लेख-समिक्षण
  • 29 Mar 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4207

TimeLine Layout

November, 2024

  • 17 November

    सहजीवनाची सिलव्हर ज्युबली!

    बॉलिवूड स्टार माधुरी दीक्षित नेनेच्या लग्नाला 25 वर्षेपूर्ण झाली आहेत. यशस्वी विवाहाबद्दल अभिनेत्रीने तिचे विचार शेअर केले आहेत. तिने लग्नाबाबत बोलतांना कबूल केले की आनंदी आणि यशस्वी भागीदारी करणे सोपे नाही. माधुरीने ऑक्टोबर 1999 मध्ये लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथील हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी सर्जन शीराम नेने यांच्याशी विवाह केला. दक्षिण कॅलिफोर्नियातील अभिनेत्रीच्या मोठ्या भावाच्या घरी हे लग्न पार पडले. या जोडप्याने …

    Read More »
  • 17 November

    अपार मेहनतीला पर्याय नाही

    ‘अग बाई अरेच्या’ या चित्रपटामध्ये माझी अगदीच छोटी भूमिका होती.तरीही माझी भूमिका असलेला पडद्यावर आलेला हाच पहिला चित्रपट. पण केदार शिंदेंच्या ‘जत्रा’ चित्रपटामुळं मला सिद्धू म्हणून सर्वदूर ओळख मिळवून दिली. माझं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलं. किडकीडीत अंगकाठी, सामान्य चेहरा असतानाही प्रेक्षकांनी माझ्यातील अभिनय गुणांवर मनापासून प्रेम केलं याचं अप्रुप वाटतं. घरातून अभिनय क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना स्वकष्टाने मी या क्षेत्रात …

    Read More »
  • 17 November

    ब्लू टूथ फाईव्हः अधिक स्पीड आणि रेंज

    मोबाईल हे केवळ आता संवादाचे माध्यम राहिले नसून मल्टिपर्पज म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. नेट सर्फिंग, व्हिडिओ, फाइल डाऊलोडिंग, नेव्हीगेशन यासारख्या अनेक सुविधा मोबाईलमध्ये उपलब्ध आहेत. मोबाईलमध्ये अनेक प्रकारचे उपयोगी अ‍ॅप असतात की ज्या माध्यमातून आपण दैनंदिन कामे सहज करू शकतो. याच माध्यमांचा उपयोग करून फाईलची देवाणघेवाणही सहज शक्य झाले आहे. ब्लू टूथ ही सर्वात जूनी संकल्पना असून त्यात काळानुरुप …

    Read More »
  • 17 November

    सदाबहार एम्ब्रॉयडरी

    आकर्षक एम्ब्रॉयडरी असलेले वेस्टर्न ड्रेसेसची फॅशन सध्या जोरात आहे. असे ड्रेस कोणत्याही समारंभात किंवा एरवीही परिधान करता येतात. फुलांचे वर्क असलेले शिफ्ट ड्रेस किंवा चिकन वर्क असलेली कॉटन ट्राऊजर आणि जरदोसी वर्क असलेला जंपसूट. अशा प्रकारच्या ड्रेसेसचा सध्या ट्रेंड आहे. अगदी सेलिब्रिटीजसुद्धा अशा प्रकारच्या ड्रेसेसना प्राधान्य देत आहेत. एम्ब्रॉयडरी असलेले वेस्टर्न आऊटफीट्सचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या …

    Read More »
  • 17 November

    गूढ पृथ्वीच्या पोटातल्या कड्याचे

    पृथ्वीच्या पोटात अनेक रहस्ये दडलेली आहेत. आता आपल्या पायांखाली हजारो किलोमीटर खोलीवर एखाद्या कड्यासारखी रचना आढळून आली आहे. पाश्चात्त्य देशांमधील डोनट या खाद्यपदार्थासारखी किंवा आपल्याकडील मेदुवड्यासारखी त्याची रचना आहे. हे कड्याच्या आकाराचे क्षेत्र पृथ्वीच्या तरल कोअरच्या आत आहे, जे आपल्या ग्रहाच्या चुंबकीय क्षेत्राच्या गतिशीलतेबाबतचे नवे संकेत देते. ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी या कड्याचा शोध घेतला आहे. मध्यभागी पोकळी असलेल्या गोलाकार …

