लेख-समिक्षण
  • 29 Mar 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4207

TimeLine Layout

October, 2025

  • 19 October

    अर्थचक्राला गती सणसुदीची

    आपल्या देशात सणासुदीला, उत्सवात लाखो, कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. यावर्षी ऑनलाइन आणि ऑफलाइन प्लॅटफॉर्मवर तब्बल सहा लाख कोटी रुपयांचे व्यवहार होण्याची शयता असून त्यात ऑनलाइनवर १.२० लाख कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे. ही उलाढाल देशाच्या जीडीपीच्या ३.२ टक्के आहे. नामांकित ई कॉमर्स कंपन्यांनी तर उत्सवाच्या काळात वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी कपातीचा लाभ उचलण्यासही सुरुवात केली आणि ती …

    Read More »
  • 19 October

    नक्षल नेत्याने स्वीकारले संविधान

    नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटी आणि पोलिट ब्युरो सदस्य तसेच वरिष्ठ नक्षल कमांडर मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ सोनू उर्फ भूपती याने बुधवारी आपल्या ६० सहकार्‍यांसह गडचिरोली पोलिसांसमोर ऐतिहासिक आत्मसमर्पण केले. भूपती आणि त्याच्या सहकार्‍यांनी शस्त्रे खाली ठेवून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला. या शरणागतीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संविधानाची प्रत सुपूर्द केली. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावती भागातील दंडकारण्यात गेली अनेक वर्षे नक्षलवादी …

    Read More »
  • 19 October

    नोबेल आणि भारतीय

    ऑटोबर महिना येताच जगभराचे लक्ष नोबेल सन्मानाकडे जाते. स्वीडिश शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या दुरगामी विचारातून सुरू झालेले नोबेल पुरस्कार आजही मानवतेसाठी सर्वोत्तम योगदानाचे प्रतीक मानले जाते. दरवर्षी विज्ञान, साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्र क्षेत्रात सर्वोत्तम कार्य करणार्‍या व्यक्तीला नोबेल सन्मान दिला जातो. पण भारताचा विचार येतो तेव्हा सुमारे दीड अब्ज लोकसंख्येचा प्रतिभावान देश केवळ नऊ नोबेल सन्मानापुरताच मर्यादित का राहिला आहे? …

    Read More »
  • 19 October

    निराशेतून आशेचा शोध घेणारा साहित्यक

    दरवर्षी साहित्यातील नोबेल कुणाला जाहीर होणार याकडे सर्व साहित्यप्रेमींचे, वाचनप्रेमींचे लक्ष लागून राहिलेले असते. हा पुरस्कार जगभरातील साहित्य कलाकृतींमधील सर्वोत्कृष्ट साहित्याला दिला जात असल्याने त्याचे मोल अनन्यसाधारण असते. गतवर्षी दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांची निवड या पुरस्कारासाठी झाली होती. यंदाच्या वर्षी स्वीडिश अकादमीने साहित्यातील नोबेल पुरस्कारासाठी हंगेरीच्या लास्झलो क्रॅस्नाहोरकाई यांची निवड केली आहे. हा पुरस्कार जाहीर करताना स्वीडिश अकादमीने …

    Read More »
  • 12 October

    ‘क्रू’ परतणार…

    करीना कपूर, क्रिती सॅनॉन आणि तब्बू या हवाई सुंदर्‍यांचा ‘क्रू’ लवकरच परतणार आहे. २०२४ मध्ये या विनोदी अंगाने जाणार्‍या गुन्हेपटाने रसिकांची चांगलीच पसंती मिवली होती. एकता कपूर आणि रिहा कपूर यांनी ‘क्रू’ चित्रपटाची निर्मिती केली होती. या दोघांनी आता या चित्रपटाचा दुसरा भाग आणायचे ठरवले आहे. ‘क्रू’ या चित्रपटातच त्याचे अनेक भाग लपले आहेत. निर्मात्यांनी अनेक संकल्पांनांची चाचपणी केली. त्यानंतर …

    Read More »
  • 12 October

    शेवट दुःखद असूनही…

    चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते माणसाला एका वेगळ्या जगात घेऊन जाणारे माध्यम आहे. पडद्यावर उमटणार्‍या भावनांनी आपण अनेकदा वास्तव विसरतो आणि पात्रांच्या आनंद-दुःखात रंगून जातो. काही चित्रपटांचा शेवट जसा आशादायक आणि सुखद असतो, तसाच काहींचा शेवट इतका वेदनादायी असतो की तो मनावर कायमचा ठसा उमटवून जातो. असेच काही बॉलिवूड चित्रपट आहेत, ज्यांच्या कथांचा शेवट शोकांत आहे पण त्यातून …

    Read More »
  • 12 October

    अव्वल यशाची कहाणी

    केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए प्रवेशासाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत देशातील एकूण ७९२ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेत इमॉन घोष हा देशात पहिला, तर तिसरे स्थान पुण्यातील ॠतुजा वर्‍हाडे हिने मिळविला आहे. ॠतुजा हिने मुलींमध्ये देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. एनडीएच्या लेखी परीक्षेच्या निकालांच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. …

    Read More »
  • 12 October

    नदी सर्वांत मोठी,पण..

    जगातील सर्वात मोठ्या नद्यांमध्ये दक्षिण अमेरिकेतील अ‍ॅमेझॉन नदीचा समावेश होतो. ‘पृथ्वीचे फुफ्फुस’ म्हटल्या जाणार्‍या अ‍ॅमेझॉन जंगलाचे भरणपोषण करीत वाहणारी ही नदी गोड्या पाण्यात आढळणार्‍या डॉल्फिन माशांचाही सर्वात मोठा नैसर्गिक अधिवास आहे. शंभर प्रजातींचे इलेक्ट्रिक मासे आणि ६० प्रजातींचे पिर्‍हाना मासेही या नदीत आढळतात. पेरू, कोलंबिया, इक्वेडोर आणि ब्राझिल यासारख्या तब्बल नऊ देशांमधून वाहणार्‍या या नदीवर एकही पूल नाही हे विशेष! …

    Read More »
  • 12 October

    तुमचंही मूल शाळेत उदास असतं?

    साधारणतः दुसरी ते चौथी इयत्तेत जाईपर्यंत मुलांच्या शिक्षणाबाबत, शाळेत जाण्याबाबत पालकांना प्रचंड काळजी असते. यातील सर्वांत मोठे आव्हान असते ते मुलाला शाळेपर्यंत पोहोचवणे. दुसरे असते न रडता. तिसरे असते घरामध्ये शांत वातावरण राखून मुलाचं सकाळचं सगळं आवरणं. यादरम्यान होणार्‍या चुका मुलांवर नकारात्मक परिणाम करतात. तुमचंही मूल शाळेतून आल्यावर उदास, गप्प आणि हरवलेलं असतं का? किंवा टीचर्सकडून वारंवार ऐकावं लागतं का …

    Read More »
  • 12 October

    जैविक शेतीची अनोखी यशोगाथा

    दीपक सभरवाल यांनी दिल्ली विद्यापीठातून बीकॉम, आयसीएमए आणि एमबीए पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी टाटा, पेप्सी आणि जनरल इलेट्रिकसारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये २० वर्षांहून अधिक काळ काम केले. परंतु, कॉर्पोरेट मिटिंग्स आणि पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनमधील आयुष्य त्यांना पूर्ण समाधान देत नव्हते. २०१७ मध्ये दीपक यांनी आपले वीस वर्षांचे कॉर्पोरेट करिअर सोडले आणि ऑर्गेनिक शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा प्रवास राजस्थानातील पुष्कर येथे …

    Read More »