असंख्य भस्मासुर जन्माला घातले; पोसले. नव्या तंत्रज्ञानाला विरोध करणं म्हणजे मानवजातीच्या कल्याणाला विरोध करणं, ही आधुनिक अंधश्रद्धा थोडा वेळ दूर ठेवून विचार करून काही प्रश्न आता आपल्याला पडायलाच हवेत. त्यातील महत्त्वाचा प्रश्न असा, की आधुनिक तंत्रज्ञानाने खरोखर अखिल मानवजातीचं कल्याण होतंय की मूठभरांचं उखळ पांढरं …

Read More »

बुरशीपासून विमानइंधन!

जेट विमानांच्या इंधनाबाबतही वेळोवेळी नवेनवे संशोधन होत असते. त्यामध्ये काही भन्नाट प्रकारही असतात. सडकी फळे, माती व कुजणारी पाने यांच्यावर नेहमी आढळणार्‍या काळ्या बुरशीपासून जेट विमानाचे इंधन तयार करण्याचा मार्ग अमेरिकी वैज्ञानिकांनी शोधून काढलेला आहे. त्यामुळे विमानांसाठी किफायतशीर इंधन तयार करणे भविष्यात शक्य होणार आहे. अतिशय आश्वासक असे हे संशोधन आहे, असे वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक बिरगिट एरिंग यांनी सांगितले. …

Read More »