महात्मा गांधी एकदा संध्याकाळच्या प्रार्थनासभेत बोलताना खूपच अस्वस्थ झाले होते. ते म्हणाले, “माझ्याकडून झालेली चूक खुपच गंभीर आणि क्षमा न करण्याजोगी आह” या गोष्टीचा शोध मला अनेक वर्षांपूर्वी लागला होता, पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. मी घेतलेल्या गरीब जनतेच्या सेवेच्या व्रतामध्ये अशा महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. त्याचवेळी मी माझी चूक सुधारून घेतली असती तर समाजाची हानी झाली नसती.
गांधीजींचे हे दु:खी आणि पश्चातापाचे शब्द ऐकून उपस्थित सर्वजण हैराण झाले होते. ज्या गोष्टीला गांधीजी पाप म्हणत आहेत, अशी कोणती गोष्ट त्यांनी केली आहे, हाच प्रश्न तेथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या मनात होता.
लोकभावना लक्षात घेऊन गांधीजी म्हणाले “लोक दात घासण्यासाठी ज्या लिंबाच्या काड्या वापरतात त्या पुन्हा वापरात आणल्या जाऊ शकतात” ही गोष्ट प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा विचार आला होता. परंतु मी विसरून गेलो. हाच माझा सर्वात मोठा गुन्हा आहे.
महात्मा गांधी छोट्या-छोट्या कामांमधून जास्तीत-जास्त बचत करण्याचा विचार करत असत. त्यातून गरीब जनता बोध घेऊन आपल्या अडचणी काही प्रमाणात कमी करू शकेल, असा त्यांचा विश्वास होता. त्या दिवशी त्यांना वापरून झालेल्या लिंबाच्या काड्यांचा सदुपयोग करण्याचे आदेश आश्रमातील लोकांना दिले. दात घासून झाल्यानंतर या लिंबाच्या काड्या स्वच्छ धुवून उन्हात वाळविल्या जाव्यात आणि त्यांचा वापर इंधनासाठी करावा असे त्यांनी सांगितले. उपस्थित असलेल्या सर्वांनी वापरलेल्या लिंबाच्या काड्या जमविल्या तर काही दिवसांतच अन्न शिजविण्याइतके इंधन मिळू शकेल. यामुळे वर्षातील एका दिवसाच्या इंधनाची बचत होईल.
छोट्या-छोट्या किरकोळ बाबींमुळेच परिपूर्णता येते आणि परिपूर्णता ही काही किरकोळ बाब नाही हे गांधीजींचे वरील कृतीवरुन स्पष्ट होत नाही काय?
Check Also
शून्यातून बनला कोट्याधीश…
शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस यशाची कोणतीही शिखरं सर करू …
पांचजन्य वृत्तपत्र