लेख-समिक्षण

Tag Archives: चालू घडामोडी

बाळ एक,जन्म दोनदा!

एकाच जन्मात पुन्हा जन्माला येण्याची इच्छा कुणाला नसते? मुठीतून वाळू घसरत जावी, तसं आयुष्य हातातून निसटून जात असतं आणि योजलेल्या अनेक गोष्टी वेळच्या वेळी होत नाहीत. अनेक गोष्टी थोडक्यात हुकतात. कर्तृत्व असूनही यश हुलकावणी देत राहतं. अशा वेळी प्रत्येकाला वाटतं, आयुष्य पुन्हा पहिल्यापासून सुरू करता आलं तर..! परंतु आपण निसर्गनियमाच्या विरोधात जाऊ शकत नाही. मागे वळू शकत नाही आणि आहे …

Read More »

आठ कोटी वर्षापूर्वीचा जलचर

अमेरिकेत टेक्सासमध्ये तब्बल 8 कोटी वर्षांपूर्वीच्या एका जलचर प्राण्याचे जीवाश्म सापडले आहे. या प्राण्याचा जबडा मशरुमसारख्या दिसणार्‍या मजबूत दातांनी भरलेला होता. हा दुर्मीळ मोसासॉर प्राणी वीस फूट लांबीपर्यंतही वाढू शकत असावा, असे संशोधकांनी म्हटले आहे. संशोधकांना अशा प्राण्यांचे दोन जबडे सापडले आहेत. या प्राण्यांना ‘ग्लोबिडेन्स अलाबामेन्सिस’ असे वैज्ञानिक नाव आहे. त्यांच्या जबड्यात गोलाकार दातांची रांग आहे. हे प्राणी आपल्या भक्ष्याला …

Read More »

यशाची नवी ‘दृष्टी’

जगात असे अनेक लोक आहेत, ज्यांनी आपल्या अपंगत्वावर मात करुन आयुष्यात खूप मोठ्या गोष्टी मिळवल्या आहेत. श्रीकांत बोला हे अशा व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत. त्यांचा जन्म 7 जुलै 1992 रोजी आंध्र प्रदेशच्या सीतारामपुरम येथे झाला. श्रीकांत जन्मापासून अंध आहेत. मुलगा झाल्यावर प्रत्येकाच्या घरात मोठा आनंदोत्सव साजरा केला जातो. पण, अतिशय गरीब कुटुंबात अंध श्रीकांत यांचा जन्म झाल्याने घरात निराशा पसरली होती. …

Read More »

नवा रंग

‘अगर रंग ना हो, तो कैसी बेरंग लगेगी ये दुनिया..!’ या शब्दांकडे फक्त प्रसिद्ध संवाद म्हणून न पाहता त्यात सांगितलेल्या परिस्थिती ची कल्पना करून पाहा. आपल्याला सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसतं, त्याहीपेक्षा कितीतरी अधिक रंगछटा पाहण्याची क्षमता आपल्याला लाभली आहे. कितीतरी रंगछटांची नावंही आपल्याला माहीत नसतात; पण त्या आपल्याला दिसत असतात. अशा अंदाजे एक दशलक्ष रंगछटा आपण पाहू शकतो; परंतु त्या सर्व …

Read More »

सर्वप्रथम चक्रीवादळे कुणी ओळखली?

‘मोनालिसा’सारखी अजरामर कलाकृती बनवणारा इटालियन चित्रकार, शिल्पकार लिओनार्दो दा विंची याच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते. हा माणूस एक कलाकार असण्याबरोबरच संशोधकही होता. त्याच्या अनेक चित्रांचा, स्केचेसचा, डायरीतील नोंदींचा आजही अभ्यास होत असतो. लिओनार्दो दा विंची यानेच सर्वप्रथम चक्रीवादळे ओळखली, असे वैज्ञानिकांनी म्हटलेले आहे, हे विशेष! अ‍ॅन पिझोरूसो या भूगर्भशास्त्रज्ञ व कला विद्वान महिलेने म्हटले होते की, लिओनार्दो दा विंची यांच्या …

