सध्या जगभरात इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला आहे. ‘क्लिन एनर्जी’वर चालणार्या या वाहनांमुळे प्रदूषण होत नाही. तसेच जीवाश्म इंधनदरवाढीच्या काळात ही वाहने लोकांना किफायतशीरही वाटतात. चारचाकी, दुचाकी वाहनांपासून चक्क विमानांपर्यंतही अशी वाहने बनवली जात आहेत. आता आपल्या देशात पहिली इलेक्ट्रिक सुपरबाईकही समोर आली आहे. देशातील पहिल्या सुपरबाईकचा मान ‘अल्ट्राव्हायोलेट एफ’ ला मिळाला आहे. या बाईकचा कमाल वेग ताशी 265 कि.मी. असा आहे. …
Read More »Tag Archives: चालू घडामोडी
अपार संघर्षातून यशाची कहाणी
पेट्रीसिया नारायण यांची जीवनकथा संघर्ष, आत्मविश्वास आणि अपार मेहनतीचे प्रतीक आहे. तामिळनाडूमधील नागरकोइल येथे ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेल्या पेट्रीसियांनी, वयाच्या 17व्या वर्षी नारायण नावाच्या हिंदू तरुणाशी प्रेमविवाह केला. परंतु, हा निर्णय त्यांच्या जीवनात अनेक आव्हाने घेऊन आला. नवरा व्यसनाधीन आणि अत्याचारी असल्यामुळे, त्यांनी एका वर्षानंतर दोन मुलांसह त्याला सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वडिलांनी त्यांना परत स्वीकारले, परंतु पेट्रीसियांना स्वतःच्या पायावर उभे …
Read More »संयम बेपत्ता
आपल्या आईसमोरच नवर्याला बदडणार्या बायकोचा व्हिडिओ पाहिलात? ‘मी अजमल कसाबचा भाऊ बोलतोय,’ असं सांगून पोलीस मुख्यालय उडवून देणार्या मद्यपी सुरक्षा रक्षकाची बातमी वाचलीत? हैदराबादजवळच्या अमीनपूरमध्ये स्वतःच्या तीन मुलांचा गळा दाबून खून करणार्या आईबद्दल तुम्हाला कळलंय? पत्नी मुलांना भेटू देत नाही, फोनवर बोलूही देत नाही म्हणून पाळण्याच्या दोरीनेच फास लावून घेणारा यवतमाळचा संदीप आडे तुम्हाला ठाऊक आहे? कोणत्याही दिवशीचं वर्तमानपत्र उघडा. …
Read More »ब्रोकोली की फ्लॉवर,काय अधिक गुणकारी?
आपल्याकडे आता अनेक नव्या वाटणार्या भाज्याही रूळू लागल्या आहेत. कोथिंबिरीसारखी दिसणारी पार्ली असो किंवा फ्लॉवरसारखी दिसणारी ब्रोकोली, यूट्यूब – टीव्हीवरच्या रेसिपी शोमुळे त्यांची ओळख सर्वांनाच झाली. ब्रोकोली आणि फ्लॉवर या दोन भाज्या एक सारख्याच दिसत असल्याने खरेदी करताना कोणती भाजी जास्त आरोग्यदायी आहे हे कळत नाही. आता याबाबत आहारतज्ज्ञांनी काही माहिती शेअर केली आहे. ब्रोकोली आणि फ्लॉवरमध्ये काय फरक आहे? …
Read More »संघर्षातून उभारला बॅँ्रड
मॅडम सी. जे. वॉकर यांचे खरे नाव सारा ब्रेडलव्ह होते. त्या अमेरिकेतील पहिल्या सेल्फ मेड महिला कोट्यधीश ठरल्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी आपला व्यवसाय उभारला आणि केवळ आर्थिक यशच नव्हे, तर सामाजिक परिवर्तनातही मोठा वाटा उचलला. सारा यांचा जन्म 23 डिसेंबर 1867 रोजी लुईझियाना, अमेरिका येथे एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे आई-वडील गुलामगिरीतून मुक्त झालेले होते. लहान वयातच आई-वडिलांचे निधन …
Read More »ऑपरेशन ‘आत्मघात ’
सिनेमात अनेक अतार्किक प्रसंग पाहायला मिळतात. किंबहुना तर्कसंगत नसल्यामुळंच ते अधिक मनोरंजक बनतात. अशा तर्कशून्यतेविषयी व. पु. काळे एका कथेत म्हणतात, ‘हिरोने आरशात बघून स्वतःच्या ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन केलं, असं जरी दाखवलं असतं तरी मी विश्वास ठेवला असता.’ आधीच वास्तवापासून दूर असलेल्या प्रसंगावर केलेली ही अतिशयोक्ती. म्हणजे वास्तवापासून आणखी दूर! परंतु आरशात बघून नव्हे, तर चक्क यू-ट्यूबवर बघून माणसं स्वतःचं …
Read More »झोपताना एक डोळा उघडा का ठेवते मगर?
