लेख-समिक्षण

‘अडीच दशकांनी ‘रघु’ परतणार

1999 साली आलेला अभिनेता संजय दत्तचा ’वास्तव’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. महेश मांजरेकर यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांकडून आवर्जून पाहिला जातो. हा बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय गँगस्टर चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटातील पात्रं आणि डायलॉग्स आजही मीम्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर पाहायला मिळतात. आता 26 वर्षांनी ’वास्तव’ चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.
संजय दत्त पुन्हा एकदा ’रघु’ हे लोकप्रिय पात्र मोठ्या पडद्यावर साकारण्यास तयार आहे. रिपोर्टनुसार, वास्तव’ चित्रपटाच्या सिक्वलसाठी पुन्हा एकदा महेश मांजरेकर आणि संजय दत्त एकत्र काम करताना पाहायला मिळतील. सध्या महेश मांजरेकर या चित्रपटाच्या कथेवर काम करत आहे. त्यांनी संजय दत्तला देखील याबाबत माहिती दिली असून, तो देखील या चित्रपटात काम करण्यास उत्सुक आहे.
कथेचे काम पूर्ण झाल्यानंतर याच वर्षीच्या अखेरीस चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच, या चित्रपटात दोन अभिनेते मुख्य भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. कथेचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसर्‍या प्रमुख अभिनेत्याची निवड करण्याचे काम सुरू होईल.
संजय दत्तचे करिअर बदलण्यामध्ये ’वास्तव’ चित्रपटाची महत्त्वाची भूमिका होती असे मानले जाते. या चित्रपटातील त्याचे रघु हे पात्र, तसेच संजय नार्वेकर यांनी साकारलेले ’देढ़ फुटिया’ हे पात्र आजही लोकप्रिय आहेत. 7.5 कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या चित्रपटाने त्यावेळी 20.50 कोटी रुपयांची कमाई केली होती.
संजयसोबतच या चित्रपटात नम्रता शिरोडकर, परेश रावल, दिपक तिजोरी, शिवाजी साटम यांची देखील प्रमुख भूमिका होती. आता 26 वर्षांनी संजय दत्त ’रघु’ हे पात्र साकारणार असल्याने चाहते देखील त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.- मानसी जोशी

Check Also

रामायण, राम, रणबीर आणि वाद

सध्या बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‌‘रामायर्ण या चित्रपटाच्यानिमित्तान रणीबर कपूरने साकारलेल्या रामाच्या व्येितेखेवरुन वाद सुरू आहेत. वास्तविक …