लेख-समिक्षण

रोज दाढी करावी का?

फॅशन आणि ट्रेंडचे शौकीन असलेले लोक अनेकदा वेगवेगळ्या प्रकारच्या दाढी ठेवतात आणि त्यांच्या आवडीनुसार त्याला शेप देतात. अनेकांना साबणाच्या वडीसारखा क्लीन-शेव्ह लूक आवडतो, तर काही लोक त्यांच्या शरीराच्या प्रकारानुसार आणि व्यवसायानुसार दाढी ठेवतात. काही लोकांना दररोज सकाळी दाढी करणे आवडते, तर काही लोक महिनाभरही दाढी करत नाहीत. दाढी करणे ही बर्‍याच लोकांसाठी सामान्य गोष्ट आहे; परंतु यामुळे प्रश्न निर्माण होतो. दररोज दाढी करणे आरोग्यदायी आहे की, ते हानिकारक असू शकते?
दाढी ठेवल्याने त्वचेला कोणतेही नुकसान होत नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे; मात्र दाढी लांब असल्यास ती रोज धुऊन स्वच्छ करावी, असा इशारा ते देतात, त्यामुळे तुमच्या त्वचेला कोणतीही हानी पोहोचणार नाही. आता प्रश्न असा आहे की, लोकांनी रोज दाढी करावी का? हेल्थलाईनच्या अहवालानुसार, तुम्हाला किती वेळा दाढी करावी लागेल याचा कोणताही निश्चित नियम नाही. तुम्हाला दाढी ठेवायची आहे की, स्वच्छ लूकला प्राधान्य द्यायचे आहे, हे तुमच्या आवडीवर अवलंबून आहे; परंतु तज्ञांच्या मते, बहुतेक लोकांना दररोज दाढी करण्याची आवश्यकता नसते. रेझर केवळ तुमची दाढीच कापत नाही, तर प्रत्येक वेळी तुम्ही तुमच्या त्वचेवर ब्लेड चालवता तेव्हा ते त्वचेच्या पेशींचा एक थरदेखील काढून टाकते. अशा परिस्थितीत, त्वचेला बरे होण्यासाठी वेळ द्यावा आणि दररोज दाढी करण्याऐवजी, लोकांनी एक किंवा दोन दिवसांनी दाढी करावी, त्यामुळे तुमच्या त्वचेला कोणतीही इजा होणार नाही.

Check Also

सात अपयशांनंतर स्वप्नाल गवसणी

वर्षाला 46 लाख रुपयांचे पॅकेज, जगातील नामांकित कंपनीत नोकरी आणि पुढे उज्ज्वल करिअरची हमी… इतके …