लेख-समिक्षण

Tag Archives: चालू घडामोडी

‘गुप्तहेर’ माशाचा मृत्यू

हेरगिरीसाठी पशुपक्ष्यांचाही वापर करणे ही काही नवलाईची बाब नाही. त्यामुळे एका पांढर्‍या बेलुगा व्हेल माशालाही असेच रशियाचा ‘गुप्तहेर’ मानले जात होते. या व्हाईट बेलुगा व्हेल ‘ह्वाल्दिमिर’चा मृत्यू झाला आहे. 31 ऑगस्ट रोजी नॉर्वेच्या रिसाविका खाडीत मासेमारीसाठी गेलेल्या पिता-पुत्रांना व्हेलचा मृतदेह तरंगताना दिसला. या 14 फूट लांब व्हेलचे वय सुमारे 15 वर्षेतर वजन 1,225 किलो होते. त्याचा मृतदेह क्रेनच्या सहाय्याने बाहेर …

Read More »

दिव्यांगपणावर जिद्दीने मात

मूळचे पुण्यातील असलेले डॉ. बोत्रे सध्या राजस्थानातील पिलानी येथील ‘कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च’च्या अखत्यारितील सिरी या संस्थेत मुख्य शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. भाऊसाहेब यांचे बालपण पुण्यातील रामवाडी वसाहतीत गेले. अवघे एक वर्षाचे असताना त्यांना ताप आल्याचे निमित्त झाले आणि दोन्ही पायांना पोलिओने ग्रासले. त्यानंतरही त्यांच्या आईने त्यांना शाळेत घातले. त्यांना दहावीत 82 टक्के गुण मिळाले होते. प्राथमिक शाळेत …

Read More »

माणसातला ‘वाघ’

निवडणुका जवळ आलेल्या असल्यामुळं ठिकठिकाणच्या प्रचारफलकांवर ‘मानवी वाघ’ बघायला मिळताहेत. बर्‍याच ठिकाणी नेत्याच्या फोटोला वाघाच्या किंवा सिंहाच्या चित्राची पार्श्वभूमी ग्राफिक्सच्या माध्यमातून केली जाते. नेत्यांची तुलना वाघाशी किंवा सिंहाशी करण्याची मोठी परंपरा आपल्याकडे आहे. वाघ हा सर्वोच्च शिकारी म्हणजे ‘अपेक्स अ‍ॅनिमल’ म्हणून ओळखला जातो. म्हणजे जैवसाखळीचं सर्वोच्च टोक. आणि सिंह तर जंगलचा राजाच. या दोघांना संपूर्ण जंगल घाबरतं. जंगलचे राजे सुस्तावून …

Read More »

दोन बेटांचा वेळफरक

अलास्का आणि सायबेरिया हे अमेरिका आणि रशियाचे असे दोन भाग अतिशय थंड प्रदेेश म्हणून ओळखले जातात. या दोन्हींमध्ये बियरिंग स्ट्रेट अर्थात पाण्याचा रस्ता आहे. याच रस्त्यावर दोन अनोखे बेट आहेत. यातील पहिला बेट बिग डायोमिड. हे दोन्ही बेट एकमेकांपासून केवळ 3 किलोमीटर अंतरावर आहेत. पण, तरीही या दोन्ही बेटात एक इतका मोठा फकर आहे की, एकमेकांपासून इतके जवळ असताना देखील …

Read More »

गांधीविचारांचा जीवनप्रकाश

दिवाळी हा अंधःकार दूर करुन प्रकाश देणारा लोकोत्सव आहे. यानिमित्ताने मनातील नकारात्मक अंधार नाहीसा करण्याचा प्रयत्न केल्यास आणि सद्गुणांची पेरणी केल्यास आयुष्य मंगलदायी होईल. यादृष्टीने संपूर्ण जगासाठी शिरसावंद्य असणार्‍या गांधीजींचे विचारधन आत्मसात करणे गरजेचे आहे. काय आहेत हे विचार? * तुमचे विचार सकारात्मक ठेवा. कारण तुमचे विचार तुमचे शब्द बनतात. तुमचे शब्द सकारात्मक ठेवा. कारण तुमचे शब्द तुमचे वर्तन बनतात. …

