मानवाचा मेंदू म्हणजे निसर्गाची सर्वात थक्क करणारी करामत आहे. मानवाने बुद्धीच्या जोरावरच जगात आपले सामाज्य बनवलेले आहे. मात्र मानवाशिवायही अनेक जीवांमध्ये त्यांचे जीवनयापन करण्यासाठी योग्य अशी बुद्धी असते. जी फळमाशी फळांना सडवते, तिच्याकडे नसती आफत म्हणून आपण पाहात असलो तरी ती फार चतुर असते व तिचा मेंदूही तल्लख असतो. कुठलीही कृती करण्यापूर्वी फळमाशी विचार करते, असे ऑक्सफर्डच्या संशोधकांनी म्हटले आहे. …
Read More »कल्पनातीत संघर्षातून भरारी
कल्पना सरोज ह्या एक प्रेरणादायी भारतीय उद्योजिका आहेत, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितींवर मात करून यशस्वी उद्योजकतेचा आदर्श घालून दिला आहे. त्यांचा जन्म 1961 साली महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील रोपरखेडा गावात एका मराठी दलित कुटुंबात झाला. त्यांचे वडील पोलिस कॉन्स्टेबल होते. 12 व्या वर्षीच त्यांचे लग्न झाले आणि त्या मुंबईतील झोपडपट्टीत पतीच्या कुटुंबासोबत राहत होत्या. तिथे त्यांना शारीरिक आणि मानसिक छळाचा सामना करावा …
Read More »मेलेली मने
ब्रिटिश राजवटीत क्रांतिकारकांमुळे सोलापूरने स्वातंत्र्य प्राप्त केल्याचा इतिहास आजही जिवंत आहे. क्रांतिकारक आणि हुतात्म्यांच्या या शहरात एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता. वस्त्रोद्योगामुळे सोलापूर हे मँचेस्टर म्हणून ओळखले जात होते. कोणत्याही ज्वलंत विषयावर पेटून उठण्याची येथील मानसिकता त्यावेळच्या लोकांमध्ये होती. मात्र, स्वातंत्र्यानंतर सोलापूरचे वैभव आणखी वाढण्याऐवजी आता उतरतीला लागले आहे. अलीकडच्या काही वर्षांत सोलापूर आणि परिसरात रस्त्यांचे जाळे तयार झाले. काही …
Read More »चर्चेत ‘हंता’
एकाच दिवसात किंवा अवघ्या काही दिवसांच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू होण्याच्या काही दुर्मिळ, मोजक्या घटना आपल्या पाहण्यात असतात. काहीजण या घटना दुर्दैवी मानतात तर काहीजण अशा घटनांमध्ये पती-पत्नीमधील घट्ट बंध शोधतात. अपघातात पती-पत्नीचा मृत्यू होण्याच्या घटना अनेक असतात; परंतु आजारपणामुळं किंवा कधी-कधी तर कोणताही आजार नसताना अशा घटना घडतात. पतीवर अंत्यसंस्कार करून लोक परत येईपर्यंत पत्नीचा मृत्यू झाल्याचीही उदाहरणं पाहायला मिळतात. …
Read More »मशिदीचे भोंगे फडणवीसांच्या निशाण्यावर
राज्यात यापुढे मशिदींवरील भोंग्यांचा आवाज एका मर्यादेपालिकडे वाढल्यास त्यावर कारवाई होणार आहे. ही कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची असेल. तसेच कर्तव्यात कसुर करणार्या पोलिस निरीक्षकावर कारवाई होईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. पोलिसांना थेट कारवाई करण्याचे फारसे अधिकार नसल्याने संबंधित कायद्यात सुधारणा करण्याबाबत केंद्राशी संपर्क साधण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. राज्यात अनेक …
Read More »अर्थसंकल्पातून काय मिळाले?
महायुती सरकारचा पहिलावहिला अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी लोकानुनयाला थारा न देता राज्याच्या वित्तीय शिस्तीच्या चौकटीचे पालन करत विकासाला चालना देण्यासाठीचे महत्तम प्रयत्न केल्याचे दिसते. कोणत्याही अर्थसंकल्पानंतर अजून खूप काही करावयास हवे होते, हा सूर नेहमीच ऐकावयास मिळतो. परंतु समोर असणारी आव्हाने आणि उपलब्ध संसाधने यांचा ताळमेळ उत्कृष्टपणाने घालणे याला कुशल वित्तीय व्यवस्थापन म्हणतात. त्यादृष्टीने एकीकडे लाडक्या बहिणींना …
Read More »दीदींचे फासे, भाजपचे उसासे!
हल्दियाचे आमदार तापसी मंडल यांचा पक्षात समावेश करून तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का दिला आहे. 2026 च्या विधानसभा निवडणुकीला अद्याप बराच काळ असला तरी पश्चिम बंगालमध्ये आतापासूनच चढाओढ सुरू झाल्याचे यावरुन दिसत आहे. ममता बॅनर्जी यांनी टीएमसी सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांशी संपर्क साधण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. 2021 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचे 12 आमदार टीएमसीमध्ये सामील झाले …
Read More »चर्चा गोविंदाच्या घटस्फोटाची
अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहूजा वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आले आहेत. दोघेही लग्नाच्या 37 वर्षांनंतर घटस्फोट घेत आहेत. रेडिटवरील एका पोस्टनुसार, गोविंदा घटस्फोट घेणार असल्याचे समोर आले आहे. याच दरम्यान, झूम टीव्हीने गोविंदाबद्दल एक धक्कादायक अपडेट दिली आहे. गोविंदाची 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीशी असलेली कथित जवळीक हे या दोघांच्या घटस्फोटाचे कारण असल्याचं म्हटलं आहे. यामुळे होणार्या सततच्या मतभेदांमुळे हा …
Read More »एकतर्फी प्रेमाची रुपेरी गोष्ट
सुरुवातीच्या काळापासूनच पटकथेत प्रेमकथेवर भर दिला गेला. पटकथा कोणतिही असो, यात प्रेमाचा विषय राहिला आहे. एवढेच नाही तर युद्धकथा असो किंवा दरोडेखोरांचा थरार असो यासारख्या चित्रपटातही प्रेम फुलताना दाखविले आहे. दिग्दर्शकाने तो तात्पुरताच नाही तर शेवटपर्यंत टिकवला आहे. पटकथेचा मुळ गाभा असलेल्या प्रेमकथेत प्रेम अणि प्रेमिकेची मध्यवर्ती भूमिका असते तेव्हा अशा कथानकात फारसे अडथळे नसतात. मात्र एकतर्फी प्रेम असेल तर …
Read More »व्हिडिओ ब्लॉगर बनायचंय?
व्हिडिओ ब्लॉगिंग, किंवा व्लॉगिंग, हे आजच्या डिजिटल युगातील एक प्रभावी माध्यम बनले आहे. भारतातील तरुणाईमध्ये व्लॉगिंगची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे, ज्यामुळे करिअरच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत. पण यशस्वी व्लॉगर होण्यासाठी काही कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. भारतातील व्लॉगिंगचा उदय: इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे, भारतात व्लॉगिंगचे क्षेत्र फोफावले आहे. तरुण पिढी आपल्या आवडीनुसार विविध विषयांवर व्लॉग तयार करून त्यांना …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र