जगभरातील लोकांच्या आहारात कांदा असतोच. गरिबांसाठीही कांदा- भाकर हे सहज उपलब्ध होणारे अन्न आहे. कांद्याचा वापर मेसोपोटेमियात म्हणजे सध्याच्या इराक-इराणच्या परिसरात 4000 वर्षांपूर्वी केला जात असे, हे एका लेखातून स्पष्ट झाले आहे. 1985 साली एका फ्रेंच पुरातत्त्ववेत्याने तो वाचल्यावर ही माहिती समजली होती. जगभरातील अनेक देशांमध्ये कांद्याचे पीक घेतले जाते. जगभरातल्या एकूण कांद्यापैकी 45 टक्के कांदा भारत आणि चीनमध्ये पिकवला …
Read More »TimeLine Layout
July, 2024
-
7 July
कहाणी एका स्वप्नपूर्तीची
राजस्थानमध्ये गौना परंपरेनंतरच लहान वयात लग्न झालेली वधू सासरी संसार थाटण्यासाठी जाते. ही त्या जोडप्यांसाठी आयुष्याची नवी सुरुवात असली, तरीही मुलींच्या मनात असणार्या स्वप्नांचा शेवट असतो. मात्र, रुपा यादवच्या बाबतीत ही परिस्थिती वेगळी होती. रुपाने तिच्या कुटुंबीयांच्या, खास करून तिच्या मेव्हण्याच्या पाठिंब्याने आपले शिक्षण पूर्ण केले. घरच्यांचा पाठिंबा असला तरीही रुपाला आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणी आल्या होत्या. आर्थिक …
Read More » -
7 July
अभिभाषणातील उणे-अधिक
मोदी 3.0 सरकारच्या पहिल्या अधिवेशनाच्या संयुक्त सत्रात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणात देशाला अपेक्षित असणारी सर्वंकष भूमिका किंवा धाडसी धोरणाचा अभाव दिसल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. वास्तविक या अभिभाषणात संयम, संतुलन आणि धोरण आखणीतील सातत्य होते. अर्थात, निवडणुकीचे वर्ष असल्याने गेल्या सहा महिन्यांत सरकारच्या आर्थिक आणि प्रशासकीय हालचाली मंदच राहिल्या. अनेक मोठे निर्णय बाजूला राहिले आणि आर्थिक सुधारणांना पुढील टप्प्याची …
Read More » -
7 July
अज्ञानाचे बळी
निसर्गावर विजय वगैरे मिळवणं आपल्याला कधीच शक्य नसतं आणि त्याची गरजही नसते; पण कथित आर्थिक विकासाच्या कैफात आपल्याला तसं पदोपदी वाटू लागलंय, हे मात्र खरं. निसर्ग हा सातत्यानं आपल्याला काही ना काही देत राहतो आणि आपण सातत्यानं त्याला ओरबाडत राहतो. त्यामुळं एकीकडे पैसा फुगत चाललाय आणि दुसरीकडे निसर्ग जखमी होत चाललाय. खिसे फुगल्यामुळं पर्यटनाचा पूर आलाय; पण पर्यटन कशाला म्हणायचं, …
Read More » -
7 July
‘बाबा’च्या चरण स्पर्शाचे 130 बळी
उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार आणि खुनाच्या घटनेमुळे तीन वर्षांपूर्वी गाजले होते. आता ‘बाबा’चा चरण स्पर्श करण्यासाठी गाजत आहे. हाथरस जिल्ह्यातील पुलराई गावात मंगळवारी दुपारी एक भयंकर दुर्घटना घडली. येथे भोले बाबा नावाच्या एका व्यक्तीच्या सत्संगमध्ये चरण स्पर्श करण्यासाठी चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 130 पेक्षा अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शेतात सत्संगसाठी मांडव घातलेला होता. सत्संग संपल्यानंतर गुरुजी …
Read More » -
7 July
सरकारी रुग्णालयांच्या मरणकळा
