स्वच्छ आणि चकाकणारे स्वयंपाक घर हे केवळ घराचे सौंदर्यच खुलवते असे नाही; तर ते त्या घरातील माणसांच्या, खास करुन महिलेच्या शिस्तीचे, टापटीपपणाचे निदर्शक असते. काळवंडलेल्या गाळण्यावरुन तुमच्या एकंदर शिस्तीचे मूल्यमापन केले जाते. हे टाळण्यासाठी काही सोप्या आणि घरच्या घरी करता येणाऱ्या टिप्स वापरून तुम्ही तुमचे गाळणे चकाचक ठेवू शकता. गरम पाणी आणि डिशवॉश ः गाळणे थोडावेळ गरम पाण्यात भिजत ठेवा. …
Read More »नीलहरित शैवालापासून वीजनिर्मिती
विजनिर्मितीसाठी अनेक मार्ग शोधले जात असतात. आता नीलहरित शैवालापासून विद्युत ऊर्जा निर्माण करणारे तंत्रज्ञान शोधण्यात आले असून त्यामुळे आगामी काळात सेलफोन व संगणकांनाही विद्युत पुरवठा करता येईल. हे संशोधन करणाऱ्यात एका भारतीय वैज्ञानिकाचाही समावेश आहे. काँकॉड्रिया अभियांत्रिकी विद्यापीठातील प्रा. मुथुकुमारन पाकिरीसामी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संशोधनानुसार नीलहरित शैवाल ज्या पद्धतीने प्रकाशसंश्लेषण करतात त्यातून विद्युत ऊर्जा तयार करता येते. प्रकाश संश्लेषण व …
Read More »श्वेताची यशोपताका
क्रीडाक्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील तरुणींनी दैदीप्यमान भरारी घेतली आहे. महिला टीम इंडियाने विश्वचषक जिंकत भारतीय तरुणींमधील कर्तृत्वाचा डंका जगभरात वाजवला आहे. आता दुबई येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय, आष्टी येथील विद्यार्थिनी कुमारी श्वेता भास्कर कोवे हिने अतुलनीय कामगिरी करत या स्पर्धेतील वैयक्तिक स्पर्धेत गोल्ड मेडल तसेच सांघिक गटात ब्रॉन्झ मेडल पटकावून भारताचे …
Read More »लाल भूमीत खुललं कमळ
केरळमधील नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणणारे ठरले आहेत. 2026 मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निकालांकडे ‘सेमीफायनल’ म्हणून पाहिले जाते आणि यावेळी सत्ताधारी डाव्या लोकशाही आघाडीला राज्यभरात मोठा फटका बसलेला स्पष्टपणे दिसून आला आहे. याउलट काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने शहरी तसेच ग्रामीण भागात जोरदार पुनरागमन करत आपली राजकीय ताकद पुन्हा …
Read More »गैरफायद्याची खिडकी खुली
गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने फरार संदेसरा बंधुंच्या विरोधातील खटला मागे घेण्यास सहमती दर्शविली. ंहा खटला मागे घेण्यासाठी संदेसरा बंधुंना भारतींय रुपयांत 5100 कोटी भरावे लागतील. मात्र संदेसरा बंधुबाबत आदेश देताना अन्य प्रकरणात हीच मात्रा लागू करू नये किंवा गृहित धरू नये, असेही सर्वोच्च न्यायालयाने बजावले आहे. सर्वोच्च न्यायालयाने फरार संदेसरा बंधुंना भरपाईवर भरल्यास तडजोडीची परवानगी दिली आणि कारवाई स्थगित केली. …
Read More »भ्रष्ट मंत्री कोकाटेंचा राजीनामा
राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे त्यांचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री खाते काढून घेण्याची शिफारस केली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शिफारस मान्य करून कोकाटे यांचे खाते काढले. त्याचवेळी कोकाटेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांच्यावर सदनिका लाटल्याच्या आरोपात त्यांची दोन वर्षांची शिक्षा कायम …
Read More »पायाभरणी करणारी निवड
स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणाचा इतिहास पाहिला तर ज्या पक्षांमध्ये लोकशाही पद्धती आहे म्हणजेच एकचालकानुवर्तीत्व नाहीये अशा पक्षांमध्ये पक्षातील प्रमुख स्थानावर अनुभवी, बुजुर्ग नेत्यांची निवड करण्याचा प्रघात आहे. याचे कारण पक्षसंघटना चालवताना अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडताना जुन्या-नव्या कार्यकर्त्यांशी जुळवून घेत पक्षविस्तार करावा लागतो. असे असताना 45 वर्षे वय असणाऱ्या बिहारच्या नितीन नबीन यांना भाजपाने राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बनवण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच …
Read More »द्वेषमूलकतेला लगाम, पण…
भारतामध्ये द्वेषमूलक विधाने किंवा विघातक वक्तव्ये याबाबत दीर्घकाळ चर्चा सुरू आहे. भारतीय दंड संहिता असो किंवा तिच्या जागी आलेली भारतीय न्याय संहिता, या दोन्हींमध्ये सामुदायिक किंवा धार्मिक तेढ वाढवणाऱ्या कृत्यांविरोधात विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही सर्व राज्य सरकारांना द्वेषमूलक विधानांची दखल घेऊन कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. मात्र यानंतरही काही राज्य सरकारांना असे वाटले की, त्यांच्या राज्यात …
Read More »‘तारक मेहता…’ बंद होणार?
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा गेली 18 वर्षेसुरू असलेला विनोदी सिटकॉम भारतीय घराघरांत लोकप्रिय झाला आहे. गोकुळधाम सोसायटीतील व्यक्तिरेखांभोवती फिरणारा हा कार्यक्रम लाखो प्रेक्षकांना भावला आहे आणि त्यातील कलाकारांबद्दल प्रेक्षकांमध्ये वेगळीच आपुलकी निर्माण झाली आहे. 2008 मध्ये सुरुवात झालेली ही मालिका भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वाधिक पसंती मिळवलेल्या सिटकॉमपैकी एक मानली जाते. अनेक प्रेक्षकांनी या मालिकेमध्येच बालकलाकारांना वाढताना पाहिले आहे. गेल्या …
Read More »कलाकारांचे बहुविवाह
भारतीय समाजात आजही दुसऱ्या विवाहाला मान्यता मिळताना दिसत नाही. विशेषतः पहिली पत्नी हयात असताना किंवा तिच्यासोबत घटस्फोट झालेला नसताना दुसरा विवाह करणे ही सरळसरळ प्रतारणाच असते. परंतु सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांचे आयुष्य पाहिल्यास त्यांनी ही प्रतारणा लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही केल्याचे दिसते. दिलीप कुमार, धर्मेंद्र, राज बब्बर, राजेश खन्ना, विनोद खन्ना, आमीर खान, सैफ अली खान यांसारख्या नायकांच्या दुसऱ्या-तिसऱ्या विवाहांच्या चर्चांमुळे …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र