लेख-समिक्षण
  • 29 Mar 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4207

TimeLine Layout

March, 2025

  • 23 March

    नागपूर दंगलीचे 1250 संशयितांवर गुन्हे

    अखेर औरंगजेबाच्या कबरीने नागपूरच्या महाल परिसरात दंगल घडवून आणली. गेल्या सोमवारी झालेल्या हिंसाचारप्रकरणी नागपूर पोलिसांनी 1250 हून अधिक संशयितांवर गुन्हे दाखल केले आहेत. सोशल मिडीया पोस्ट आणि सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन पोलिसांनी सहा गुन्हे नोंदवले आहेत. नागपुरातील कोतवाली, गणेशपेठ आणि तहसील पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत 200 जणांची ओळख पटवून 60 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, …

    Read More »
  • 23 March

    अंतराळ दिग्विजयाला सलाम

    नऊ महिन्यांपेक्षा अधिक काळ अवकाशात अडकून पडल्यानंतर अखेर भारतीय वंशांच्या अमेरिकी अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांची भारतीय प्रमाणवेळेनुसार 19 मार्च 2025 रोजी यशस्वीरित्या स्पेसएक्सच्या ड्रॅगन कुपीतून घरवापसी झाली. त्यांच्यासमवेत नासाचे अंतराळवीर निक हेग आणि रशियाचे अंतराळवीर अ‍ॅलेक्झांडर गोर्व्हुनोव्ह देखील भूतलावर परतले. हे चौघेही अवकाश स्थानकावर (आयएसएस) क्रु-9 चे सदस्य होते. त्यांची जागा घेण्यासाठी चार अन्य अंतराळवीर नासाचे अ‍ॅनी …

    Read More »
  • 23 March

    ‘शिवशाही’ची दारुणावस्था

    आठ वर्षांपूर्वी भाजपा-शिवसेना युतीच्या काळात राज्यात शिवशाही बससेवेची सुरुवात झाली. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना किफायतशीर दरामध्ये वातानुकूलित गाडीतून लांबचा प्रवास करता यावा या उद्देशाने शयन आणि आसनी अशा दोन्ही स्वरुपात या बससेवेचा प्रारंभ झाला खरा; परंतु सुरुवातीपासूनच या बसेसविषयी नागरिकांच्या तक्रारी पाहायला मिळाल्या. विशेषतः शिवशाहीला होणार्‍या अपघातांनी नागरिकांमध्ये भीती पसरलेली दिसून आली आणि आजही ती कायम आहे. नादुरुस्त बस, अधूनमधून बंद …

    Read More »
  • 16 March

    मालिकाविश्वाला रामराम

    दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या कन्या गार्गी फुले-थत्ते यांनी अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. गार्गी फुले यांनी अनेक लोकप्रिय मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. मात्र, आता त्यांनी अचानक मराठी मालिकाविश्वातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी अचानक मालिकांमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत …

    Read More »
  • 16 March

    जाने कहाँ गये वो दिन…

    प्यार हुआ, इकरार हुआ है, प्यार से यह दिल डरता है क्यू… हे गीत ऐकताना मुसळधार पावसात एकाच छत्रीखाली असलेले राजकपूर आणि नर्गिस यांची जोडी डोळ्यासमोर येते. प्रामुख्याने बॉलिवुडपटात आतापर्यंत प्रेमावर आधारलेली गाणी, कथानक हे हिटचा फॉर्म्युला राहिले आहे. राजकपूरपासून रणबीरकपूरपर्यंत आणि नर्गिसपासून दीपिका पदुकोनपर्यंतच्या कलाकारांनी प्रेक्षकांसमोर प्रेमाचे अनोखे रंग दाखवून छाप पाडली आणि त्याल प्रोत्साहित केले. पण आता हे …

    Read More »
  • 16 March

    व्हॉट्स अ‍ॅप वापरताय?

