भारतामध्ये लाखो लोक दुर्लभ आजारांनी त्रस्त आहेत. हे आजार बहुतांश वेळा अनुवंशिक म्हणजे आपल्या जनुकांमधील बदलांमुळे होतात. डॉटर आणि वैज्ञानिक सांगतात की जर एखाद्या व्यक्तीच्या जनुकामध्ये बदल झाला (त्याला म्युटेशन म्हणतात) तर त्याचा परिणाम पुढील पिढ्यांवरही होऊ शकतो.
आपल्या देशात बहुतेक ठिकाणी लोक आपल्याच जात, धर्म किंवा समुदायामध्ये विवाह करतात. यामुळे नवीन रक्तसंबंध येत नाहीत आणि त्या समुदायामध्ये काही ठराविक आनुवंशिक दोष वारंवार टिकून राहतात. म्हणूनच काही छोट्या समाजगटांमध्ये दुर्लभ रोग जास्त प्रमाणात दिसतात. यासाठी भारत सरकारने २०२३ मध्ये एक राष्ट्रीय मिशन सुरू केले आहे. या मिशनचा उद्देश म्हणजे ५,००० रुग्णांचे जीन तपासणे, त्यांचे ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ करणे आणि भारतीय समाजामध्ये कोणते नवे जीन किंवा व्हेरीयंट रोगांना कारणीभूत आहेत हे शोधणे. आतापर्यंत २,००० रुग्णांची नोंदणी झाली असून १,००० लोकांचे जीनोम सिक्वेन्सिंग झाले आहेत.
हैदराबादमधील सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नॉस्टिसहे या मोहिमेचे मुख्य केंद्र आहे. इथले प्रमुख वैज्ञानिक डॉ. अश्विन दलाल सांगतात की कधी कधी दोन भिन्न शहरातील रुग्णांमध्ये एकसारखा म्युटेशन सापडतो. अशा वेळी असे समजते की त्यांच्या पूर्वजांमध्ये काही शेकडो वर्षांपूर्वी एकाच वंशाचा संबंध असावा. याचबरोबर हैदराबादमधील दुसरे संशोधन केंद्र म्हणजे सीसीएमबी (सेंटर फॉर सेलुलर अँड मॉलियूलर बायोलॉजी)इथेही अभ्यास चालू आहे. डॉ. कुमारस्वामी थंगराज सांगतात की काही समुदाय हजारो वर्षांपासून एकमेकांतच विवाह करत असल्यामुळे त्यांच्यातील जुने म्युटेशन आजही टिकून आहेत. यामुळे असे दिसते की आपल्या विवाह परंपरांमुळेच काही आजार पिढ्यानपिढ्या वाढले आहेत. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की जर दोन्ही पालकांकडे एकच म्युटेशन असेल, तर त्यांच्या मुलांमध्ये २५ टक्के शयता असते की तो आजार दिसेल. म्हणूनच खूप लोकांना माहीत आहे की जवळच्या नात्यातील लग्न केल्यास मुलांना आजार होऊ शकतो. पण हेच धोके जात, गोत्र किंवा लहान समुदायामध्येही असतात.
जिनोम सिक्वेन्सिंगमुळे डॉटरांना रुग्णाचा आजार पटकन ओळखता येतो आणि त्यावर योग्य उपचार करता येतात. उदाहरणार्थ, आंध्र प्रदेशातील व्यास समाजामध्ये एक असा जीन बदल सापडला होता की ज्यामुळे काही औषधे त्यांना चालत नव्हती. आता डॉटर या समुदायातील लोकांवर शस्त्रक्रिया करताना ती औषधे देत नाहीत.
थोडयात, आपली ओळख, परंपरा आणि विवाह पद्धती या गोष्टी आपल्या जेनेटिक आरोग्यावर थेट परिणाम करतात. त्यामुळे संशोधक सांगतात की शय तितया विविध समाजांमध्ये विवाह झाले तर जेनेटिक विविधता वाढेल आणि दुर्लभ रोगांचा धोका कमी होईल.– जगदीश काळे
Check Also
दिलासादायक माघार
केंद्र सरकारने बहुचर्चित ‘ऊस (नियंत्रण) आदेश 2026’ चा मसुदा तूर्त मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. …
पांचजन्य वृत्तपत्र