भारतातील सरकारी रुग्णालयांची अवस्था अत्यंत वाईट असल्याचा अनुभव आम आदमी नेहमीच घेत असतो. पण आता सरकारनेच तयार केलेल्या अहवालातून देशातील 80 टक्के सरकारी रुग्णालयांमध्ये मूलभूत सुविधाही नसल्याचं समोर आलं आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टर, परिचारिका आणि अत्यावश्यक उपकरणांचा मोठा तुटवडा असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य सुविधांसंदर्भातील हे वास्तव अत्यंत भीषण आहे. विकसित भारताचे स्वप्न घेऊन पुढे जाताना सार्वजनिक …
Read More » -
7 July
अजेय भारत
अंतराळ विज्ञान, माहिती-तंत्रज्ञान आणि आर्थिक क्षेत्रात जोमाने प्रगती करणार्या भारताचा क्रीडाक्षेत्रामधील दबदबाही गेल्या काही वर्षांमध्ये वाढला आहे. टी-20 विश्वचषक जिंकणार्या भारतीय क्रिकेट संघाने यावर नव्याने शिक्कामोर्तब केले आहे. क्रिकेटच्या खेळात सांघिक समन्वयाला अधिक महत्त्व आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर रोहितसेनेने मिळवलेली पकड विलक्षण आहे. त्याला जोड लाभली ती राहुल द्रविडसारख्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाची. त्यामुळे भारतीय संघ अजेयस्थितीत पोहोचला …
Read More »
June, 2024
-
30 June
सुमोना कपिलवर नाराज का?
अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती ही एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे आणि हे तिने अनेक शोमध्ये केलेल्या अभिनयाने सिद्ध केले आहे. ‘बडे अच्छे लगते हैं’, ‘कसम से’, ’कस्तुरी’, ‘जमाई राजा’ यांसारख्या शोमध्ये स्वतःला आजमावल्यानंतर तिने प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मासोबत काम करून आपली वेगळी ओळख निर्माण केली. पुढे ती ‘कहानी कॉमेडी सर्कस की’, ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ तसेच ‘द कपिल शर्मा शो’च्या तीन सीझन …
Read More » -
30 June
ओटीटीमुळे कात टाकतेय बॉलिवूड
कोरोना काळानंतर मनोरंजनाच्या स्वरुपात बराच बदल झाला आहे. कोरोनाकाळात चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली आणि तत्कालिन काळात प्रेक्षकांच्या मनोरंजनाची भूक ओटीटी प्लॅटफॉर्मने भागविली. एक-दीड वर्षेया माध्यमातून लोकांचे मनोरंजन झाले. कोरोना काळ संपला आणि टॉकीजचे दरवाजे पुन्हा उघडले. आता चित्रपटांचा जुना काळ परतला. प्रेक्षक पॉपकॉर्न खात टॉकीजकडे वळत आहेत. पुष्पा, अॅनिमलसारखे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. दुसरीकडे प्रेक्षकांचे ओटीटीवरचे प्रेम मात्र कमी झालेले नाही. …
Read More » -
30 June
शॉट्स वापरताना
शॉर्टचे फिटिंग असा विचार केला तर चार प्रकारात या पँट मिळतात. रेग्युलर, स्लीम, स्ट्रेच आणि लूझ असे हे चार प्रकार आहे. सर्फ शॉर्टस या नेहमीच लूझ फिटिंग असतात. तर सायकलिंग करताना वापरल्या जाणार्या शॉर्टस पायाला घट्ट बसणार्या असतात. स्लीम किंवा रेग्युलर फिटींगच्या कॅज्युअल शॉर्टस बर्याचदा वापरल्या जातात. बर्याचदा योग्य मापाची शॉर्टस खरेदी कऱणे जमतेच असे नाही त्यामुळे बॅगी स्टाईलच्या पँटस …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







