लेख-समिक्षण

चंद्रावरील खडकांत पुरावे

प्राचीन काळात पृथ्वीचे वातावरण कसे होते, याचे सर्वात जुने पुरावे हे पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह असलेल्या चंद्रावरील खडकांमध्ये दडलेले आहेत. एका नव्या संशोधनातून ही माहिती समोर आली. नासाच्या अपोलो मोहिमेत चांद्रभूमीवरून आणलेल्या खडकांच्या अभ्यासातून ही बाब स्पष्ट झाली. 50 वर्षांपूर्वी हे खडकांचे नमुने अपोलो मोहिमेतील अंतराळवीरांनी पृथ्वीवर आणले होते. या खडकांमध्ये चुंबकीय गुणधर्मही अडकलेले आहेत. एके काळी पृथ्वीप्रमाणेच चंद्रालाही स्वतःचे चुंबकीय क्षेत्र होते, हे यावरून स्पष्ट होते. रॉचेस्टर युनिव्हर्सिटीतील जॉन टार्जुनो यांनी सांगितले, की एखाद्या ग्रहाच्या किंवा चंद्राच्या कोअरमधून असे चुंबकीय क्षेत्र निर्माण होत असते. चंद्राचा कोअर अतिशय छोटा आहे हे याठिकाणी उल्लेखनीय आहे. चंद्राकडे स्वतःचे चुंबकीय क्षेत्र गेल्या किमान 4. 36 अब्ज वर्षांपासून नाही, असेही या नव्या संशोधनातून स्पष्ट झालेले आहे. याबाबतच्या संशोधनाची माहिती “कम्युनिकेशन्स अर्थ अँड एन्व्हायन्मेंट या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे, की चंद्राची निर्मिती झाल्यापासून सुरुवातीची केवळ 140 दशलक्ष वर्षेच चंद्राला चुंबकीय क्षेत्राचे संरक्षण मिळाले. त्यामुळे चंद्रामध्ये अजूनही पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळातील वातावरणाचे पुरावे सुरक्षित असू शकतात, जे कधीच पृथ्वीवरून पुसले गेले आहेत. 4.36 अब्ज वर्षांपूर्वी चंद्राने पृथ्वीच्या वातावरणाचे आयन्स टिपलेले असू शकतात. सुरुवातीच्या काळात पृथ्वीच्या वातावरणाचे स्वरूप कसे होते, हे जाणून घेण्यासाठी त्याची मदत होऊ शकते.

Check Also

स्मार्टफोनच्या साथीने बनला कोट्यधीश

जिद्द, योग्य कल्पना आणि बदलत्या काळाची अचूक ओळख असेल तर यशासाठी मोठ्या भांडवलाची गरज नसते, …