लेख-समिक्षण

Tag Archives: चालू घडामोडी

बिरदेवची संघर्षगाथा

खांद्यावर घोंगडे, डोयावर टोपी, पाणी पिण्यासाठी लोकरीचा काचोळा काखेत मारून पायात जाडजूड पायतान, मेंढ्या चारण्यासाठी रानोमाळ भटकंती, वर आभाळखाली धरती हेच आपले घर माणून जीवन कंठणार्‍या एका मेंढपाळाच्या मुलाने अथक प्रयत्नातून आयपीएस अधिकारी होण्यापर्यंत मजल मारली आहे. मेंढरं राखणारा पोरगा आता सायब झाला म्हणत अख्या महाराष्ट्रानं त्याला अक्षरश: डोयावर घेतलंय. दोन प्रयत्नात अपयश आलं मात्र जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक अभ्यासाच्या …

Read More »

दंड झाले उदंड

वाहतुकीचा एकही नियम कधीच मोडला नाही, अशी व्यक्ती शोधून सापडेल का? जाणूनबुजून नसेल; पण नकळत का होईना आपल्या हातून कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या नियमाचं उल्लंघन होतंच. आपल्यामुळं कुणाला त्रास होऊ नये, कुणाचं नुकसान होऊ नये, कुणाच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये, असा विवेकी विचार प्रत्येकानं केला असता तर नियम आणि कायद्यांची गरजच उरली नसती. रस्त्यांवरच्या अपघातांत दरवर्षी किती …

Read More »

नाज्का लाईन्समध्ये एलियन्स?

पेरू देशातील वाळवंटी मैदानात प्राचीन काळात भव्य रेषांच्या सहाय्याने काही आकृत्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत. त्यांना ‘नाज्का लाईन्स’ म्हणून संबोधले जात असते. या आकृत्या आकाशातून किंवा उंच ठिकाणांवरून पाहिल्यावरच समजतात. अशा भव्य आकृत्या व आखीव सरळ रेषांची कशी निर्मिती झाली, याचे कुतूहल आजही कायम आहे. आता ‘एआय’ म्हणजेच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या सहाय्याने तिथे यापूर्वी पाहण्यात न आलेल्या तीनशेपेक्षाही अधिक नाज्का लाईन्स …

Read More »

सायकल ब्रँडची प्रेरणादायी कहाणी

१९१२ मध्ये सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेल्या एन रंगा राव यांचे वडील शिक्षक होते. रंगा राव ६ वर्षांचे असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या निधनाने सर्व जबाबदारी रंगा राव यांच्यावर आली. लहान वयात कुटुंबाची इतकी मोठी जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. त्यांना शिक्षणाची मोठी आवड होती, पण खिशात पैसे नव्हते. घरची परिस्थिती चांगली नव्हती, अशात शिक्षण सुरूच ठेवण्यासाठी त्यांनी शाळेच्या बाहेर व्यवसाय सुरू …

Read More »

अंतरिक्षातील पहारेकरी

‘घार हिंडते आकाशी, झाप घाली पिल्लांपाशी,’ हे संत जनाबाईंचे शब्द आपल्या परिचयाचे आहेत. आधुनिक काळात या शब्दांची आठवण करून देतात ते आपण अवकाशात सोडलेले उपग्रह. पृथ्वीच्या वातावरणाबाहेर, भूस्थिर कक्षेत काम करणारे हे उपग्रह आपल्या संरक्षणाच्या दृष्टीनं खूप मोलाची जबाबदारी पार पाडतात. सीमेवर युद्धजन्य परिस्थिती आणि तणाव आपण सध्या अनुभवतो आहोत. दहशतवाद्यांच्या तळांवर भारताने अचूक हल्ला करून ते उद्ध्वस्त केले. शत्रूची …

Read More »

उलगडणार चंद्रनिर्मितीचे रहस्य

भारताच्या ‘चांद्रयान-१’ या मोहिमेवेळीच चंद्रावर पाण्याचे अस्तित्व आहे, हे महत्त्वाचे संशोधन झाले होते. आता ‘चांद्रयान-३’ मोहिमेने यशस्वी टप्पा गाठला आहे. ‘चांद्रयान-३’ च्या प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरून अत्यंत महत्त्वाचा डेटा पाठवला आहे. यामुळे चंद्राची निर्मिती कशी झाली, या सर्वात मोठा रहस्याचा लवकरच उलगडा होण्यास मदत होणार आहे. प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर १६० किलोमीटर व्यासाचा एक नवीन खड्डा शोधला आहे. दक्षिण ध्रुवाजवळील …

Read More »

प्रेरणादायी रणरागिणी

‘ऑपरेशन सिंदुर’ची माहिती देशाला देताना भारतीय लष्करातील दोन रणरागिणींचे दर्शन घडले. यापैकी लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी पाकिस्तानी दहशतवादी छावण्यांवर भारतीय हवाई हल्ल्याच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी होत्या. सोफिया कुरेशी या गुजरात येथे राहणार्‍या आहेत. त्यांचा जन्म १९८१ मध्ये गुजरातमधील वडोदरा येथे झाला. त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पोस्ट ग्रेज्युएशन केलं आहे. सोफिया यांचे आजोबा देखील भारतीय सैन्यात होते. तर त्यांच्या वडिलांनी काही वर्ष भारतीय …

Read More »

‘झुकानेवाला’ आहेच!

झुकेगा नही…’ असं म्हणणार्‍या भल्याभल्यांना झुकवणारा कुणी ना कुणी असतोच. ‘मोडेन पण वाकणार नाही,’ असा बाणा असलेल्यांचा कणा कुणासमोर तरी लवचिक होतोच. सध्या आपापली बाजू त्वेषानं लावून धरण्याचे, त्यासाठी प्रसंगी एकमेकांना बोचकारण्याचे आणि मुख्यत्वे, हार न मानण्याचे दिवस आहेत. त्यामुळं कुणी कुणासमोर सहजासहजी झुकत नाही. ‘तुझं थोडं, माझं थोडं’ असं म्हणून हातात हात घालून पुढं जाण्याचं शहाणपण आपल्यातून नामशेष होईल …

Read More »

सर्वांत आव्हानात्मक विमानतळ

जगभरात अनेक अनोखी विमानतळं आहेत. सेंट मार्टिनच्या माहो बीचवर तर अक्षरशः लोकांच्या डोक्याजवळून उडत जाऊन विमाने विमानतळावर उतरतात. काही विमानतळांवर लँडिंग करणे, हे अतिशय जिकिरीचे काम असते. असाच एक विमानतळ हिमालयाच्या कुशीतील भूतान देशात आहे. या विमानतळावर विमान उतरवण्याचे धाडस केवळ निवडक 50 वैमानिकच करू शकतात! चारही बाजूंनी हिमालयाच्या पर्वतशिखरांच्या कोंदणात असणारं हे विमानतळ जगातील सर्वाधिक आव्हानात्मक विमानतळ मानलं जातं. …

Read More »

यशोरहाणी संघर्षशील लेखकाची

ही 19 व्या शतकातील कथा आहे. रशियातील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलाची करुण संघर्षकहाणी आहे. या मुलाला वाचन आणि लेखनाची खूप आवड होती. जर त्याला कळले की एखाद्याकडे चांगले पुस्तक आहे, तर तो कठोर परिश्रम करून ते मागवत असे. लोकांच्या तिरस्काराची आणि थट्टेची पर्वा न करता, तो रात्री वॉचमन म्हणून काम करायचा आणि जेव्हा – जेव्हा त्याला वेळ मिळायचा तेव्हा …

Read More »