मगरीला ‘हँगमन ऑफ वॉटर’ म्हणतात. तिच्या परिसरात मोठमोठे प्राणी सापडल्यानंतर ती त्यांची अशा भयानक पद्धतीने शिकार करते की, तिला पाहून जीवाचा थरथराट होईल. सर्वप्रथम ती भक्ष्याला तिच्या जबड्यात पकडते. यानंतर ती अनेक वेळा आपले शरीर 360 अंश वळवते. यामुळे शिकार केलेल्या प्राण्याच्या हाडांचा चक्काचूर होतो. त्यानंतर ती आपली शिकार भक्षण करते. मगर काही वेळा सिंह व बिबट्यासारख्या प्राण्यांचीही शिकार करते. …
Read More »यशोगाथा वाडीलाल आइसक्रीमची
उन्हाळा सुरू झाला की आइसक्रीमचा आनंद लुटणार्यांची संख्या वाढते. आज बाजारात अनेक मोठे आइसक्रीम ब्रँड्स आहेत, त्यापैकी एक लोकप्रिय नाव म्हणजे वाडीलाल आइसक्रीम. पण हा ब्रँड एका मोठ्या कंपनीसारखा सहज स्थापित झालेला नाही, तर यामागे आहे संघर्ष, मेहनत आणि सातत्याने प्रयत्नांची कहाणी. वाडीलाल गांधी हे या आइसक्रीमचे जनक. त्यांचा प्रवास मात्र एका अत्यंत लहान व्यवसायापासून सुरू झाला. गुजरातमध्ये 1907 मध्ये …
Read More »‘फुंकर’जखमेवर
तुटलेल्या प्लॅस्टिकच्या बादल्या किंवा फाटलेले रबर-प्लॅस्टिकचे बूट दुरुस्त करणारे लोक अगदी परवा-परवापर्यंत दिसत होते. रस्त्याकडेला बसून हे लोक प्लास्टिकच्या वस्तूला पडलेल्या भेगांमध्ये गरम प्लॅस्टिक भरून देत असत. अगदीच वाया जाण्याऐवजी ती वस्तू आणखी काही दिवस उपयोगाला येत असे. लोखंडी हत्यारं शेगडीत गरम करून प्लॅस्टिकचे तुकडे तापवले जात असत आणि त्या रसायनाने वस्तूच्या ‘जखमा’ भरल्या जात असत. कल्पना करा, हेच टेक्निक …
Read More »फळमाशांचाही मेंदू असतो तल्लख!
मानवाचा मेंदू म्हणजे निसर्गाची सर्वात थक्क करणारी करामत आहे. मानवाने बुद्धीच्या जोरावरच जगात आपले सामाज्य बनवलेले आहे. मात्र मानवाशिवायही अनेक जीवांमध्ये त्यांचे जीवनयापन करण्यासाठी योग्य अशी बुद्धी असते. जी फळमाशी फळांना सडवते, तिच्याकडे नसती आफत म्हणून आपण पाहात असलो तरी ती फार चतुर असते व तिचा मेंदूही तल्लख असतो. कुठलीही कृती करण्यापूर्वी फळमाशी विचार करते, असे ऑक्सफर्डच्या संशोधकांनी म्हटले आहे. …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र