लेख-समिक्षण

जग काय म्हणेल?

जगातला प्रत्येक माणूस हा युनिक आहे. एकाहून दुसरा संपूर्णपणे वेगळा आहे. अगदी जुळी भावंडही वेगवेगळी असतात. तरीही प्रत्येकालाच आपण दुसर्‍या कुणासारखे असावे असं वाटत असतं. ‘त्या माणसाकडे अमुक किती चांगलं आहे?’ ‘तमका किती बुद्धीमान आहे!‘ ‘तो किती यशस्वी आहे!’ अशा पद्धतीचे असंख्य तुलनात्मक विचार प्रत्येक माणूस करतोच. आपणही वेगळे आहोत. आपणही कुणाचा तरी आदर्श असू शकतो. कुणाला तरी आपल्यासारख बनायचं …

Read More »

स्नायू बळकटीसाठी खा हेझलनट्स

निरोगी राहण्यासाठी तज्ज्ञ सुकामेवा खाण्याचा सल्ला देतात. अनेक जण आहारात ड्रायफ्रूटस्चा समावेश करतात. पण, खूप कमी लोकांना माहिती आहे की एक ड्रायफ्रूट जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ते म्हणजे हेझलनट किंवा पहाडी बदाम. त्याला कुल्ठी किंवा चिलगोजा म्हणून देखील ओळखले जाते. याला काजू आणि बदामांपेक्षाही जास्त शक्तिशाली मानले जाते. विशेषतः जेव्हा शरीराला शक्ती आणि पोषण देण्याची गरज असते, त्यावेळी त्याचे …

Read More »

प्रेरणादायी संघर्षगाथा

कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी असली तर कोणतेही यश तुम्हाला रोखू शकत नाही. मेहनत करण्याची तयारी असली की यश दूर नसते, हे अनेकांनी सिद्ध केले आहे. या नावांमध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे. पुणे जिल्ह्यातील मुलीने विपरीत परिस्थितीत यश मिळवले आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील शेवालवाडी हे गाव. या गावात अर्जुन चिखले आपल्या परिवारासह राहतात. त्यांच्यांकडे फक्त 30 …

Read More »

खातेवाटपाचे उणे-अधिक

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हिवाळी अधिवेशन संपताच खातेवाटप जाहीर करण्यात आले. यात अनेक दिग्गजांना धक्का बसला तर काही नवख्या मंत्र्यांना वजनदार खाती देण्यात आली. भाजपचाच विचार केला तर राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसला आहे. एकप्रकारे या नेत्यांचे राजकीय वजन कमी करण्याचाच प्रयत्न केला आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनातील एका भाषणात अजित पवार गिरीश महाजनांना …

Read More »

खेळू नका!

खेळू नका,’ असा हुकूम प्रत्येक पालकाने आपल्या अपत्याला कधी ना कधी सोडलेला असतोच. बर्‍याचदा यामागे अभ्यासाचं कारण असतं. कधीतरी घराबाहेर असलेल्या छोट्या-मोठ्या धोक्यांचं निमित्त असतं. कधी पाऊस तर कधी कडाक्याचं ऊन पडलेलं असतं. मुलांचं आरोग्य बिघडेल, अशी काळजी आईवडिलांना वाटत असते. नैसर्गिक धोक्यांबरोबरच मानवनिर्मित धोकेही असतात. या व्यतिरिक्तही कारणं असू शकतात. परंतु पोरांना ‘खेळू नका’ म्हणण्याचं एक अजब कारण पुढे …

Read More »

राहुल गांधीनी पोलिसी हत्येकेडे वेधले लक्ष

परभणी हिंसाचारात अटक झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सोमवारी परभणीत जाऊन सूर्यवंशी आणि वाकोडे कुटुंबियांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर सूर्यवंशीचा मृत्यू म्हणजे हत्या असल्याचे राहुल गांधी म्हणाले. सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्याने त्याची हत्या करण्यात आली, असाही आरोप त्यांनी केला. परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. त्या पुतळ्यासमोर …

Read More »

एका पर्वाची अखेर

भारताचे माजी पंतप्रधान आणि निष्णात अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने एका पर्वाची अखेर झाली आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेचे संचालक प्रदीप के. लाहिरी यांच्या ‘अ टाइड इन द अफेअर्स ऑफ मेन: अ पब्लिक सर्व्हंट रिमेम्बर्स’ या आत्मचरित्रामध्ये मनमोहन यांच्याशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख आहे. त्यांच्या मते, मनमोहन सिंग यांचे भारतीय इतिहासातील योगदान पंतप्रधान म्हणून न राहता भारताचे अर्थमंत्री म्हणून अधिक …

Read More »

नदीजोड प्रकल्पातून विकासगंगा

महाराष्ट्रात नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर नद्या जोड प्रकल्पाचा संकल्प बोलून दाखवला आहे. नदी जोड प्रकल्प हा मराठवाड्यासाठी भाग्यविधाता प्रकल्प असणार आहे. मध्य प्रदेश, राजस्थान यादरम्यान वाहणार्‍या पार्वती, कालीसिंध आणि चंबळ नद्यांचे पाणी हे मोठा जलस्रोत म्हणून पाहिले जाते. या नद्यांना जोडण्यासाठी अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी नदी जोडप्रकल्पाच्या अभियानाची संकल्पना …

Read More »

मलायका पुन्हा प्रेमात?

अभिनेत्री मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मलायका एका मिस्ट्री मॅनसोबत दिसली आहे. तिचे काही फोटो व्हायरल झाले असून ती पुन्हा एकदा प्रेमात पडल्याची चर्चा रंगली आहे. अलीकडेच मलायकाने पंजाबी गायक एपी ढिल्लोनंच्या कॉन्सर्टमध्ये हजेरी लावली होती. तिच्यासोबत राहुल विजयनेही या कॉन्सर्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी ती स्टेजवर थिरकताना दिसली. स्वत: एपी ढिल्लोननं या त्याच्या कॉन्सर्टमधील …

Read More »

बालपटांची उपेक्षा

बॉलिवूडच्या आजवरच्या प्रवासामध्ये बालचित्रपटांना फारसे महत्त्व दिले गेले नाही. चित्रपटातील नायकांचे बालपण प्रभावीपणे रेखाटले जाते, मात्र एकप्रकारे नायकाची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी लहान मुलांच्या पात्रांचा उपयोग केला जातो. कृष्णधवलपासून ते आतापर्यंतच्या काळात असंख्य बालचित्रपट येऊन गेले. किंबहुना मोठ्या कलाकारांचा समावेश असलेल्या बाल चित्रपटांनी काहीवेळा यशही मिळवले, परंतु ते मर्यादित राहिले. काहींची गाणी गाजली तर काहींवेळा व्यक्तिरेखा. पण त्याची व्याप्ती वाढली नाही. …

Read More »