लेख-समिक्षण
  • 29 Mar 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4207

TimeLine Layout

December, 2024

  • 1 December

    अभ्यासाच्या सवयी

    शैक्षणिक आयुष्यात अभ्यास ही सर्वात प्राधान्याची गोष्ट आहे. परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी अभ्यास महत्त्वाचा आहे. काही साध्या गोष्टीचे पालन करून अभ्यासाच्या चांगल्या सवयी लावता येतील. र्ी विद्यार्थी दशेत यश प्राप्तीसाठी वेळेचे व्यवस्थापन हे खूप अवघड कौशल्य असावे लागले. ते ज्यांच्याकडे असते त्यांच्यासाठी यश दूर नाही. अभ्यासाचे वेळापत्रक आधीच तयार करा. कोणत्या गोष्टीसाठी किती वेळ द्यायचा ठरवून घ्या आणि त्याचे काटेकोर …

    Read More »
  • 1 December

    गच्चीवर बाग फुलवताना…

    बाल्कनी आणि सदनिका यांचे जसे जवळचे नाते तसेच काहीसे टुमदार बंगला आणि त्यावरील प्रशस्त गच्चीचे आहे. पूर्वी गच्चीवरच्या जागेचा वापर फक्त घरातील अडगळीचे सामान ठेवण्यापुरताच होता.काळ बदलला, बंगल्याची आकर्षक डिझाइन्स आकार घेऊ लागली. अडगळीच्या सामानाची विल्हेवाट झाली आणि गच्चीवर फुलझाडांची कुंडी अवतरली. गच्चीवरील या उद्यानात मोठ़या प्रमाणावर हिरवळ, छोटे वृक्ष, फुलझाडे यांना प्राधान्य द्यावे. या या बागांची निगराणी ठेवणे हे …

    Read More »
  • 1 December

    आता अन्न पदार्थांचं स्कॅनिंग

    सध्या अनेक लोक ‘कॅलरी कॉन्शस’ झालेले आहेत. त्यामुळे समोर आलेल्या अन्नपदार्थांमध्ये किती कॅलरीज आहेत, याबरोबरच त्यामध्ये कोणकोणते घटक आहेत हे जाणून घेण्याची त्यांची इच्छा होत असते. शिवाय अन्नात अनेक अपायकारक तसेच उपकारक घटकही असतात व ते ओळखणारा स्कॅनर संशोधकांनी विकसित केला आहे. तो सहज वापरता येणारा तर आहेच, पण स्मार्टफोनलाही तो जोडता येतो. आपण जे अन्न खातो त्यात अ‍ॅलरजेन, रसायने, …

    Read More »
  • 1 December

    उद्देश महत्वाचा

    कोणत्याही कार्यामागील, कर्मामागील कार्यकारणभाव हा महत्त्वाचा असतो. यामध्ये वैयक्तिक हिताचा उद्देश असेल तर त्याला स्वार्थ म्हणतात आणि लोककल्याणाचा उद्देश असेल तर त्याला परोपकार म्हणतात. बहुतेकांचा जीवनातील जास्तीत जास्त काळ हा स्वार्थासाठीच व्यतीत होतो. त्यातून आनंद मिळत असेलही; पण त्यापेक्षाही आंतरीक आनंद हा परोपकारातून मिळतो. स्वामी विवेकानंदांची ही कहाणी यासाठी उद्बोधक आहे. एकदा स्वामी विवेकानंद प्रवासात अलवरला पोहोचले. अल्वरचे महाराज स्वामीजींच्या …

    Read More »
  • 1 December

    दावेबाज ‘किंगमेकरांना’ धडा

    आमच्याशिवाय सरकार बनणार नाही, आम्हीच सरकार स्थापन करणार, माझ्याकडे अमुक समाजाला आरक्षण देण्याचा फॉर्म्युला आहे, पण मी सांगणार नाही, सत्तेत सहभागी होणार, आता अमुक पक्षाचा मुख्यमंत्री होणार, पुढच्या निवडणुकीत आमचाच मुख्यमंत्री होणार, आता ताकद दाखवून द्या, सुपडा साफ झाला पाहिजे, ही गेल्या काही महिन्यांपासून सतत कानावर धडकणारी विधाने आहेत. अशी विधाने करणार्‍या नेत्यांचा मतदारांनी विधानसभेच्या या निवडणुकीत एकदाचा सोक्षमोक्ष लावून …