    Read More »
  • 17 November

    दिव्यांगपणावर जिद्दीने मात

    मूळचे पुण्यातील असलेले डॉ. बोत्रे सध्या राजस्थानातील पिलानी येथील ‘कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च’च्या अखत्यारितील सिरी या संस्थेत मुख्य शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. भाऊसाहेब यांचे बालपण पुण्यातील रामवाडी वसाहतीत गेले. अवघे एक वर्षाचे असताना त्यांना ताप आल्याचे निमित्त झाले आणि दोन्ही पायांना पोलिओने ग्रासले. त्यानंतरही त्यांच्या आईने त्यांना शाळेत घातले. त्यांना दहावीत 82 टक्के गुण मिळाले होते. प्राथमिक शाळेत …

    Read More »
  • 17 November

    उदंड झाली आश्वासने

    विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. विविध पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सध्या सर्वसामान्य मतदारांवर आश्वासनांचा भडिमारही न चुकता सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्ष निवडणुकीच्या रणमैदानात भलेही एकमेकांच्या विरोधात उभे असले तरी हिंदुत्व, जातीवाद, भ्रष्टाचार, महिला अत्याचार, वाढती बेरोजगारी, विकासाच्या मुद्द्यांवर एकमेकांमध्ये मतभिन्नता असली तरी महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत मात्र सर्वच पक्षांची विचारधारा अनपेक्षितरीत्या जुळत असल्याचे …

    Read More »
  • 17 November

    पोषणजादू

    पोषण ट्रॅकरमध्ये आपलं स्वागत आहे, असा मेसेज आल्याचं पाहून ‘ती’ भेदरलीच. वास्तविक गर्भारपणाच्या किंवा स्तनदा माता असण्याच्या काळात आपल्या आणि बाळाच्या योग्य पोषणासाठी सरकारने चालवलेले प्रयत्न पाहून ‘ती’ आनंदी व्हायला हवी होती. मग नेमकं उलट का झालं? कारण ‘ती’ अविवाहित होती. हा मेसेज घरातल्यांनी पाहिल्यावर तर कल्लोळच झाला. आता आपल्याला कुठे तोंड दाखवायची सोय उरली नाही, या जाणिवेनं घरातले सगळेच …

    Read More »
  • 17 November

    राज्यघटना घेऊन फिरणारे फसवे ः मोदी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर प्रचारसभा घेतली. त्यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाला लक्ष्य केले. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 लागू करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरू झाले आहेत. हे षडयंत्र यशस्वी झाल्यास डॉ. बाबासाहेबांचे संविधान पुन्हा काश्मीरबाहेर जाईल. मात्र, ते आम्ही होऊ देणार नाही. राज्यघटना घेऊन फिरणारे फसवे आहेत. त्यांनी काश्मीरमध्ये राज्यघटना लागू होऊ दिली नाही,’ अशी …

    Read More »
  • 17 November

    फटाफुटीची भाषा कशासाठी?

    सध्या एक स्लोगन खूपच व्हायरल होत आहे. ‘बटेंग तो कटेंगे.’ अर्थात ती भुलभुलैय्या निर्माण करणारे स्लोगन आहे. याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा राहू शकतो. ज्याने त्याने आपापल्या परीने त्याचा अर्थ लावायचा. आता तर त्याच्याशी मिळतेजुळत्या स्लोगनचे पेव फुटले आहे. पण मुळातच बटेंगेसाठी आपण एकत्र आहोत का, याचा विचार करायला हवा. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करुन शंभरीकडे जाणार्‍या भारतातील समाज आज जातीजातींमध्ये …

    Read More »