लेख-समिक्षण

इंस्टाग्रामची कहाणी

फोटो शेअरिंग अ‍ॅप इंन्स्ट्राग्रामने गेल्या ऑक्टोबरमध्ये 8 वर्ष पूर्ण केले. या प्रवासात या अ‍ॅपने आतापर्यंत 1 अब्ज यूजर जोडले आहेत. आठ आठवड्यात तयार झालेला इंन्स्टाग्राम हा ऑक्टोबर 2010 मध्ये लाँच झाला होता. या अ‍ॅपने फोटो शेअरीगचे परिमाण बदलले होते. मोबाईल फोटोला फास्ट, सिंपल आणि आकर्षक करणे हे या इंन्स्टाग्रामचे धोरण होते. प्रारंभीच्या काळात इंन्स्टाग्रामचे संस्थापक केव्हिन सिस्ट्रोमला हा अ‍ॅप नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता.
बर्बनने झाला इंन्स्टाग्राम : लहान पणापासूनच कॉम्प्यूटर प्रोग्रॅमिंगमधील वाढत्या आवडीचा परिणाम म्हणजे केव्हिनने शाळेतील मित्रांच्या मेसेंजर अकाऊंटला हॅक करण्यासाठी एक प्रोग्रॅम तयार केला. अभ्यास पूर्ण केल्यानंतर तीन वर्ष गूगलमध्ये काम केले. त्यानंतर एक स्टार्टअपमध्ये काम करत असताना फोटोग्राफी आणि सोशल शेअरिंगची कल्पना सुचली. केव्हीनने ही संकल्पना विकसित करण्याचा निश्चय केला आणि एक अ‍ॅप तयार केला. त्याला बर्बन असे नाव दिले. पैशाच्या तंगीमुळे हे अ‍ॅप नागरिकांपर्यंत पोचले नाही. केव्हिनने पार्टीमध्ये जावून लोकांंना या अ‍ॅपसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले. यासाठी मित्र माइक क्रिगरला या कंपनीचे सह संस्थापक म्हणून नेमले. मात्र चाचणीदरम्यान हे टूल अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरले नाही.
लाँच होताच प्रसिद्धी : सुरवातीला अपयश आल्याने केव्हिनने उणिवा दूर केल्या आणि फोटो शेअरिंगच्या संकल्पनेवर काम करण्यास सुरवात केली. प्रेयसीच्या म्हणण्यानुसार केव्हिनने बर्बनमध्ये फिल्टरचा समावेश केला, जेणेकरून फोटो अधिक आकर्षक दिसतील. या अ‍ॅपला 6 ऑक्टोबर 2010 रोजी लाँच केले. त्याला इंन्स्टाग्राम असे नाव दिले. चोवीस तासात 25 हजाराहून अधिक नागरिकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले. या अ‍ॅपची खासियत म्हणजे यूजर पर्सनल डिटेल ओपन न करताच फोटो शेअर करता येत होते.
फेसबुक आणि ट्विटरची ऑफर : जगातील सर्वात लोकप्रिय सोशल साईट फेसबुक आणि ट्विटरने हे अ‍ॅप खरेदी करण्याची ऑफर केली. मात्र केव्हिनने ही ऑफर नाकारली. मात्र फेसुबने पुन्हा इंन्स्टाग्राम खरेदी करण्यासाठी 1 अब्ज डॉलरचा प्रस्ताव ठेवला. तेव्हा केव्हिनने हा प्रस्ताव मान्य केला. 2012 मध्ये फेसबुकने इंन्स्टाग्राम खरेदी केले तेव्हा यूजरची संख्या 3 कोटी होती. आज बहुतांश सेलिब्रिटी हा अ‍ॅप वापरतात. संपूर्ण जगभरात या अ‍ॅपचे 1 अब्ज यूजर आहेत.

Check Also

लहान मुले आणि व्हिडिओ कॉलिंग

लहान मुलांच्या निरागस हालचाली सर्वांनाच मोहवून टाकतात. अनेकदा दूर राहणारे नातेवाईक किंवा मित्रमंडळी बाळाला पाहण्यासाठी …