    आतापर्यंत तुम्ही तुमचे फेसबुक, इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याच्या बातम्या वाचल्या असतील. पण आता व्हॉट्सअ‍ॅप हॅक झाल्याचे अनेक बातम्या समोर येत आहेत. पत्रकार तसेच नेत्यांचे व्हॉट्सअ‍ॅप हॅक होत आहेत. या अ‍ॅपद्वारे घोटाळा आणि ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. जर तुम्हीही चॅटिंग आणि कॉलिंगसाठी आंधळेपणाने व्हॉट्सअ‍ॅप वापरत असाल, तर काही आवश्यक सेटिंग्ज आणि खबरदारी घेऊन तुम्ही तुमचे अकाउंट सुरक्षित ठेवू …

    Read More »
  • 16 March

    संघर्षातून यशाची ‘बालेकी’ यशोगाथा

    नेपाळमधील एका गावात सुमारे 37 वर्षांपूर्वी जन्मलेली रूपमणी जन्मापासूनच अपंग होती. तिला ऐकू येत नव्हते आणि बोलताही येत नव्हते. तिचे कुटुंब दार्जिलिंगला गेले तेव्हा रूपमणी सहा महिन्यांची होती. वडील तिथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचे. तिच्या लहानपणी रूपमणीला हे विचित्र वाटले की कुटुंबातील इतर लोक एकमेकांशी खूप बोलतात, एकमेकांशी संभाषण करतात, परंतु आपल्याला त्या संभाषणात भाग घेता येत नाही. पालक …

    Read More »
  • 16 March

    फळमाशांचाही मेंदू असतो तल्लख!

    मानवाचा मेंदू म्हणजे निसर्गाची सर्वात थक्क करणारी करामत आहे. मानवाने बुद्धीच्या जोरावरच जगात आपले सामाज्य बनवलेले आहे. मात्र मानवाशिवायही अनेक जीवांमध्ये त्यांचे जीवनयापन करण्यासाठी योग्य अशी बुद्धी असते. जी फळमाशी फळांना सडवते, तिच्याकडे नसती आफत म्हणून आपण पाहात असलो तरी ती फार चतुर असते व तिचा मेंदूही तल्लख असतो. कुठलीही कृती करण्यापूर्वी फळमाशी विचार करते, असे ऑक्सफर्डच्या संशोधकांनी म्हटले आहे. …

    Read More »
  • 16 March

    कल्पनातीत संघर्षातून भरारी

    कल्पना सरोज ह्या एक प्रेरणादायी भारतीय उद्योजिका आहेत, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितींवर मात करून यशस्वी उद्योजकतेचा आदर्श घालून दिला आहे. त्यांचा जन्म 1961 साली महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील रोपरखेडा गावात एका मराठी दलित कुटुंबात झाला. त्यांचे वडील पोलिस कॉन्स्टेबल होते. 12 व्या वर्षीच त्यांचे लग्न झाले आणि त्या मुंबईतील झोपडपट्टीत पतीच्या कुटुंबासोबत राहत होत्या. तिथे त्यांना शारीरिक आणि मानसिक छळाचा सामना करावा …

    Read More »
  • 16 March

    मेलेली मने

    ब्रिटिश राजवटीत क्रांतिकारकांमुळे सोलापूरने स्वातंत्र्य प्राप्त केल्याचा इतिहास आजही जिवंत आहे. क्रांतिकारक आणि हुतात्म्यांच्या या शहरात एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता. वस्त्रोद्योगामुळे सोलापूर हे मँचेस्टर म्हणून ओळखले जात होते. कोणत्याही ज्वलंत विषयावर पेटून उठण्याची येथील मानसिकता त्यावेळच्या लोकांमध्ये होती. मात्र, स्वातंत्र्यानंतर सोलापूरचे वैभव आणखी वाढण्याऐवजी आता उतरतीला लागले आहे. अलीकडच्या काही वर्षांत सोलापूर आणि परिसरात रस्त्यांचे जाळे तयार झाले. काही …

    Read More »