Read More »

कहाणी एका ‘डोसा सम्राटा’ची

प्रेम गणपती यांचा जन्म 1973 साली तामिळनाडूतील तूतीकोरिन या खेडेगावात एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या कुटुंबात आई-वडील आणि सहा भावंडे अशी भरपूर मंडळी होती. त्यांनी 10वीपर्यंत शिक्षण पूर्ण केले; मात्र आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण शक्य झाले नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांनी चेन्नईत 250 रुपयांची नोकरी पत्करली आणि मिळालेली रक्कम घरी पाठवत राहिले.एक दिवस एका परिचिताने प्रेम यांना मुंबईत येऊन …

Read More »

परावलंबित्व नकोच!

‘असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी,’ अशी आपल्याकडे म्हण आहे. माणसाच्या ऐतखाऊ वृत्तीचं वर्णन या म्हणीतून केलं गेलंय. विनासायास एखादी गोष्ट मिळत असेल तर कुणाला नको असते? ‘अमक्याबरोबर तमकं फ्री’ अशा जाहिरातींची भुरळ आपल्याला पडतेच की! परंतु लोकांना एखादी गोष्ट मोफत देण्याच्या सरकारी योजनांवर मात्र कडाडून टीका होत असते. मध्यंतरीच्या काळात अर्थतज्ज्ञांनी अशा योजनांचा पंचनामा करणारं भरपूर लेखन केलं. परंतु …

Read More »

रोबोटिक नी रिप्लेसमेंट का फायद्याची?

बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, सतत लिफ्टचा वापर, दीर्घकाळ नियमित गाडीवर फिरणे, पोषणतत्वरहीत आहाराचे दीर्घकाळ सेवन, लठ्ठपणा यांसारख्या अनेक कारणांमुळे अलीकडील काळात सांधेदुखीची समस्या भेडसावणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषतः आपल्याकडे महिलांना स्वयंपाकादी कामांसाठी आयुष्यातील अनेक वर्षे दररोज ओट्यापुढे बरेच तास उभे राहावे लागते. तसेच घरातील कष्टाची कामे करावी लागतात. तरुणपणात या सर्वांचे परिणाम जाणवत नाहीत; मात्र शरीर वृद्धत्वाकडे झुकू लागले …

Read More »

चिनू कालाः संघर्षातून यशाकडे झेप

उद्योजकतेची खरी ओळख म्हणजे संघर्षातून स्वतःला घडवत, अपयशांवर मात करत यशाची नवी उंची गाठणं. अशीच एक प्रेरणादायक कहाणी आहे चिनू काला यांची जी एकेकाळी घराघरात वेगवेगळ्या वस्तू विकणारी एक साधी मुलगी होती आणि आज रुबन्स अ‍ॅक्सेसरीज या प्रसिद्ध ब्रँडची संस्थापक आहे. चिनू काला यांचं बालपण फारसं सुखकर नव्हतं. केवळ 15 व्या वर्षी, कौटुंबिक मतभेदांमुळे त्यांनी घर सोडलं. हातात पैसा नव्हता, …

Read More »

तपासाची ‘दशा ’

एखादी व्यक्ती बेपत्ता होते. बरीच वर्षं तिचा शोध लागत नाही. अखेर ती या जगात नाही, असं सगळे मानू लागतात… आणि अनेक वर्षांनंतर ती व्यक्ती जिवंत असल्याचं समोर येतं. नाटक-सिनेमासाठी ही कथा ठीक आहे; पण प्रत्यक्षातही अशा काही घटना घडल्या आहेत. अर्थात, ज्याकाळी संपर्कमाध्यमं अत्यल्प होती, त्या काळात अशा घटना पाहायला मिळतात. विशेषतः युद्धावर गेलेला एखादा सैनिक बेपत्ता झाल्यास तो मरण …

Read More »