सोन्या-चांदीचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांसाठी या मौल्यवान धातूंच्या दागिन्यांची खरेदी करणे कठीण होत आहे. परिणामी, स्त्रिया पारंपरिक दागिन्यांऐवजी आता कृत्रिम दागिन्यांना अधिक पसंती देत आहेत. हे दागिने केवळ स्टायलिश आणि परवडणारेच नसून, विविध पोशाखांशी सहजगत्या मॅच होतात. मात्र, टिकाऊ आणि योग्य गुणवत्तेच्या कृत्रिम दागिन्यांची निवड करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कधीकधी किमतीत बचत करण्याच्या प्रयत्नात खराब …
Read More »TimeLine Layout
September, 2025
-
21 September
शरारवेदनांवर संगीतसजीवनी
गीतकलेचा वापर आता एक उपचार पद्धती म्हणूनही केला जात आहे. विविध कला प्रकारांत सर्वाधिक आनंद देणारा कला प्रकार म्हणजे संगीत. दररोजच्या धकाधकीच्या जीवनात चिंता, थकवा, दुःख कमी करण्याचे प्रभावी काम संगीत करते. आता तर शारीरिक वेदना कमी करण्याचे सामर्थ्य संगीतामध्ये आहे, असे संशोधन ब्रिटिश संशोधकांनी केले आहे. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी, शस्त्रक्रिया करताना किंवा शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाला जर संगीत ऐकविले, तर त्याच्या …
Read More » -
21 September
एमिलिया क्लार्कची प्रेरणादायी कहाणी
तुम्हाला ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या मालिकेतून डेनेरिस टार्गेरियनची भूमिका करणारी एमिलिया लार्क परिचित असेल. परंतु तुम्हाला हे कदाचित ठाऊक नसेल की ‘गेम ऑफ थ्रोन्स‘च्या सुरुवातीच्या सिझनदरम्यान तिला दोन भयानक मेंदूतील गाठी (ब्रेन अॅॅन्युरिझम) झाल्या होत्या ज्यामुळे तिचा जीवही जाऊ शकला असता. पहिल्या सिझनच्या अगोदरच, व्यायाम करताना तिच्या डोयात भोसकावे, कापल्यासारखे तीव्र वेदना होऊ लागल्या. तपासणीसाठी केलेल्या एमआरआय स्कॅनमध्ये अॅन्युरिझम असल्याचे …
Read More » -
21 September
दिलासा देणारा निकाल
वक्फ (सुधारणा) कायदा-२०२५च्या घटनात्मक वैधतेवर अखेर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांनंतर अंतरिम निकाल दिला. या कायद्यात करण्यात आलेल्या दोन वादग्रस्त सुधारणा न्यायालयाने स्थगित केल्या. तसेच वफ बोर्डावर मुस्लिमांचेच वर्चस्व राहील असा निर्णय दिला. वफ बोर्डात गेली किमान पाच वर्षे इस्लाम धर्माचे पालन केलेल्या व्यक्तीच्या नियुक्ती संदर्भातील तरतुदीचा समावेश आहे. घटनात्मकतेची रूपरेषा सांगणारा संपूर्ण कायदा स्थगित करण्यास न्यायालयाने नकार दिला. वफ …
Read More » -
21 September
साक्षरतेतील भरारी
भारत हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील दुसर्या क्रमांकाचा देश आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येमध्ये साक्षरतेचा प्रश्न हा केवळ शैक्षणिक धोरणाशी निगडित मुद्दा नसून तो सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक आयामांशी जोडलेला आहे. अलीकडेच राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत साजर्या करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या कार्यक्रमाने या प्रश्नाला पुन्हा एकदा अधोरेखित केले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या वेळी जाहीर केलेली आकडेवारी देशासाठी अत्यंत …
Read More » -
21 September
३१ जानेवारीपर्यंत निवडणुकी घ्या
गेल्या चार वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका रखडलेल्या आहेत. या निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाने गेल्या मंगळवारी मुहूर्त काढला आहे. आयोगाच्या मागणीनुसार, मुदतवाढ देत सगळ्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ रोजीपर्यंत व्हायला पाहिजेत, असा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. निवडणुका घेण्यास विलंब केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रकरणी सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाकडून निवडणूक …
Read More » -
21 September
महती नवरात्रोत्सवाची
भारताच्या सर्वच प्रांतात अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारा शारदीय नवरात्रोत्सव आणि त्यानंतर येणारा विजयादशमीचा उत्सव उत्साहात साजरे होतात. भारतीय संस्कृतीने पुरुष देवता असतानाही शक्ती देवता म्हणून स्त्री देवतेला उभे करुन महिषासुरासारखा बलदंड राक्षस तिच्या हातून वध करवून घेतला. तिचा हा मोठा पराक्रम सांगण्यासाठी मोठी परंपरा निर्माण झाली. असुरी शक्ती जेव्हा दैवी शक्तीविरुद्ध युद्ध करते तेव्हा त्याचे प्रतिक म्हणून नवरात्र साजरी …
Read More » -
21 September
प्रस्थापितांसाठी इशारा
नेपाळपासून श्रीलंका आणि इराणपासून म्यानमार आणि फ्रान्सपर्यंत सर्वत्र जनतेच्या असंतोषाच्या मुळाशी दैनंदिन संघर्षमय जीवन आहे. जगाची मोठी लोकसंख्या ही युवा आहे आणि आजच्या काळातील युवा सजग, जागरूक आणि प्रश्न विचारणारा आहे. त्यांच्यात त्यांच्या पालकांसारखा किंवा वडीलधार्यांसारखा धीर, संयम नाही की एखाद्या सुंदर उद्याच्या प्रतीक्षेत आयुष्य घालवण्याची त्यांची तयारी नाही. जनरेशन झेडला वचनांचे, आश्वासनांचे राजकारण नको आहे, त्यांना आज आणि आत्ताच …
Read More » -
14 September
मुख्यमंत्री योगींच्या चित्रपटाचा मार्ग मोकळा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित ‘अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी’ या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, चित्रपटाच्या एकाही दृश्याला कात्री लावण्यात आलेली नाही. सेंसर बोर्डाला वारंवार आदेश देऊनही प्रदर्शन प्रमाणपत्र देण्यात येत नव्हते. त्यामुळे निर्मात्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने …
Read More » -
14 September
रजनीकांत नावाचं पर्व
रजनीकांत हे नाव केवळ चित्रपटसृष्टीतील एक चमकदार ब्रँड नाही, तर त्यामागे संघर्ष, चिकाटी आणि अस्सल माणूसपणाची कहाणी आहे. त्यांनी पडद्यावरच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थिर स्थान मिळवलेच; पण खर्या आयुष्यातील साधेपणा, प्रामाणिकपणा आणि नम्रता यामुळे त्यांना जनसामान्यांचा आदर प्राप्त झाला. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी अभिनय केला, आणि आजही त्यांचे नाव केवळ तमिळ सृष्टीपुरते मर्यादित नाही, तर जगभरातील चाहत्यांच्या मनात …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