Read More »

बहुगुणी लस

देवी, गोवर, ट्रिपल, पोलिओ अशा अनेक लसी आपल्याला पालकांनी लहानपणीच दिल्या. स्वतः जाऊन लस घेऊन येण्याचा अनुभवच आपल्याला नव्हता. ती वेळ कोविडने आपल्यावर आणली आणि बरेचजण घाबरले. ही लस खरंच ‘फुलप्रूफ’ आहे का? याचे काही दुष्परिणाम तर होणार नाहीत ना, अशा चिंतेनं अनेकांना ग्रासलं होतं. सोशल मीडियानं नेहमीप्रमाणे आगीत तेल ओतून लसीच्या संभाव्य दुष्परिणामांची यादी थेट मृत्यूला नेऊन भिडवली होती. …

Read More »

जपानमधील प्रकाशाचे गूढ

नुकतेच जपानमध्ये किनारपट्टीला लागून असणार्‍या एका शहरातून आभाळाकडे पाहिले असता रहस्यमयरीत्या चमकणारे 9 खांब दिसले. आभाळात दिसणारे हे दृश्य पाहून स्थानिक लोक हैराण झाले. नेमकं घडतंय काय, हेच त्यांना कळत नव्हतं. सध्या सोशल मीडियावर जपानमधील हेच फोटो व्हायरल होत असून, माशी नावाच्या एका स्थानिक व्यक्तीनं घडल्या प्रकारासंदर्भात माहिती दिली. अर्थात, नंतर या प्रकाशाचे गूढही उकलले ! घरातून बाहेर पडताच त्याने …

Read More »

डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या बालपणीची एक हृदयस्पर्शी आठवण

मी लहान होतो तेव्हाची गोष्ट. प्रत्येक आईप्रमाणेच माझी आई आम्हा सर्वांसाठी जेवण तयार करायची. दिवसभर कष्टाची कामे करून आई खुप दमून जायची. एके रात्री आईने स्वयंपाक केला आणि माझ्या बाबांना जेवायला वाढले. त्यांच्या ताटात एक भाजी आणि एका बाजूने पुर्णपणे करपलेली भाकरी दिली. त्या जळालेल्या, करपलेल्या भाकरीबद्दल कोणी काही बोलतेय का याची मी वाट पहात होतो. परंतू बाबांनी आपले जेवन …

Read More »

दाढीपुराण

दाढी ही निसर्गाने पुरुषाला दिलेली अशी भेट आहे, जी काहीजणांना हवीशी वाटते तर काहींना नकोशी. गंमत म्हणजे, दाढी आणि मिशी फक्त पुरुषांना लाभलेली असली, तरी मराठीत हे दोन्ही शब्द स्त्रीलिंगी आहेत. दाढीचा संबंध कधी धर्माशी जोडला जातो, कधी परंपरेशी तर कधी चेहर्‍याच्या उठावदारपणाशी. प्राचीन ऋषीमुनींच्या दाढीपासून आजच्या कॉर्पोरेट दाढीपर्यंत एक मोठी परंपरा पाहायला मिळते. अलीकडे दाढी वाढवण्याचा आणि तिला वेगवेगळे …

Read More »

कोवळ्या उन्हाचे आरोग्यलाभ

उन्हात जास्त वेळ थांबल्याने त्वचा काळवंडते. सूर्याची प्रखर किरणे त्वचेवर पडल्यामुळे सनबर्न होण्याची शक्यता असते. यापासून वाचण्यासाठी सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचे नकसान होऊ शकते. मात्र, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर तंदुरुस्त आरोग्यासाठी सूर्याची किरणे खूप आवश्यक आहेत, मानवाच्या शरीरासाठी सर्व प्रकारच्या व्हिटॅमिन्स गरजेचे असतात, यातीलच एक म्हणजे व्हिटॅमिन डी, आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन डी खूप गरजेचे आहे. कारण आपले शरीर व्हिटॅमिन …

Read More »