महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येनिमित्त दुसर्या अमृत स्नान सोहळ्यासाठी प्रयागराजमध्ये मंगळवारी मध्यरात्री झालेल्या चेंगराचेंगरीत 30 भाविकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी प्रशासनाने केली. या चेंगराचेंगरीत 90 लोक जखमी झाल. मंगळवारी रात्री मौनी अमावस्येला अमृत स्नानासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीत चेंगराचेंगरी झाली. संगम किनार्याजवळ हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सुरुवात केली, अशी माहिती महाकुंभ नगरचे डीआयजी वैभव कृष्णा यांनी माहिती दिली.
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री योगी यांच्याकडून अपघाताची माहिती घेतली. महाकुंभात, मंगळवारी-बुधवारच्या रात्री, मौनी अमावस्येला पवित्र स्नान होते. त्याकरिता प्रयागराजमध्ये सुमारे 5 कोटी भाविक उपस्थित राहतील असा अंदाज होता. अमृत स्नानामुळे बहुतेक पोंटून पूल बंद होते. त्यामुळे आंघोळीसाठी येणार्या लोकांची गर्दी वाढतच गेली. काही लोक बॅरिकेड्समध्ये अडकल्याने पडले आणि चेंगराचेंगरी झाल्याच्या अफवा पसरल्या. मौनी अमावस्या स्रानासाठी प्रयागराजच्या संगम काठावर आठ कोटी लोक एकत्र आले. यावेळी चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 30 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघात घडताच 14 मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचवण्यात आले. नंतर मेळा परिसरातून रुग्णवाहिकेने आणखी काही मृतदेह आणण्यात आले.
चेंगराचेंगरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आखाडा परिषदेने अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कुंभमेळा प्रशासनाने आखाडा परिषदेचे अध्यक्ष रविंद्रपुरी यांच्याशी चर्चा करून अमृत स्नान रद्द करण्याची विनंती केली होती. या विनंतीला प्रतिसाद देत अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांनंतर हे स्नान होणार असल्याची माहिती आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी यांनी सांगितले आहे की, सर्व आखाड्यांनी स्नान रद्द केले होते. या घटनेमुळे कोणताही आखाडा अमृत स्नान करणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही योगी आदित्यनाथ यांना फोन करून कुंभमेळ्यात उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेतली. तसेच या दुर्घटनेबाबत केंद्र सरकारकडून सवोर्तोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. मिळालेल्या माहितीनुसार, संगम किनार्यावर मध्यरात्री 1.30 वाजताच्या सुमारास अचानक गोंधळ उडाला आणि लोक सैरावैरा पळू लागले. यावेळी बॅरिकेड्स तुटून चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अंदाजे 40 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. बुधवारी दुपारपर्यंत मृतांचा आकडा वाढत गेला. तसेच चेंगराचेंरीमुळे 60 ते 70 जण जखमी झाल्याचे समजते. सर्व जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका अफवेमुळे संगम नाक्यावर चेंगराचेंगरी झाली. काही महिला जमिनीवर पडल्या आणि लोकांनी त्यांच्यावर धाव घेतली. अपघातानंतर 70 हून अधिक रुग्णवाहिका संगम बँकेत पोहोचल्या. जखमी आणि मृतांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातानंतर काही काळासाठी स्नान प्रक्रिया खंडित झाली होती, परंतु नंतर सुरळीतपणे स्नान सुरू करण्यात आले.
या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले की, प्रयागराज महाकुंभात घडलेली दुर्घटना अत्यंत दु:खद आहे. यात ज्या भाविकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. यासोबतच, सर्व जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे. यासंदर्भात मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. आणि मी सतत राज्य सरकारच्या संपर्कात आहे, असे पीएम मोदी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
Check Also
भाजप, संघाची माफी न मागण्याचा निर्धार
प्रचंड गदारोळानंतर बुधवारी लोकसभेत ‘सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026’ मंजूर करण्यात आले. …
पांचजन्य वृत्तपत्र