    Read More »
  • 1 December

    भीतीदायक घर

    महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा निवडणुकीच्या धामधुमीत अधूनमधून चर्चेला येत होता. अर्थात, चर्चेत तसे बरेच मुद्दे येतात आणि जातात. नंतर त्यांचं गांभीर्य किती उरतं, हे उघड गुपित आहे. पण महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा प्रत्येक कुटुंबाशी निगडीत आहे आणि केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जवळजवळ सर्वच राज्यांमध्ये गंभीर बनलाय. घरातून बाहेर पडणारी स्त्री, मग ती कोणत्याही वयोगटातील असो, घरी येईपर्यंत सुरक्षित राहील की नाही याबाबत …

    Read More »
  • 1 December

    अखेर फडणवीस पुन्हा आले…

    2019 मधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये ‘मी पुन्हा येणार’, असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस भाजपच्या मुख्यमंत्रिपदावर पुन्हा आले आहेत. अखेर एकनाथ शिंदे यांनी त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा दिला. अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून मला फडणवीस यांनी सहकार्य केले, असे शिंदे म्हणाले. त्यानंतर भाजप नेते अमित शहा यांनी फडणवीस यांच्या राज्याभिषेकाचे सोपस्कार पूर्ण केले. दोन दिवस माध्यमांशी न बोललेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी …

    Read More »
  • 1 December

    राजकीय बदलांची नांदी

    यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदारांना प्रादेशिक पक्षांच्या तुलनेत राष्ट्रीय पक्षांना मत देणे अधिक महत्त्वाचे वाटले. अलिकडचे निकाल पाहता मतदारांचा बदलता ट्रेंड पाहून प्रादेशिक पक्षांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. ज्या राज्यांत भाजप आणि कॉग्रेसचा स्ट्राईक रेट अधिक आहे, तेथे लहान पक्षांना उमेदवार निवडून आणताना बराच आटापिटा करावा लागला. राष्ट्रीय पक्षांचा वाढता दबदबा येणार्‍या काळातील राजकीय बदलांची नांदी म्हणावा लागेल. यंदाच्या …

    Read More »
  • 1 December

    नव्या आर्थिक चिंताचा काळ

    रेंगाळणारे रशिया युक्रेन युद्ध आणि इस्राईल-इराण संघर्ष या कारणांमुळेही भारताच्या आर्थिक चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. जगातील युद्धग्रस्त देशातील संघर्ष आणखी चिघळला तर तर कच्च्या तेलाच्या जागतिक बाजारात किंमती वाढण्याची मालिका सुरू होऊ शकते आणि कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्या तर जगभरात अनेक वस्तूंच्या किंमती वाढण्याबरोबरच भारतात देखील महागाई मी मी म्हणू शकते. सध्या देशात महागाई भडकण्याचा ट्रेंड हा स्पष्टपणे दिसत …

    Read More »

November, 2024

  • 24 November

    येणार ‘बाजीगर’चा सिक्वल

    बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ’किंग’ चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. परंतु सध्या त्याच्या 1993 साली प्रदर्शित झालेल्या ’बाजीगर’ चित्रपटाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. हा चित्रपट रिलीज झाल्याच्या 31 वर्षांनंतर निर्माते या चित्रपटाचा रिमेक आणणार आहेत. ‘बाजीगर’ चित्रपटाच्या दुसर्‍या भागाची सध्या चर्चा सुरु झाली आहे. या चित्रपटाचे निर्माते रतन जैन यांनी ‘बाजीगर’ चित्रपटाच्या सिक्वेलबाबत भाष्य केले आहे. …

    Read More »